Friday 20 November 2015

मनुस्मृती नि मांसभक्षण - एक चिकित्सक अभ्यास !



हिॅदुधर्मग्रंथांचा अभ्यास करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने आढळून येते ती म्हणजे क्वचितच आढळून येणारी विसंगती ! मांसभक्षणासंदर्भात तर ही विसंगती बर्याच अंशी दिसून येते ! काही ठिकाणी मांसाचं समर्थन असतं तर त्यातल्याच दुसर्या एका अध्यायात त्याचा पूर्ण निषेध असतो. आता ही विसंगती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून प्रक्षेप आहे. मनुस्मृती हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण !

मनुस्मृती इतकी प्रक्षिप्त आहे की ती वाचली की खरंच पटतं ! कारण तीन चार श्लोक असे असतात की ते एका ठिकाणी मांसाचे समर्थन करतात पण पुढच्याच येणार्या श्लोकात त्याचा निषेध असतो ! आणि हे केवळ मांसाशी संबंधित नाहीये तर इतरही अनेक विकृत गोष्टींशी संबंधित आहे ! अनेक उदाहरणे देता येतील पण विस्तारभयातस्व केवळ मांसभक्षणाच्या आरोपांचा नि प्रक्षेपांचा इथे विचार करूयात !


न मांसभक्षणे दोषो न मद्ये न च मैथुने ।
प्रवृत्तिरेषा भूतानां निवृत्तिस्तु महाफला॥
मनुस्मृति ५/५६

अर्थ - मांसभक्षणात दोष नाही व मद्य व मैथूनातही(व्यभिचारातही) दोष नाही ! कारण सर्वसामान्य  मनुष्याची ही स्वाभाविक प्रवृत्ती असते. पण ह्यातून निवृत्त म्हणजे परावृत्त होणं हेच श्रेयस्कर !

इथे अनेकजण दोष नाही असं समजून मांसमदिरामैथूनादि कृत्यांचं समर्थन आहे असा समज करतात पण हे श्रेयस्कर नाही हे स्पष्टपणे सांगितल्याचं मात्र लक्षात घेत नाहीत. असे काही मांससंमर्थक श्लोक असून मांसाचा आरोप करणारे ह्याचाच नेहमी संदर्भ देतात ! वस्तुत: हा श्लोक प्रक्षिप्त आहे ! त्याची कारणे खालीलप्रमाणे !

पूर्ण मनुस्मृती वाचली तर हा श्लोक प्रक्षिप्त आहे असं कळतं ! कारण हीच मनुस्मृती इतर ठिकाणी मांसाहाराची किॅवा प्राणीहत्येची किती कठोर शब्दात निंदा करते ते पाहुयात. उदाहरण खालील वाचा

दुसरा अध्याय पाहु

वर्जयेन् मधुमांसं च प्राणिनां चैव हिंसनम् !
२.१७७

अर्थ - मद्यपान, मांसभक्षण व प्राणीमात्रांची हिंसा ह्या सर्वाचा त्याग करावा.

चौथा अध्याय म्हणतो

हिॅसारतश्च यौ नित्यं नेहासौ सुखमेधचे !
४.१७०

अर्थ - जो नेहमी हिॅस्र कर्मांमध्ये रत असतो त्याला ह्या संसारात कधीही सुख प्राप्त होत नाही.

पाचव्या अध्यायात हीच मनुस्मृती म्हणते

योsहिॅसकानि भूतानि हिनस्त्यात्मसूखेच्छया !
स जीवंश्च मृतश्चैव न क्वचित्सुखमेधते !
५.४५

अर्थ - जी व्यक्ती आत्मसुखासाठी म्हणजे स्वत:च्या सुखासाठी "अहिॅसकानि भूतानि" म्हणजे ज्या प्राण्यांची कधीच हिॅसा करणे योग्य नाही अशा प्राण्यांची हिॅसा करतो तो "जीवन च मृत:" म्हणजे जिवंतपणी व मेल्यावरही कधीही क्वचित देखील सुखास प्राप्त होत नाही.

आता पुढचा आणखी श्लोक

नाकृत्वा प्राणिनां हिॅसा, मांसमुत्पद्यते क्वचित् !
न च प्राणिवध: स्वर्ग्य: तस्मान्मांसं विवर्जयेत !
५.४८

अर्थ - प्राणीमात्रांची हिॅसा न करता कधीही मांस प्राप्त होत नाही आणि प्राणीवध कधीही स्वर्ग्य म्हणजे सुखदायक होत नाही ! म्हणून "मांसं विवर्जयेत्" म्हणजेच मांसाचा त्याग करावा !

पुढे म्हणते

समुत्पत्तिं च मांसस्य वधबन्धौ च देहिनाम् !
प्रसमीक्ष्य निवर्तेत सर्वमांसस्य भक्षणात् !
५.४६

अर्थ - मांसाची उत्पत्ती जशी होते तसे प्राणीमात्रांचा वध आणि बंधाचे कष्ट पाहून सर्व प्रकारच्या मांसभक्षणापासून दूर रहा !

इथे सर्वप्रकारच्या मांसभक्षणापासून दूर रहा असं किती ठामपणे सांगितलंय व प्राणीमात्रांना होणारी वेदना किती स्पष्ट शब्दात सांगितली आहे पहा बरे !

आता पुढचेच उदाहरण घेऊ ! ह्या श्लोकात मांसभक्षण प्रसंगात आठ प्रकारच्या पापी लोकांची गणना कशी केली आहे ते पाहु ! ते आठ पापी खालीलप्रमाणे !

अनुमन्ता विशसिता निहन्ता क्रयविक्रयी !
संस्कर्ता चोपहर्ता च खादकेश्चेति घातका: !
५.५१

अर्थ - अनुमन्ता म्हणजे मारण्याची आज्ञा देणारा, विशसिता म्हणजे मांस कापणारा, निहन्ता म्हणजे पशुहत्या करणारा, क्रयविक्रयी म्हणजे तिची खरेदी विक्री करणारा, संस्कर्ता म्हणजे ते मांस अन्न म्हणून शिजविणारा, उपहर्ता म्हणजे ते दुसर्याला वाढणारा व खादक: म्हणजे ते मांस खाणारा हे आठ जण "इति घातका:" म्हणजे हे सर्व घातकी आहेत ! ह्याचाच अर्थ पापी आहेत !

आता एवढा पुरावा देऊनही कुणी म्हणेल की मनुस्मृती मांससमर्थन करते तर काय करावे??? कारण ह्यातला कुठला श्लोक प्रमाण मानायचा??? मांससमर्थनाचा की मांसनिंदेचा??? पाचव्या अध्यायात श्राद्धाच्या वेळी मांसभक्षणाचे जे काही संदर्भ आहेत ते सर्व प्रक्षेपच नाहीतर काय म्हणायचे ???थोडक्यात समर्थनाचे श्लोक प्रक्षिप्त आहेत हे लहान पोराला देखील कळेल !

हाच नियम मनुस्मृतीतल्या इतर विकृतींना लावला तर मनुस्मृतीवरचे शिव्याशाप कमी होतील. पण हे करायला कुणी तयारच नाही. पाश्चिमात्य हे करत होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आर्य समाजानेदेखील हे केले आहे. सर्वप्रथम महर्षी दयानंदांनी हा प्रयत्न केला होता. त्यांच्या नंतर प्रा. डॉ. सुरेन्द्र कुमार ह्यांनी "विशुद्ध मनुस्मृती" ह्या संशोधनपर ग्रंथाची निर्मिती करुन एक अप्रतीम कार्य करून ठेवले आहे. www.archive.org ह्या संकेत स्थळांवर त्यांची मनुस्मृती उपलब्ध आहे. त्यांच्या मते वर्तमान मनुस्मृती मध्ये २६८५ श्लोकांपैकी १४७१ श्लोक प्रक्षिप्त आहेत व राहिलेले १२१४ श्लोक हे विशुद्ध आहेत. त्यांच्या मते खालील मांसभक्षणाचे श्लोक प्रक्षेप आहेत

अध्याय पाचवा - श्लोक क्रमांक ११ ते ४७ (श्राद्ध करताना मांस भक्षण)
तिसरा अध्याय - श्लोक क्रमांक १२२ ते २६४

आता प्रक्षेप कसे ओळखायचे हा प्रश्न उरतो - त्याचं समाधान

या वेदबाह्या: स्मृतय: याश्च काश्च कुदृष्टय: !
सर्वास्ता: निष्फला ज्ञेयास्तमोनिष्ठास्तु ता: स्मृता: ! मनु- १२-९६

अर्थ - ज्या स्मृत्या वेदबाह्य आहेत, त्या सर्व कुदृष्टय: म्हणजे वाईट दृष्टीने आलेल्या आहेत, त्या सर्व तमोगुणातून आलेल्या असल्यामुळे सर्वच्या सर्व निरर्थक आहेत !

याबाबतीत विवेकानंदांचं मतही प्रमाण आहे ! स्वामीजींनी भारतीय व्याख्याने म्हणजेच कोलंबो ते अल्मोरा व्याख्यानांच्या शेवटच्या व्याख्यानात हेच प्रतिपादन केलंय ते म्हणतात

"हे वेद म्हणजेच आपले प्रमाणभूत ग्रंथ आहेत व प्रत्येकाला त्यांतील ज्ञान मिळवण्याचा अधिकार आहे......
जोवर वेदांशी सुसंगत आहेत तोवरच स्मृति, पुराणे व तंत्रे यांना मान्यता देणें बरोबर आहे व जेथे म्हणून त्यांचा वेदांशी विरोध येईल तेथे ती अप्रमाण म्हणून त्याज्य मानली पाहिजेत ! पण आज आपण पुराणांना वेदांहून अधिक उच्च अधिकाराचे स्थान दिले आहे ! पण सेवक धन्यावर सत्ता गाजवूं शकेल काय???"

संदर्भ - पृष्ठ क्रमांक ४४३ - खंड पाचवा - स्वामी विवेकानंद शतवार्षिक जयंती स्मारक ग्रंथ

इतका जाहीर नि कठोर निषेध वेदबाह्य स्मृतींचा आहे !

आता वेदबाह्य का म्हटलं ??

कारण वेद भगवान कुठेही मांसाहाराचं समर्थन करत नाही !
संदर्भ

मा हिंसात् सर्वभूतानि ! अथर्ववेद

अर्थ - कोणत्याही प्राणीमात्राची हिंसा करु नका

अथर्ववेद तर स्पष्टपणे सांगतो की प्राणीमात्राची हिॅसा केली तर काय दंड करावा ते खालीलप्रमाणे

अथर्ववेद - १/१६/४

यदि नो गां हंसि यद्यश्वं यदि पुरुषम् !
त्वं त्वा सीसेन विध्यामो यथा नोsसो अवीरहा !

अर्थ - जर तु आमच्या गाय, घोडे व पुरषांची हत्या केलीस तर आम्ही तुला शीष्याच्या गोळीने विद्ध करु ! ज्यामुळे तु आमच्या वीरांचा वध करु शकणार नाहीस !

एवढं स्पष्ट सांगूनही काही लोक वेदांत पशुहत्येचं समर्थन आहे असं म्हणतात त्याच्या बुद्धीहीनतेला काय म्हणावं??

कारण वेद भगवान एकाठिकाणी हिॅसा करु नका असं सांगेल व दुसर्या ठिकाणी ती करा असं सांगेल असं शक्य तरी आहे का? आणि जर तसं असेलही तर ते नंतरच्या काळात निर्माण झालेल्या गृह्यसुत्र, धर्मसुत्र, श्रौतसूत्रे वगैरेत आहे. तो तेवढा भागही प्रक्षिप्तच कारण ती गृह्यसुत्र किंवा धर्मसुत्रंही इतरठिकाणी स्पष्ट शंब्दांत प्राणीहत्या व मांसभक्षणाची निंदा करतात. म्हणजेच एखादा श्लोक मांससमर्थक असतो पण इतर ठिकाणी त्याची कठोर निंदा असते आणि मी वर सांगितल्याप्रमाणे जिथे जिथे असे विकृत संदर्भ मिळतात ते सर्व मागाहून घुसडले गेलेल प्रक्षिप्त श्लोक आहेत हेच सिद्ध होतं !

आंबेडकरांचाच मनुस्मृतीबाबतचा पुरावा

मनुस्मृती ही प्रक्षेपांची सर्वात मोठी खाण आहे दुर्देवाने ! म्हणूनच तर आंबेडकर सुद्धा स्पष्ट म्हणतात.

"मनु के कालनिर्णय के प्रसंग मे मैने संदर्भ देते हुए बताया था की मनस्मृती का लेखन ईसवी सन पूर्व १८५, अर्थात पुष्यमित्र शृंग की क्रांति के बाद सुमति भार्गव के हाथों हुआ था ! "

संदर्भ - आंबेडकर समग्र वांग्मय हिंदी - खंड ७वा - पृष्ठ क्रमांक ११६

थोडक्यात वर्तमान मनुस्मृती ही इसवीसन पूर्व १८५ मध्ये रचली असून ती मुळ स्वायंभूव मनुची नाही हे आंबेडकर सांगतात. ह्याबाबतीत ते पुढे म्हणतात

"वर्तमान मनुस्मृति से पूर्व दो अन्य ग्रंथ विद्यमान थे ! इनमें एक मानव अर्थशास्त्र अथवा मानव राजशास्त्र अथवा मानव राजधर्मशास्त्र के नाम से एक पुस्तक बताई जाती थी ! एक अन्य पुस्तक मानव गृह सुत्र के नाम से जानी जाती थी ! विद्वानों ने मनुस्मृति की तुलना की है !  महत्वपूर्ण विषयों पर एक ग्रंथ के उपबंध दुसरे ग्रंथ से केवल असमानही नहीं हैं अपितु दुसरे ग्रंथ मे दिए उपबंधों से प्रत्येक दशा में भिन्न हैं !

संदर्भ - पृष्ठ क्रमांक १५२ - खंड सातवा

आता ह्यावरूनच वर्तमान मनुस्मृती ही
की ज्यामध्ये प्रचंड प्रमाणात प्रक्षेप आहेत, ती मुळ मनुस्मृतीपेक्षा भिन्न आहे हे बाबासाहेबच सांगताहेत.

आता हिची अशी विकृत प्रक्षेपासहित रचना कुणी केली ह्याबाबतीत बाबासाहेबांचं मत अभ्यासणं आवश्यक आहे. ते म्हणतात

"लगभग चौथी शताब्दी में नारदस्मृति के लेखक को मनुस्मृति के लेखक का नाम ज्ञात था ! नारद के अनुसार सुमति भार्गव नाम के एक व्यक्ति थे जिन्होंने मनु संहिता की रचना की थी ! सुमति भार्गव कोई काल्पनिक नाम नहीं है ! अवश्य ही यह कोई एेतिहासिक व्यक्ति रहा होगा ! इसका कारण यह है कि मनुस्मृति के महाव टीकाकार मेधातिथी का यह मत था कि यह मनु निश्चय ही कोई व्यक्ति था ! इस प्रकार मनु नाम सुमति भार्गव का छद्म नाम था और वह ही इसके वास्तिवक रचयिता थे !"

संदर्भ पृष्ठ क्रमांक १५१ - खंड सातवा

पुढे ते तर स्पष्ट शब्दात सांगतात

"कुछे ऐसे विद्वानों के अनुसार, जिनकी विद्वत्ता पर संदेह नही किया जा सकता, सुमति भार्गव ने इस संहिता की रचना ईसा पूर्व १७० और ईसा पूर्व १५० के मध्यकाल में की और इसका नाम जानबूझकर मनुस्मृति रखा"

संदर्भ - तेच पान क्रमांक १५१

थोडक्यात इथे आंबेडकर स्पष्ट सांगतात की वर्तमान मनुस्मृती ही इसवी सन पूर्व दुसर्या शतकाच्या आसपास रचली गेली असून ती मुळ मनुस्मृतीहून भिन्नच आहे ! थोडक्यात ह्या विकृत प्रक्षेपांची रचना सुमति भार्गव नावाच्या व्यक्तीने केली असून ती मुळ स्वायंभूव मनुची रचनाच नाही !

म्हणजेच आंबेडकरांचा विरोध ह्या प्रक्षिप्त स्मृतीस आहे लहान मुलाला देखील पटेल !

आता एवढं स्वच्छ सांगूनही लोकांना जर कळत नसेल तर आम्ही काय करावे????