Monday 23 September 2019

*तथाकथित आर्याक्रमण किंवा स्थलांतर नि भारतीयांची वैचारिक दारिद्रता*


*हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं।*
*तत्वं पृषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये।*

ईशावास्योपनिषद - १।१।१५

गेली एकवीस वर्षे इतिहासाचा अभ्यास करतोय. शाळेत असल्यापासूनंच...आपण सर्वंच करताहोत. एकंच गोष्ट सतत ऐकतोय नि वाचतोय....

आर्य बाहेरुन आले किंवा त्यांचे स्थलांतर झालं...???????

किती दिवस हे मिथ्यावचन???

*वैचारिक दारिद्रता नि परदास्यता हा भारतीयांचा गेल्या तीन शतकांतला जणु स्थायीभाव बनला आहे. कुणीही यावं, काहीही लिहावं आणि आम्ही ते प्रमाण मानावं. पाश्चात्यांनी भारतीय इतिहासांवर संशोधन करावं नि आमचे डोळे दिपून जावेत. अहाहाहाहाहा. त्यांचा हेतु काय होता तेही आम्ही न अभ्यासावं. काय दरिद्रता असावी एका देशाची? हेच कार्य आमच्या एतद्देशीय विद्वानांनी कुणी केलं तर मात्र तो आमच्या विचारधारेचा नाही म्हणून आम्ही त्याला अनुल्लेखानेच टाळावं.*

*किती दिवस पाश्चात्यांना आम्ही बुद्धी गहाण टाकणाराहोत?*

स्वत्व-स्वाभिमान नि तज्जन्य स्वयंप्रज्ञेचा विनाश झालेल्या भारतीयांनी आपल्या प्राचीन परमोज्वल इतिहासाकडे परकीयांच्या द्वेषपूर्ण नि पक्षपाती दृष्टी असलेल्या उपनेत्रांतूनच पहावेत ह्यापेक्षा शोकांतिका ह्या राष्ट्राची काय असु शकते ? काही सन्माननीय अपवाद, होय अगदी काहीच असे अपवाद वगळता, इथल्या सर्वच विद्वानांची नि राष्ट्रपुरुषांची बुद्धी ही परकीयांना इतकी दास्यभावाने कशी काय आत्मविस्मृतीने बद्ध होते हे अनाकलनीय आहे. बाबा वाक्यं प्रमाणं ह्याप्रमाणे *मैक्स वेबर अथवा मैक्सम्युलर, विल्यम जोन्स, व्हिन्सेंट स्मिथ वाक्यं प्रमाणं* ही इथली शोकांतिका कशी काय असु शकते?

*दीड-दोनशे वर्षांपूर्वी माथी मारलेला थोतांड आर्याक्रमण सिद्धांत*

*केंब्रिज हिस्टरी ओफ इंडियाच्या* माध्यमांतून नि मैक्सम्युलरच्या पन्नास खंडात्मक विकृत साहित्यातून ब्रिटीशांनी 'फोडा आणि राज्य करा'साठी आमच्या माथी मारलेला हा विभाजनकारी सिद्धांत अद्यापही पाठ्यपुस्तकांतून अध्ययनांस प्राप्त होतो ह्यापेक्षा शोकांतिका ती काय? आपल्या एकाही धर्मग्रंथात कुठेही आर्य बाहेरुन आल्याचा पुसटसाही उल्लेख नाही. काही पढतमूर्ख लोक वेदांमध्ये आर्य-अनार्य हा कथित ऐतिहासिक वाद शोधण्याचा एक बालिश प्रयत्न करतात. ह्यांची कीव जितकी करावी तितकी थोडीच. अशांचे स-प्रमाण खंडन खुप पूर्वीच एतद्देशीय पण पाश्चात्यांना बुद्धी गहाण न टाकलेल्या स्वयंप्रज्ञेच्या विद्वानांकडून झालंय. आम्ही आमच्या आठशे पृष्ठांच्या स्वतंत्र ग्रंथांतही हे केलंच आहे. ह्या लेखाच्या माध्यमातून आम्ही सर्वांस उघड आव्हान अर्थात ओपन चेलेंज देतो की वेदांमध्ये कुणीही आर्य-अनार्य हा कथित ऐतिहासिक वाद शोधून दाखवावा व सिद्ध करावा. ज्यांना व्याकरणांतलं वंही कळंत नाही, ते लोक कुणाची तरी पुस्तके वाचतात नि गप्पा ठोकतात. समाजमाध्यमे अर्थात सोशल मीडियावर तर अशांचा भडिमार आहे. आमची बुद्धिमत्ता इतकी लयांस गेलीय का?

*परवर्ती साहित्यातही कुठेच आर्य बाहेरुन आल्याचाही संदर्भ नाही*

वेदांत राहुदे, निदान पुराणांत वगैरे तरी तो असावा कारण ते इतिहासग्रंथ आहेत. तोही नाही. तरीही ब्रिटिश तो माथी मारतात नि आमचे सर्व विद्वान त्याचे एकतर समर्थन किंवा फारतर विरोध करण्यांत जीवनाची इतिकर्तव्यता मानतात. हीच आमची विद्वत्ता ??हीच आमची बुद्धिमत्ता?? हीच आमच्या बुद्धिवैभवाची परिसीमा???

*माणसं ओळखायला आम्ही कधी शिकणाराहोत???*

मैक्सम्युलरसारख्या ख्रिस्ती मिशनर्याला ज्याचा सर्व पत्रव्यवहार आम्ही पूर्ण अभ्यासला आहे, त्याला ब्रिटीशांनी ख्रिस्तीपैशाचपंथाच्या प्रचारासाठी वेदादि साहित्याचा अत्यंत विकृत अनुवाद करायला पाठवलं, ज्याला मरेपर्यंत संस्कृत बोलताही येत नव्हतं, ह्याचे प्रमाण उपलब्ध आहे, त्याला आमचे स्वामी विवेकानंद नि लोकमान्य टिळक सायणाचार्यांचा अवतार घोषित करतात. त्या मैक्सम्युलरने रामकृष्णांचे चरित्र काय लिहायला घेतलं विवेकानंद त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळतात. लोकमान्यांना मैक्सम्युलर डोंगरीच्या कारावासांतून बाहेर यायला सहकार्य काय करतो, लोकमान्य आर्य उत्तर ध्रुवावरून आले असा सिद्धांत मांडतात. त्यांच्या समकालीन पावगी नामक पुण्यातल्याच एका चित्पावनानेच (हेतुपुरस्सर हा उल्लेख) भारतीय साम्राज्य नावाचे चोवीस खंड लिहून नि आर्यावर्तिक होम नावाचा स्वतंत्र ग्रंथ लिहून टिळकांना भेटून हा सिद्धांत खोडूनही टिळक दुराग्रहाने तो मान्यंच करत नाहीत..प्रमाण उपलब्ध आहे...मैक्सम्युलर उत्तरायुष्यांत बदलला खरं पण आधीचे काय ?

*इतकी शोकांतिकाय इथल्या विद्वानांची ????*

*पण टिळकांच्या विरोधांत काही बोलायचं नाही, लिहायचं नाही....का ते महापुरुष होते म्हणून ?*

*विवेकानंदांच्या विरोधांत काही लिहायचं नाही ते विवेकानंद होते म्हणून*

*हे दोन्हीही राष्ट्रपुरुष पूज्यनीय आहेतंच. निःसंशय पण...*

*ही अंधभक्ती नि व्यक्तीपूजा आमच्या पतनाचे कारण हे आमच्या लक्ष्यींही येऊ नयें?*

*माणसं ओळखायला कधी शिकणार आहोत आम्ही???*

*इतिहासातून काहीच शिकायचं नाहीये का ?*

*व्यक्तीपूजेचा नि अंधभक्तीचा त्याग कधी करणाराहोत?*

*चुकीला चूक कधी म्हणणार आहोत?*

*कधी विचार करणाराहोत???*

*आर्याक्रमण किंवा स्थलांतर कधी नाकारणाराहोत???*

*एकटा आर्यसमाज सोडला तर कुणीही हे सर्वप्रथम खोडलेलं नाहीये.*

*ब्रिटीशांना जाऊन ७० वर्षे झाली तरीही स्थितींत काही परिवर्तन नाहीये...*

*नेहरुप्रणीत लाल पावट्या इतिहासकारांनी तर ह्यात आणखी तेल ओतलं नि ओतताहेत...*

आम्हाला जाग कधी येणार?

*भारतीय इतिहासाचे पुनर्लेखन भारतीय दृष्टिकोनातून कधी होणार???*

विचार व्हावा ही विनंती...!

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#आर्याक्रमण_आर्यस्थलांतर_ब्रिटीश_भारतीयइतिहास_लोकमान्य_विवेकानंद

No comments:

Post a Comment