Friday 6 December 2019

पिता यस्य शुचिर्भूतो माता यस्य पतिव्रता। उभाभ्यां यस्य सम्भूतिः तस्य नोच्चलते मनः।



ज्येष्ठ बंधुच्या वनवासांत त्याला छायेप्रमाणे सहभाग देऊन चतुर्दश वर्षे ब्रह्मचर्य पालन करणारा *श्रीलक्ष्मण...*

स्वतःस आधी यौवराज्याभिषेक प्राप्त होऊनही पित्याच्या विवाहासाठी त्या राजसुखावर प्रहार करून आजीवन अखंड नैष्ठिक ब्रह्मचर्याची घनघोर नि भीष्म प्रतिज्ञा करणारे *उर्ध्वरेतस गंगापुत्र देवव्रत उपाख्य श्रीभीष्माचार्य...*

स्वपत्नी एकंच अशी श्रीरुख्मिणीसह विवाहापश्चातही द्वादश वर्षे नैष्ठिक ब्रह्मचर्य पालन करून पश्चातंच प्रद्युम्नांस जन्म देणारे *पूर्ण पुरुषोत्तम योगेश्वर भगवान श्रीकृष्ण...*

एका याज्ञसेनी अग्निशिखा महासती कृष्णेच्या अर्थात श्रीद्रौपदीच्या अपमानासाठी महाभारत युद्ध घडवणार्या नि शत्रुची मांडी चिणून ह्रदयाची शकलं करून ते अरिशोणित प्राशन करणारा *महाबली महापराक्रमी महाभारताचा नायक असा श्रीभीम...*

आजीवन अखंड ब्रह्मचारी नि ब्रह्मचर्याचे सर्वोत्तम आदर्श बुद्धिमतां वरिष्ठम् असे *उर्ध्वरेतस् श्रीहनुमंतराय...*

शापादपि शरादपि असे भगवान *श्रीभार्गवराम अर्थात श्रीपरशुराम...*

अखिल विश्वासाठी पसायदान मागणारे, मातृवत् आळंदीवल्लभ असलेले, वयाच्या अवघ्या बाविशीतंच संजीवन समाधी घेणारे *कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्रीज्ञानोबाराय*

म्हणोनिं आम्हीं रामदास असं म्हणून आजीवन अखंड ब्रह्मचर्य पालन करून म्लेंच्छांच्या विरोधांत राष्ट्रीयत्वाचं बीज पेरणारे *राष्ट्रगुरु समर्थ श्रीरामदास...*

मा अभिः नि कृण्वन्तो विश्वमार्यम् म्हणत अवघ्या आर्यावर्तांस नि अखिल विश्वासंच वेदांकडे वळविणारे कडकडीत ब्रह्मचर्य पालन केलेलं नि समाधी अवस्था प्राप्त केलेलं सर्वोत्कृष्ट *वेदभाष्यकार ऋषि श्रेष्ठ महर्षि श्रीदयानंद*

उत्तिष्ठत् जाग्रत् हा उपनिषदांचा तेजोमयी संदेश उद्घोष करून सर्व विश्वभर वैदिक धर्माचा डिंडिम वाजविणारे *विश्वदिग्विजयी श्रीमत् स्वामी विवेकानंद...*

महर्षि दयानंदांचा सत्यार्थ प्रकाश वाचून आजीवन अखंड ब्रह्मचर्याची दीक्षा घेऊन अवघं जीवन राष्ट्रस्वातंत्र्याच्या कार्यांत अर्पण करणारं *श्रीरामप्रसाद बिस्मिल...*

विद्यमान अशी पंतप्रधान *श्री नरेंद्र मोदी नि परमादरणीय श्रीसंभाजीराव भिडे गुरुजींसारखी नैष्ठिक ब्रह्मचर्याश्रमी नि उर्ध्वरेतस* अशी व्यक्तित्वं...

किती नि कशी कशी नावं घ्यायची???

ह्या राष्ट्रांस ब्रह्मचर्याची दीक्षा देणारी अगणित नि तितकीच तेजस्वी व्यक्तिमत्वं जन्मांस आली नि स्वकर्तृत्वाने त्यांनी दिगदिगांतरांत आपली कीर्ती प्रसृत केली.

त्याच ह्या राष्ट्रांत आज दिवसाढवळ्या माताभगिनींवर अत्याचार होतात, बलात्कार होतात.

कारण...

कारण आम्ही आमचे हे आदर्श विसरलो...

हिंदुंना ह्या इतिहासाचा झालेला विसर हेच ह्या पतनाचे कारण आहे...!

यद्यपि हे अत्याचार करणारे बव्हतांश अहिंदु असले तरीही हिंदुही ह्यातंच आहेतंच काही.

*वयाची पहिली पंचविशी नैष्ठिक ब्रह्मचर्य पालन करून पश्चातची पंचविशी गार्हस्थ्य ब्रह्मचर्य पालन करणार्या इतिहासकालीन भारतीयांना आपल्या ह्या आदर्शांचा झालेला विसर हेच आमच्या पतनाचे कारण नव्हे काय???*

*शारीरिक सुखोपभोग आवश्यक आहेतंच. पण त्यातही संयम नि स्वस्त्री सोडून परदारेविषयी मातृभाव हे आम्ही विसरलो...*

आणि म्हणूनंच आमचं हे पतन...

ह्यांस आळा घालायचा असेल तर उपरोक्त शीर्षक आचरावं लागेल. यद्यपि उपरोक्त वचन श्रीलक्ष्मणाच्या मुखातलं नि उत्तरकांड ह्या श्रीवाल्मीकि रामायणांतल्या प्रक्षिप्त भागांतलं असलं तरी ते चिंतनीय आहे.

*ब्रह्मचर्याचा आदर्श माता-पित्यांनी पाळला तरंच येणारी पिढी संयमी उत्पन्न होईल. पण आज ब्रह्मचर्य हा शब्द तर अक्षरशः विनोद झालाय. अस्तु।*


*या देवी सर्वभूतेषु म्हणून केवळ नवरात्रातंच आवर्तने करायची की आजीवन ते व्रत पालन करायचं???*

चाणक्याच्या भाषेंत

*जन्ममरणके बन्धनोसें मुक्त होनेकी अपेक्षा करनेहारे भारतीय क्या इस स्वैराचार का स्वीकार करेंगे??? कदापि नहीं।*

कृपया विचार व्हावा ही नम्रतेची विनंती...!

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#ब्रह्मचर्य_इंद्रियसंयम_बलात्कार_स्त्रीसुरक्षा_भारतीय_जीवनादर्श

No comments:

Post a Comment