Saturday 24 December 2016

२४ डिसेंबर - मृत्युंजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...!



२४ डिसेंबर, १९१० ! आजपासून १०६ वर्षांपूर्वी याच दिवशी ब्रिटिश सरकारने एका क्रांतिकारकाला ५० वर्षांची काळ्या पाण्याची अंदमानची शिक्षा ठोठावली ! न भूतो न भविष्यति अशी ही शिक्षा होती ! जगाच्या इतिहासात अशी शिक्षा आजपर्यंत फक्त आणखी एकालाच आधी झाली होती व तीही साठ वर्षांची व ती शिक्षा भोगलेल्या मनुष्यांला ह्या दुसर्या शिक्षा भोगणार्या मनुष्याने पाहिलेलेही होते! आणि प्रामाणिकपणे त्याने आपल्या आत्मचरित्रात (माझी जन्मठेप) त्याचा उल्लेखही केला होता. पण आता अशीही शिक्षा भविष्यात कधी कुणाला होईल असं वाटत नाही ! पुढे जाऊन ह्याच क्रांतिकारकाला त्यांनी Most Dangerous (अतिशय घातक) अशी पदवीही दिली. एवढा एकच माणूस मातृभूच्या मुक्ती साठी झटत होता का?? नक्कीच नाही !! मग का धास्ती घेतली ब्रिटिशांनी ह्या क्रांतिकारकाची एवढी??? मग का??? कोण होता हा क्रांतिकारक????

हे होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ! 

क्रांतिकारकांचे मुकुटमणी, क्रांतिकारकंचे कुलपुरुष, महान क्रांतीचे अध्वर्यु, हिंदुराष्ट्रपती हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर ! वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी "सशस्त्र क्रांतीचा केतु उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन. स्वातंत्र्य संपादनासाठी, पारतंत्र्याच्या नाशासाठी, ब्रिटिश साम्राज्याच्या सिंहासनाखालीच सुरूंग लावायचे ठरवले" अशी भीष्मप्रतिज्ञा करणारा हा कडवा स्वातंत्र्ययोद्धा !!! शस्त्र बळावाचून नुसता धर्मविजय पंगु असतो नि धर्मबळावाचून नुसता शस्त्र विजय पाशवी असतो, हे त्रिकालदर्शी नि शाश्वत असं तत्त्वज्ञान सांगणारा हा आक्रांतदर्शी तत्त्वज्ञ !!! दुर्लभं भारते जन्म, मानुष्यं तत्र सुदुर्लभ असं म्हणणारा प्रखर राष्ट्रभक्त !!! उद्या सूर्य विझला तर जगाचे काय होईल ह्याची मला काळजी नाही पण माझ्या हिंदुराष्ट्राचे काय होईल ह्याची मला काळजी आहे असं ठामपणे मांडणारा हिंदुत्वनिष्ठ क्रांतीयोद्धा !!! हिंदुत्व सोडून इंद्रपद जरी मिळाले तरी पहिला हिंदुद्रोही होऊन इंद्रपदी विराजमान होण्यापेक्षा अखेरचा हिंदुत्वनिष्ठ म्हणून लढता लढता मरण पत्करणे योग्य ठरेल, अशी सिंहगर्जना करणारा हिंदुत्ववादी !!! स्वतःला दुसऱ्याच्या जागी कल्पून कर्म करा, म्हणजे हातून दुष्कर्म होणार नाही, हे वैश्विक सत्य केवळ एकमेव हिंदुधर्मच सांगतो, असं ठामपणे मांडणारा कट्टर धर्माभिमानी नि निष्काम कर्मयोगी !!! किती आेळख सांगावी ह्या महापुरुषाची????

पन्नास वर्षे तुमचे ब्रिटिश सरकार तरी राहिल का???

पन्नास वर्षाची शिक्षा ठोठावली तेंव्हा सावरकर गरजले की इतकी वर्षे तुमचे सरकार तरी राहणार का??? इतकंच नव्हे तर ह्या दोन जन्मठेपा सोसण्यासाठी तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागेल असे एेकताच ते पुन्हा गरजले की,
"वाह म्हणजे हिंदुंचा पुनर्जन्माचा सिद्धांत अखेर ख्रिश्चन ब्रिटिशांनी मान्य केलाच !!!"

काय विलक्षण आत्मविश्वास आहे ह्या माणसाला ???

मृत्युंजय दिन म्हणजे काय???

सावरकरांना ठोठावली गेलेली ५० वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा २४ डिसेंबर, १९६० ह्याच वर्षी संपणारी होती. पण सुदैवाने हिंदुस्थान आधीच मुक्त झाला ! हे होणारच होते ! विश्वमानव श्रीमत् स्वामी विवेकानंदांनी सन १८९७ साली हेच भाकीत केलं होतं की येत्या पन्नास वर्षात हिंदुस्थान स्वतंत्र होईल. १९४७ मध्ये ही मातृभू मुक्त झालीच ! १९६० मध्ये म्हणूनच ह्या दिवशी मृत्युंजय दिन साजरा करण्याचे ठरले. कारण सावरकर १९३७ मध्येच पूर्ण मुक्त होऊन ही मृत्युंजयच ठरले. सर्वांना पुरून उरले. पुण्यामध्ये सर परशुरामभाऊ महाविद्यालयामहाच्या प्रांगणामध्ये तात्यारावांचा मोठा सत्कार झाला. संख्येने दीड पावणे दोन लाख असलेल्या अफाट जनसमुदायासमोर वयाची ऐंशी जवळ आलेले सावरकर उभे राहिले. डोक्यातून असह्य वेदनामय कळा येत असूनही १० मिनिटे भाषण करण्यास उभा राहिलेले तात्याराव तब्बल ५५ मिनिटे घनघोर मेघासारखे गरजले. गगनाला उपमा जशी गगनाची, सागराला उपमा जशी सागराची, तद्वतच सावरकरांच्या वाणीला उपमा सावरकरांच्या वाणीचीच ....!




महाराष्ट्र हा हिंदुस्थानचा खड्गहस्त झाला पाहिजे ! 

ह्या चिंतनात सावरकरांनी युवकांना राष्ट्र उभारणीसाठी पुढे येऊन हिंदुराष्ट्र घडवावे असे आवाहन केले. आणि ह्या राष्ट्र उभारणीसाठी महाराष्ट्र हा हिंदुस्थानचा खड्गहस्त झाला पाहिजे असा प्रबळ आशावादही व्यक्त केला. आणि एका दृष्टीने ते खरंपण आहे ! स्वातंत्र्य समरामध्ये सर्वात जास्ती क्रांतिकारकाची परंपरा महाराष्ट्रात नि नंतर बंगालनेच निर्माण केली. पाच पातशाह्या पायदळी तुडवून हिंदवी स्वराज्य हे महाराष्ट्रात शिवछत्रपतींनीच निर्माण केलं ना ! म्हणूनच सावरकरांची ही भूमिका अगदी योग्यच वाटते !!! सावरकरांनी केलेले हे व्याख्यान आज उपलब्ध आहे. ध्वनिमुद्रण स्वरूपात ते जिज्ञासुंना खालील संकेतस्थळावर मिळेल. अवश्य एेका ही विनंती आहे !!!

सेनापती तात्या बापट म्हणूनच अभिमानाने गर्जले

महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले ! 
मराठ्याविना राष्ट्रगाडा न चले ! 
खरा वीर वैरी पराधीनतेचा ! 
महाराष्ट्र आधार ह्या भारताचा ! 

महामानव डाॅ. आंबेडकरांची १२५ जयंती सर्वांना माहितीय पण तात्यारावांचा ५० वा आत्मार्पण दिन ह्याच वर्षी होता हे मात्र सर्वजण सोयीने विसरले ! 

१९३७ च्या मे महिन्यात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे सावरकरांच्या सामाजिक क्रांतीबद्दल म्हणतात 

"सामाजिक क्रांतीपुरतेच सावरकरांचे कार्य मर्यादित राहिले असते तर आणखी पाच वर्षांच्या आत सार्या हिॅदुस्थानमधून अस्पृश्यतेचे साफ उच्चाटण करून दाखवले असते. त्यांचं हे कार्य पाहून माझे ह्रदय भरून आले आहे. परमेश्वराने माझे अर्धे आयुष्य सावरकरांना ह्या कार्यासाठी द्यावे !"

इति महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

हेच उद्गार त्यांनी आंबेडकर किंवा शाहु महाराजांच्या सामाजिक क्रांतीबद्दलच्या चळवळीबद्दल का काढले नाहीत??? पाचच्या ठिकाणी दहा किंवा पंधरा वर्षे लागावीत पण त्यांना हे करून दाखविता आले असते, असे ते का म्हटेल नाहीत??? ते केवळ सावरकरांच्याच बाबतीत हे का म्हटले???

ही गोष्ट आम्हांस नक्कीच विचार करायला लावणारी आहे व सुज्ञांनी अगदी निरपेक्षपणे व डोळे सताड उघडे ठेऊन ह्याचा विचार करायला हवा.अवघ्या पाच वर्षांतच संपूर्ण रत्नागिरी अस्पृश्यता मुक्त करणारा कडवा समाजसुधारक आमच्या महाराष्ट्राला व हिॅदुस्थानाला आठवतही नाही. 




स्वत: चित्पावन कुटुंबात जन्माला येऊनही दीनदलितांबद्दल ह्रदयांत अपार करुणा असणारा हा कृतीशील समाजसुधारक इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात फारसा दिसतही नाही. 

कारण एकच तो ब्राह्नण आहे ! 

जर तो ब्राह्नणेतर असता तर त्याच्यावर अनेकाअनेक ग्रंथ रचले गेले असते. त्याची पुजा शाहु-फुले- आंबेडकरांबरोबरच सावरकरांचा महाराष्ट्र अशी केली गेली असती. पण त्याची "ब्राह्मण" ही ज्ञाती आडवी येते ना ! शेवटी हा महाराष्ट्र फक्त शाहु-फुले- आंबेडकरांचाच पुरोगामी महाराष्ट्र आहे ना ! सावरकर टिळकांचा तो कसा असेल?

अर्थात  जिथे शिवाजी महाराजांना व शंभुराजेंना डावलून, जिथे ज्ञानोबा, तुकोबा, नामदेवराय व इतर संतांना डावलून फक्त शाहु-फुले आंबेडकरच गर्जले जातात, तिथे सावरकर-टिळकांची काय कथा नि व्यथा म्हणा? असो ! हे चालतच राहणार ! 


आणि राज्य किंवा केंद्र सरकारला तर कुठे आठवण आहे? 

कारण संघवाल्यांना सावरकर कसे आठवतील म्हणा ! ज्या बाबारावांनीच आपली तरुण हिंदुसेना संघात विलीन करून संघाला मोठे केलं, त्याच बाबारावांना व सावरकरांना केवळ गुरुजी नामक व्यक्तीच्या हट्टापायी विसरणारा व हिॅदुसभेला पदोपदी संपविण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा संघही तितकाच दोषी आहे हे लिहायला आम्हांस कुणाचीही भीड वाटत नाही. नसता तर संघवाल्यांनी प्रामाणिकपणे आम्ही सावरकरांच्या विचारावर चालतो असे मान्य करावे. अर्थात ते करणारही नाहीतच. 

ह्याचा अर्थ मी संघद्वेष्टा आहे असा कुणी काढला ते बावळटपणाचे लक्षण ठरेल. शेवटी

तुका म्हणे सत्य असत्याशी 
मन केले ग्वाही ! 

पण आम्हांस सर्वच महापुरुष समान अर्थाने प्रिय नि आदरणीय आहेतच ! इतरांना ते नसतील तर नसावेत ! गीतेत म्हटल्याप्रमाणे

समोsहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योsस्ति न प्रिय: ! 

शेवटी तात्यारावांच्या भाषेतच सांगायचे झाले तर

एक देव, एक देश, एक आशा ! 
एक जाति, एक जीव, एक भाषा !!

या मृत्युंजय वीराला विनम्र अभिवादन....!

मृत्युंजय सावरकर की जय !!
हिंदुराष्ट्र की जय !!!
हिंदुधर्म की जय !!! 
जय माँ भारती !!!


© तुकाराम चिंचणीकर