Wednesday 9 October 2019

धर्मजिज्ञासेंत वेदंच सर्वोच्च प्रमाण


*धर्मजिज्ञासमानानां प्रमाणं परमं श्रुतिः।*
मनुमहाराज

धर्मजिज्ञासेमध्ये श्रुती अर्थात वेद(च) प्रमाण आहे...

हा लेख केवळ नि केवळ धर्मजिज्ञासा ह्याविषयी काय प्रमाण मानावं येविषयीं आहे.

कुणी काय प्रमाण मानावं हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय पण आमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये आम्ही वेदांच्या चार संहिताच सर्वोच्च नि एकमेव प्रमाण मानतो. त्यात यजुर्वेदाचा केवळ शुक्ल यजुर्वेदंच. कृष्ण मूळीच नाही.

आम्ही आमची सैद्धांतिक प्रमाण विचारधारा स्पष्ट करताहोत.
आम्हांस वेद अर्थात श्रुतीच आयुष्यांत सर्वोच्च नि एकमेव प्रमाण आहे.

वेद हे मानवसृष्ट्यारंभी ईश्वराने मनुष्यांस प्रदत्त ईश्वरीय ज्ञान आहे जे संहितारुपी आहे. आमच्या ऋषिमूनींवर आमचा पूर्ण विश्वांस आहे.

ह्या वेदांना आकळणं कठीणांत कठीण असल्याने ह्या अष्टधा विकृतीने संरक्षित अशा अपौरुषेय चतुर्वेदांवर आमच्या प्राचीन ऋषीमूनींनी जे आर्ष ग्रंथ निर्माण केले, त्यामध्ये वेदांवरील व्याख्यानरुपी ग्रंथ असे ब्राह्मणग्रंथ की जे पौरुषेय साहित्य आहे, भले सनातनी परंपरेत त्यांस अपौरुषेय वेद मानण्याची परंपरा असेलही, त्याचं खंडनही झालंच आहे, पण असो. ह्याच ब्राह्मणग्रंथांचा भाग असलेली अशी एकादशोपनिषदे, आरण्यके आदि आर्ष ग्रंथ. तसेच कल्पसाहित्य अर्थात सर्व सूत्र ग्रंथ, सर्वानुक्रमणिका, प्रातिशाख्य ग्रंथ वगैरे वगैरे वैदिक साहित्याशी संबंधित विचार...

ह्यातंच पुढे आली ती षड्वेदाङ्गे नि त्यावरील आर्षग्रंथ, षड्दर्शने नि त्यावरील उपलब्ध व्यास-शबप-वात्सायनादिंची आर्ष भाष्ये...

ह्यात कालक्रमाच्या दृष्टीने मागे-पुढे झाले असेल तर क्षमस्व...

असा एकुण वैदिक साहित्याचा विस्तार आहे.

अन्य सर्व ग्रंथ आर्ष अर्थात ऋषिमूनिकृत की ते जे नि जितके वेदानुकूल आहेत, तितकेच ते आम्हांस प्रमाण आहेत. मग ते कुणाचेही असोत. कुणाचेही. कुणाचेही...!

चार वेद हे स्वतः प्रमाण आहेत हे सर्वच शास्त्रकारांचे मत असल्याने त्यांविषयी काही संदेहंच नाही. त्यामुळे त्यांना इतर प्रमाणांची आवश्यकताच नाही.

अन्य सर्व ग्रंथ हे परतः प्रमाण असल्याने ते वेदानुकूल तितकेच प्रमाण आहेत.

धर्मशास्त्राध्यनाच्या दृष्टीने ही ग्रंथमाला आम्हांस प्रमाण आहे व्यक्तिशः. व्यक्तिशः हा शब्द महत्वाचा आहे.

सुदैवाने ह्या सर्वांचं आमचं अध्ययन गेल्या सहा-सात वर्षांत झालेलं असल्याने नि ते आयुष्यभर अगदी आमरण सुरुच राहणार असल्याने वेदांविषयी आमची निष्ठा ही अशी आहे. ह्यात कालत्रयीही परिवर्तन होणार नाही.

ह्याचा अर्थ धर्मशास्त्रासंबंधी किंवा अध्यात्मासंबंधी उपरोक्त साहित्य सोडून अन्य कोणत्याही ग्रंथांचा आम्ही धिक्कार करतो किंवा त्यांस नाकारतो असे मूळीच नाही. त्या अन्यसर्व ग्रंथांमध्ये किंवा साहित्यामध्ये जे जे वेदानुकूल किंवा वैदिक सिद्धांतांच्या अनुकूल असेल, तितकं आम्ही ग्राह्य समजतो. नाही ते त्याज्य समजतो...!

मग त्या स्मृत्या असोत, रामायण-महाभारतासारखे ग्रंथराज असोत किंवा अगदी पुराणादि साहित्य असो...

हे सर्व वेदानुकूल नि वैदिक सिद्धांतानुकूल तेवढेच आम्हांस ग्राह्य आहे.

ही आमची भूमिका आमरण अशीच राहील...

ह्याची कारणमीमांसा आम्ही पूर्वीही स्पष्ट केलीय तरीही पुनश्च सांगतो...

महाभारतकालापर्यंत तरी हे राष्ट्र वेदांनाच सर्वोच्च प्रमाण मानत होते. महाभारतकाली आज जे परस्परविरोधी संप्रदाय विद्यमान आहेत, त्यातल्या एकाचाही लवलेश आपल्याला दिसत नाही. म्हणजेच महाभारतकालापश्चातंच वेदांचा त्याग झाल्याने हे सर्व विविध संप्रदाय नि विचारधारा उगम पावल्याहेत हे लक्ष्यीं येतं. जर आपण पुन्हा वेदांकडे वळलो तर आपल्यातले सर्व मतभेद नष्ट होऊन एकवाक्यता येईल...
पण दुर्भाग्य असे आहे की कुणालाच हे नकोय...अस्तु।

काही जण शंका घेतील की अशाने हिंदु धर्म अब्राहमिक पैशाच पंथांसारखा एकग्रंथी होईल...

अशांना आम्ही विचारु इच्छितो की वेद हे सर्व मानवजातीसाठीच नव्हे तर विश्वासाठी कल्याणप्रद आहेत. वेदांची तुलना अन्य टुकार ग्रंथांशी करणे ह्यासारखा अविवेक नाही. हिंदुंनी प्रत्येकाचे आपलं वेगळं मत मांडल्याने इतिहासापासून आजपर्यंत काय गोंधळ उडालाय हे आम्ही वेगळं सांगायची आवश्यकता नाही.

आणि हाच न्याय भारतीय राज्यघटनेला लावला तर कसे होईल???

आम्ही भारतीय राज्यघटनाही इतर विषयांत प्रमाण मानतोच पण धर्म जिज्ञासेंत ती काहीच मार्गदर्शक नाही. नाहीच...
आणि हो..स्वयंघोषित कथित अर्ध्या हळकुंडात पिवळ्या झालेल्या बुद्धिवाद्यांनी तर इकडे येऊही नये.

आम्ही केवळ आमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी हे सांगितलं. तुम्हीही हेच मानावं असा आमचा अट्टाहास तर मूळीच नाही. प्रत्येकाचे विचारस्वातंत्र्य...

केवल एकंच विनंती की उपरोक्त साहित्य स्वतः मूळात न अभ्यासता आम्हाला कुणी शिकवायला येऊ नये...यायचंच असेल तर सप्रमाण नि ससंदर्भ या...स्वागतंच आहे...!

हे प्रथम आणि अंतिम...ह्यांस कुणी आमचा अहंकार समजला तरी चालेल... !

यदि वेदाः प्रमाणं स्युः जीवेयं।
श्रीकुमारिलभट्टपाद

अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु।
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
#वेदप्रामाण्य_धर्मजिज्ञासा_उपनिषदेआरण्यके_रामायण_महाभारत_राज्यघटना

Tuesday 8 October 2019

*बलात्कारी आणि स्त्रीद्वेष्ट्या रावणाचे सत्यस्वरुप*



रावण नेमका कोण होता ते पाहुयांत.

स्त्रियांचे अपहरण करणारा नि ऋषिमूनींची हत्या करणारा रावण👇🏻

बालकांड - सोळावा सर्ग - श्लोक ७वा



यज्ञ नष्ट करणारा रावण👇🏻

बालकांड - विसावा सर्ग - १८-१९वा श्लोक



रावण सीतेला मारण्यासाठी तिच्यावर तलवार घेऊन गेला👇🏻
रावणाचे सीतेला अभद्र नि अर्वाच्य शब्द बोलणं👇🏻

युद्धकांड ९२वा सर्ग - ३४ ते ४० वा श्लोक आणि ४४ ते ४८वे श्लोक


ब्राह्मणांचा आत्यंतिक हत्याकांड करणारा रावण👇🏻

अरण्यकांड ३२वा सर्ग - २०-२१वा श्लोक


रावणाने अनेक स्त्रिया उचलून आणणे👇🏻

अरण्यकांड - सर्ग ४७, श्लोक २८


रावणाने सीतेचे बलात्काराने नि क्रूरपणे अपहरण करणं👇🏻

अरण्यकांड ४९वा सर्ग - १५-२०वा श्लोक



रावणाने आपल्या सूनेवर रंभेवर केलेला बलात्कार👇🏻

उत्तरकांड २६ वा सर्ग - २८-२९वा श्लोक, ४२-४३वा श्लोक




रावणाने अनेक स्त्रियांचे अपहरण करणं 👇🏻

उत्तरकांड - २५वा सर्ग - १४-१७ श्लोक




रावणाने आपल्या बहिणींस म्हणजे शूर्पणखेंस विधवा केलं. तिच्या नवर्याचा तरवारीने वध केला.

उत्तरकांड २३वा सर्ग - १८वा श्लोक


असा हा रावण होता.


*संलग्न चित्रे आहे त्यात सर्व संदर्भ पहावेत ही विनंती.*

संदर्भ - गीताप्रेस गोरखपूरचे वाल्मीकि रामायण भाष्य

पाखण्ड खण्डिणी 
Pakhandkhandinee.blogspot.com

#बलात्कारीरावणाचेसत्यस्वरुप_दसरा_विजयादशमी_रावणदहन_रामायण

Thursday 3 October 2019

*Gandhi, as a Political leader, has failed - Subhash Chandra Bose*



Part - One

It may sound ludicrous although it is not at all far from the truth that Gandhi was no doubt the most failed politician of our nation. Many of his contemporaries have described him as such. Ambedkar is one of such staunch crtitic. But it is more surprising that the same admonition comes from a man none other than Shri Subhash Chandra Bose. Shri Subhash Chandra Bose, one of the greatest freedom fighters of all times, who having been expelled from Congress Presidency for six years and many times insulted by Gandhiji and Congies, has criticized Gandhi's political career in harsh words.While appreciating some positive aspects of Gandhian leadership, Subhash was also critical of some negative aspects of Gandhiji's stewardship.Although he revered Gandhiji as Mahatma and Father of Nation too, his criticism was so sharp that he he called *Gandhi a complete political misfit.* In his famous autobiography titled *"The Indian Struggle -1920-1942* published by Asia Publishing House, Mumbai in 1964, he vehemently declared Gandhi as a lunatic. Chapter 16 of the book deals with the title *"The Role of Mahatma Gandhi in Indian History*" wherein he has vividly contemplated on the political ideas of Gandhi. In his own words...

*"Born in another country he might have been a complete misfit. What, for instance, would he have done in a country like like Russia or Germany or Italy. His doctrine of non-violence would have led him to the cross or to the mental hospital."*

Page no. 292 - ibid...

*Gandhi - a failed politician*

Subhash Bose has sternly criticised Gandhi as a failed politician. On sudden suspension of Civil Disobedience Movement by Gandhiji, Subhash retorts..

*“The events of the last thirteen years have demonstrated that a political warfare based on the principle of maximum suffering for ourselves and minimum suffering for our opponents cannot possibly lead to success. It is futile to expect that we can ever bring about a change of heart in our rulers merely through our own suffering and by trying to love them. And the latest action of Mahatma Gandhi in suspending the Civil Disobedience Movement is a confession of failure as far as the present method of the Congress is concerned. We are clearly of the opinion that as a political leader Mahatma Gandhi has failed. The Time has therefore, come for a radical reorganisation of the Congress on anew principle and with a new method.*

Page no. 357 - The Indian Struggle - 1920-1942

Subhash had his first meeting with Mahatma Gandhi on July 16th,1921, at Mani Bhavan in Bombay. He asked a number of questions regarding the non-cooperation movement of Gandhiji. Subhash did not feel satisfied with the replies of Gandhiji. He felt that there was a deplorable lack of clarity in the plan which Gandhiji had formulated.  Gandhiji himself did not have a clear idea of the successive stages of the campaign which would bring India to him cherished goal of freedom. The sudden suspension of Non-cooperation movement by Gandhiji in February 1922 also led Subhash to put following resentment

*"To sound the order of retreat just when public enthusiasm was reaching the boiling point was nothing short of a national calamity".*

Ibid - page no. 69-74

Subhash Bose again quoted Bar. Chittaranjan R. Das as saying that

*"the Mahatma opens a campaign in a brilliant fashion, he works it up with skill, he moves from success to success till he reaches the zenith of his campaign but after that he loses his nerve and begins to falter."*

Ibid - page no. 70

Subhash Bose attributed the failure of non-cooperation to Gandhiji's faulty strategy. He said that

*"The promise of Swaraj within one year was not only unwise but childish."*

Remaining criticism we shall see in next article.

Till then, stay tuned...

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#SubhashChandraBose_Gandhi_failedpolitician_criticism_Noncooperation_Swaraj_CivilDisobedience