वैदिक विज्ञान नि आधुनिक विज्ञान - समन्वय की अंधविरोध???
ज्या आधुनिक सैद्धांतिक भौतिकीला (Modern theorytical Physics) ज्यामध्ये Cosmology, Astrophysics, Quantum Field Theory, Plasma Physics, Particle Physics, String theory यासर्वांशी संबंधित समस्यांचे निराकरण करता आलेलं नाहीये, ज्या आधुनिक विज्ञानाला सृष्टीनिर्मितीचे रहस्य अद्याप नीटसं उलगडता आलं नाहीये, महाविस्फोट (बिग बैंग) सिद्धांतानुसार तो स्फोट का झाला ह्याचेही उत्तर आधुनिक विज्ञान देऊ शकत नाही, मूळात तो सिद्धांतही अनेकजण मानत नाहीत, स्टेडी स्टेटवाले विरोधातंच आहेत, पण तेही एकवेळ बाजुंस ठेऊ...चैतन्याचे अस्तित्वंच जिथे मानलं जात नाही, पण एरवी प्रत्येक गोष्टीत का हे उत्तर शोधणारे आधुनिक विज्ञान नि तत् अंधानुयायी ह्यावर मात्र सोयीस्कर मौन बाळगून आहेत आणि त्यांचे हे कथित अनुयायी जगाला विज्ञाननिष्ठेचे नि बुद्धिवादाचे नि धर्मप्रामाण्यवादाच्या नि शब्दप्रमाण्यवादाच्या निषेधाचे डोस पाजतात...हसावं की रडावं???
ज्या डार्विनप्रणीत थोतांड विकासवादाची मांडणी अद्यापही इतिहासाच्या नि विज्ञानाच्या पुस्तकातून रेटून केली जाते, विकासवाद अगदीच त्याज्य आहे असे नसून त्याचे जे स्वरुप मांडलं जातं ते हास्यास्पद आहे....
धर्मग्रंथांच्या शब्दप्रामाण्यवादाला विरोध करणारे कथित विज्ञानवादी विज्ञानातल्या अंधशब्दप्रमाण्यवादाला मात्र सोयीस्कर बळी पडून विरोध करायला विसरतात ह्यासारखे दुटप्पी वागणं जगात नसेल...
मूळात ज्या वैदिक धर्मातली आस्तिक अशी षट्दर्शनेच 'अथातो जिज्ञासा' ह्या शब्दांनी आरंभ होतात, ज्या षट्दर्शनांमध्ये सृष्टीनिर्मितीचे रहस्यही प्रामुख्यत्वाने सूत्ररुपात विशद आहेच, ते सत्यसिद्धांत गुरुमुखातून आर्षपद्धतीने अध्ययन करून आकळून न घेता त्याकडे केवळ कर्मकांड म्हणून पूर्वग्रहदूषित दृष्टीने पाहून त्याची हेटाळणी करणे ह्यालाच आजच्या भाषेत विज्ञाननिष्ठा नि बुद्धिवाद म्हणायची फैशन असल्याने असला थोतांडवाद तुमच्या तुम्हालाच लखलाभ...
सृष्टीचे उपादान कारण असलेल्या वेदांमध्ये
सृष्टीनिर्मितीसंबंधी वैदिक सिद्धांत काय सांगतात हे अगदी स्फटिकासमान स्पष्ट आहे जे अत्यंत बुद्धींस नि तर्कांस अनुकूल असून मान्य करण्याजोगंही आहे..अर्थात त्याचीही तर्ककठोर समीक्षा व्हायलाच हवी...पण केवळ विरोधासाठी विरोध ही भूमिका अत्यंत निंदनीय आहे...
आधुनिक विज्ञानांस आमचा मूळी विरोधंच आहे असा भ्रम ज्यांना करून घ्यायचा आहे त्यांनी खुशाल करावा...
विज्ञान हा शब्दंच मूळात वेदांमधला आहे...
अणु-रेणुपासून ते सर्व सृष्टीपर्यंत नि त्याच्या कर्त्यापर्यंतचे यथार्थ ज्ञान हाच तर वेदांचा हेतु आहे...
वास्तविक वैदिक विज्ञान नि आधुनिक विज्ञान ह्या दोन्हींचा समन्वय हीच आमची भूमिका असल्याने दोन्हींच्या समन्वयाने पदार्थ विद्येचे ग्रहण करून मानवी जीवनाचा विकास करणे हे श्रेयस्कर आहे...
ज्या समस्यांचे समाधान आधुनिक विज्ञान करु शकलेले नाहीये, त्यावर वैदिक विज्ञानाने काही तोडगा निघु शकतो का ह्याचा विचार व्हायला हवा...
दोन्हींच्या मर्यादा नि दोन्हींची बलस्थाने लक्ष्यीं घेऊनंच समन्वयात्मक प्रयत्न आवश्यक आहेतंच...
सैद्धांतिक स्पष्टता जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत ह्या समस्यांचे निराकरण तर होणारंच नाही नि हा वादही असाच सुरुच राहील
पण बुडतीं हे जन देखवेना डोळा...
भवदीय...
पाखण्ड खण्डिणी
pakhandkhandinee.blogspot.com
#राष्ट्रीयविज्ञानदिवस_सायन्स_फीजिक्स_सृष्टीनिर्मिती_वैदिकविज्ञान
No comments:
Post a Comment