Tuesday, 24 December 2019

Planting the Cross In Asia – संपूर्ण आशिया ख्रिस्तमय करणे !



"With the Church throughout the world, the Church in Asia will cross the threshold of the Third Christian Millennium marvelling at all that God has worked from those beginnings until now, and strong in the knowledge that "just as in the first millennium the Cross was planted on the soil of Europe, and in the second on that of the Americas and Africa, we can pray that in the Third Christian Millennium a great harvest of faith will be reaped in this vast and vital continent".

१९९९ मध्ये पोप जोन पॉल द्वितीय भारत भेटीस आला असताना त्याने उच्चारलेले हे वाक्य – “प्रथम सहस्त्रकांत आम्ही संपूर्ण युरोप ख्रिस्ती केला, द्वितीय मध्ये अमेरिका आणि आफ्रिका आणि तृतीय मध्ये आता संपूर्ण आशिया हे आमचे ध्येय !”

संदर्भ -

 http://w2.vatican.va/content/john-paul-ii/en/apost_exhortations/documents/hf_jp-ii_exh_06111999_ecclesia-in-asia.html

ह्या दुव्यावर पाहू शकता! हे ख्रिस्त्यांचे अधिकृत संकेतस्थळ आहे.

ह्या पोपला भारतात आमंत्रण देणार्या दोन व्यक्ती कोण असतील हो उत्तर - सोनिया तर आहेच पण ज्यांची आज जयंती आहे असा देशाचा भूतपूर्व पंतप्रधान. अटल बिहारी वाजपेयी.

सर्वधर्मसमभावाच्या भोंगळ आत्मघातकी नि षंढ मानसिकतेच्या गप्पा ठोकणार्या आम्हा हिंदूंना वास्तवतेचे भान असणे ही दूरचीच गोष्ट ! अर्थात हे षड्यंत्र म्हणजे ख्रिस्त्यांनी हिंदुस्थानात पाउल टाकण्यापासून हे सर्व उद्योग उघड उघड आहेत. कसे ते पाहुयंत !

An Account of the Inquisition at Goa हा १८१९ मधला ग्रंथ ज्यामध्ये ख्रिस्त्यांनी त्यांच्या पाशवी पंथाच्या प्रचारासाठी केलेले हिंदूंचे अनन्वित अत्याचार, सरसकट कत्तली, माता भगिनींचे बलात्कार, बलात्काराने केलेली सर्व धर्मांतरे ह्याचा इतिहास जिज्ञासू वाचू शकतात. अनंत काका प्रियोळकर ह्या लेखकानेही ह्याच गोवा ईन्क्विजिशनवर स्वतंत्र अभ्यसनीय ग्रंथ लिहिलाय.

अगदी शिवकालातही धर्मांतरे सुरु होतीच म्हणूनच की काय पुण्यश्लोक श्रीशिवप्रभूंनी चार ख्रिस्ती पाद्र्यांची धर्मांतर करू नका म्हणून ऐकले नाही म्हणून उडविलेली मुंडकी हा इतिहास आम्ही मराठे तरी विसरलेलो नाही आहोत. अर्थात आज महाराजांना सेक्युलर दाखवायचे धंदे सुरूच आहेत म्हणा. असो तो वेगळा विषय !

आता ब्रिटीशांचा इतिहास पाहुयांत

केवळ साम्राज्य विस्तार हाच ब्रिटीशांचा राज्याचा हेतू नसून मूळ ध्येय ख्रिस्ताचेच अनुसरण हेच होते. ह्या सर्व कार्यासाठी ब्रिटिशांनी केलेल्या योजना !

भारतीय इतिहासाचे विकृतीकरण

The most effective way to destroy people is to deny and obliterate their own understanding of their history.

Goerge Owell

*Cambridge History Of India ह्या सहा खंडाच्या ग्रंथातून केलेले भारतीय इतिहासाचे विकृतीकरण !*

*आर्य आक्रमण सिद्धांत ह्याचेच अपत्य !*

*मेक्सम्युलर, मोनियर विल्यम्स, जेम्स मिल, विल्यम जोन्स, मोरटाईम व्हीलर* आदि लोकांनी मांडलेला हा थोतांड सिद्धांत आजही दुर्दैवाने पाठ्यपुस्तकातून शिकविला जातो ह्यापेक्षा दुर्दैव काय?

भारतीय इतिहासाची प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक अशी केलेली बालिश विभागणी व त्यांची आमच्याच इतिहासकारांनी ओढलोली री !

हिंदूंची त्यांच्याच स्व-धर्माविषयीची श्रध्दा आणि निष्ठा नष्ट करणे

*The Chief obstacle to spread the chiristianity in India is that these people are proud of their traditions and religion.*

Monier Williams – 2nd May, 1887 – Missionary Congress Oxford Lecture.

हे वाक्य फार सुचक आहे म्हणूनच ह्या कामासाठी मेक्सम्युलर नावाच्या मनुष्याची योजना. त्याने मरेपर्यंत संस्कृत न येताही व भारतात कधीच न येता तरीही केलेला वेदांचा ३० वर्षांचा अभ्यास आणि केलेली विकृत भाषांतरे ५० खंडात प्रकाशित ! जिज्ञासूंनी आमचा टिळकांवरील लेख वाचावा. उघडपणे हा मनुष्य आपण ख्रिस्त प्रचासाराठी हे काम करतो आहोत असे म्हणत असून देखील आमच्या विद्वान लोकांना अद्याप त्याचे सत्यस्वरूप कळत नाही ह्यापेक्षा दुर्दैव ते काय ? रामकृष्ण मठ आणि भाजपही अद्याप त्याची जयंती साजरी करते ! आणखी काय दुर्दैव ? नंतर तो खूप भारतभक्त झाला ही गोष्ट वेगळी पण आधीचे काय ???

अपवाद केवळ महर्षी दयानंदांचा ज्यांनी ह्याला पुरता नागवा केला होता जिवंतपणीच !त्यांची जितकी स्तुती करता येईल तेवढी थोडीच ! त्यावर कधीतरी सविस्तर लिहूच !

*इथल्या शिक्षण पद्धतीचा विध्वंस*

गांधीजींनी ज्यांस "रमणीय वृक्ष" म्हणून गौरविले, ती आमची मुळची भारतीय गुरुकुल शिक्षण पध्दती जी अठराव्या शतकांत सर्वव्यापक आणि सर्व सर्वसमावेशक अशी होती, ती नष्ट करून त्यांची मेकौले प्रणीत शिक्षा पद्धती लागू करणे आणि दुर्दैवाने स्वतंत्रता प्राप्तीपश्चात ७० वर्षे झाली तरीही आम्ही तीच सुरु ठेवणे !

*फोडा आणि राज्य करा*

आर्याक्रमण सिद्धांतातून निर्माण केलेली विषवल्ली आज इतकी विस्तारली आहे की मूलनिवासी मंचाच्या नावाखाली ब्राह्मण,क्षत्रिय आणि वैश्य हे तीन्ही विदेशी हा प्रचार सुरुय ! ब्रिटिशांना आणखी काय हवे होते ???

*ब्राह्मणी अत्याचाराची भंपक नि तथ्यहीन कल्पना आणि ख्रिस्त्यांचे ब्राह्मणद्वेषाचे बीज*

बव्हतांश ख्रिस्ती मिशनर्यांचे ग्रंथ वाचले की एक गोष्ट लक्षात येते ती हीच की इथले ब्राह्मण संपविल्याशिवाय ख्रिस्तविजय संभव नाही. *Abbe Dubois हा मिशनरी त्याच्या ग्रंथांमध्ये ब्राह्मणांविषयी जी गरळ ओकतो ती पाहिली की गेली दोनशे वर्षे ब्राह्मण द्वेष जो सुरु आहे त्याचे मुळ लक्षात येते.* तो म्हणतो

*And there is no stronghold of evil so impregnable as the Brahmins. 1820.*

आता *Reverend Norman Macloid* हा त्याचाच सहकारीही हेच लिहितो की 

*“The Brahmin is therefore well worth looking at! We have more to do with him than with the Czar of all the Russians. The battle we have to fight with him is not against guns or rifles, not against flesh and blood.”*

बरं हीच गोष्ट मैक्सम्युलर, मोनियर विल्यम्सही ठामपणे मांडतो की इथला पुरोहित वर्ग नष्ट केल्याशिवाय आपला ख्रिस्तविजय संभव नाही.

*मुस्लिमांनी आणि ख्रिस्त्यांनी केलेल्या अत्याचाराचे बिल ब्राह्मणांवर फाडून हे सर्व मोकळे झाले आहेत.*

*एकीकडे भट भिक्षुक म्हणायचे आणि दुसरीकडे हा ३-४ प्रतिशत समाज शेष ९५ लोकांवर अत्याचार करतो ही हास्यास्पद कल्पना आमच्या लक्षात येत नाही ह्यापेक्षा शोकांतिका कोणती ? आणि ह्यासाठी पुढे जोती फुलेंसारखी माणसे पेरणे. पुढे नेहरूप्रणीत मार्क्सवादी साम्यवादी इतिहासकारांकडून हेतपुरस्सर केले  गेलेले इतिहासाचे विकृतीकरण ब्रिटीश गेल्यावरही सुरु राहतेच.*

बौद्धांवर मुस्लिमांनी केलेले अत्याचार लपवून ते ब्राह्मणांनी केले असा धादांत खोटा प्रचार केला जातो. वस्तुत: सर्व मुस्लीम भाष्यकार प्रामाणिकपणे उच्चरवाने उद्घोषित करतात की आम्ही कसा हिंदू आणि बौद्ध मंदिरांचा किंवा स्तुपांचा विध्वंस केला आणि इथल्या हिंदू आणि बौद्धांची कत्तल केली. पण इथले नेहरूप्रणीत मार्क्सवादी इतिहासकार मात्र ह्याला ब्राह्मणी अत्याचाराची संज्ञा देऊन बुद्धिभेद करतात आणि आमचे लोकही नंदी बैलासारखे मुंड्या हलवितात. *ज्यांना संदर्भ पहायचे असतील त्यांनी Elliot and Dawson ह्यांनी १८६७ ते १८८७ ह्या काळात लंडन येथून संपादित केलेले आठ खंड जे “History of India – as told by its own Historians” नावाने प्रकाशित आहेत. द्वितीय खंडापासून सर्व मुस्लीम अशा अरबी, फारसी इतिहासकारांच्या तत्कालीन ग्रंथांची भाषांतरे आहेत. आंतरजालांवर सर्व काही उपलब्ध आहे. मूस्लिम इतिहासकार स्वत: अत्याचाराची टिमकी मिरविताना आम्हाला मात्र त्यात सहस्त्रोवर्षांचा तथाकथित ब्राह्मणी अत्याचार दिसतो. ह्यापेक्षा वाईट काय???*

दुर्दैवाने अगदी मंडल आयोगापर्यंत हा द्वेष तसाच खदखदत राहतो. त्याच्या पुढेही आजही तेच सुरुय भीमा कोरेगाव च्या माध्यमातून ! कारण वर स्पष्ट आहे.

*हिंदू धर्म हा ब्राह्मणी धर्म आहे असे सतत विष पेरणे*

उपरोक्त सर्व ख्रिस्ती लेखकांच्या ग्रंथात नेहमी हीच रटाळ पोपटपंची वाचायला मिळते त्यामुळे ब्राह्मणेतरांनी आमचा ख्रिस्ती पंथ स्वीकारावा हीच त्यांची भूमिका दिसून येते. बौद्ध विरुद्ध ब्राह्मण असा संघर्ष अकारण इतिहासांत पेटविणे हे कार्य जितकं ब्रिटीशांनी केलं, तितकंच नेहरुप्रणीत मार्क्सवादी साम्यवादी इतिहासकारांनीही केलं.

*पण काही बोलायचे नाही, कारण भावना दुखावतात !*

ख्रिस्ती मिशनर्यांनी संन्याशाचे रूप घेऊन आश्रम स्थापिणे आणि धर्मांतरे करणे

उपरोक्त एबे दुबोईस हा त्याच्या ग्रंथात स्पष्ट लिहितो की आम्ही कसे ब्राह्मणाचे किंवा संन्याशाचे वेष धारण करून ख्रिस्ती मिशनरी भारतात कार्यरत ठेवले आणि हिंदूंना बाटविले. हे कार्य आता आणखी कसे सहज आणि कुणालाही न कळता करता येईल ह्याविषयी तो सविस्तर लिहितो. दुर्दैवाने हे आजही सुरु आहे ! ईशावास्य उपनिषद ह्याचे येशू ख्रिस्ताशी संबंध जोडून ख्रिस्ती प्रचार करताहेत. ज्यांना जिज्ञासा असेल त्यांनी *सीता राम गोएल ह्या नामवंत इतिहासकाराचा “Catholic Ashrams – Sannyasins Or Swindlers” हा २६३* पृष्ठांचा ग्रंथ वाचावा.

सर, रावबहाद्दूर सारखे तुकडे फेकून इथल्या विद्वानांना कायमचे अंकित करणे हाही मार्ग ! आणखीही अनेक मार्गांनी ख्रिस्त्यांनी पंथप्रचारासाठी केलेल्या युक्त्या प्रयुक्त्या आपणांस अभ्यासता येतील.विस्तारभयास्तव जास्ती लिहित नाही.

काहींना असे वाटेल की उपरोक्त लेखांत ब्राह्मणांचीच टिमकी वाजविण्याचा आमचा हेतु आहे. तर असे मूळीच नाही. जे आहे ते ससंदर्भ आम्ही मांडलंय.

आता ह्या सर्वांत दोष आम्हा हिंदुंचाही भरपूर आहेच आहे तो कसा ते पाहुयांत.

सद्गुणविकृती हा एक मोठा दोष !

स्वधर्माचे पुरेसे काय थोडंही ज्ञान नसणे हा दोष !

वेदांचा प्रचार, त्याचा तेजस्वी जीवनवाद, त्याची विजीगीषु वृत्ती हिचा त्याग !

सर्वधर्मसमान आहेत हाही एक महत्वाचा दोष !

सर्व मार्ग व उपासनापद्धती एकाच ईश्वराप्रती जातात ही भोंगळ शिकवण !

वस्तुत:

ओम इन्द्रं वर्धन्तो अप्तुरः कृण्वन्तो विश्वमार्यम् ! अपघ्नन्तो अराव्णः !
ऋग्वेद – ९.६३.५

किंवा

एतद्देशप्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः !
स्वंस्वं चरित्रन शिक्षेरन पृथिव्यां सर्वमानवाः !

मनुस्मृति

सर्व विश्वाला आर्य अर्थात सुसंस्कृत करण्याची आज्ञा देणारा आमचा ऋग्वेद आणि आमची प्रक्षेपविरहित विशुद्ध अशी मूळची मनुस्मृती आम्ही पायदळी तुडविली आणि भोंगळ सद्गुण विकृतेच्यापायी जगावर राज्य करायचे सोडून आम्ही कुणावरच कधी आक्रमण केले नाही असा डांगोरा पीटत राहिलो. शुद्धीकरणाचे उपाय कधी अवलंबिले नाहीत. आजही आम्ही ते करण्यास उत्सुक नाही. काही अपवाद वगळता.

आमचे शंकराचार्य तर निवांत आहेत !

हे सर्व कार्य खरे तर त्यांचे ! पण भगवद्गीतेची परीक्षा घेऊन २१ सहस्त्रांचे पारितोषिक देण्यापलीकडे किंवा वेदपाठशाळा चालविण्यापलीकडे ह्यांची मती जात नाही ही शोकांतिका ! कुठे तो ऋग्वेद आणि कुठे आम्ही ???

ज्यांना अद्यापही भ्रमात राहायचे आहे त्यांनी खुशाल राहावे ! शेवटी

नोलुकोप्यवलोकते दिवा किं सूर्यस्य दूषणम् !

संदर्भ ग्रंथांची सूची

१.     An Account of the Inquisition at Goa (1819)
२.     सत्यार्थ प्रकाश आणि ऋग्वेदादिभाष्यभूमिका – महर्षी दयानंद सरस्वती
३.     महर्षी दयानंद के पत्र और विज्ञापन
४.     Life and Letters of Right Frederic Max-muller -  Two Volumes
५.     The myth of Sainth Thomas and Mylapoore Temple – Sita Ram Geol – Voice of India
६.     The History of India as told by its Own Historians -  Eight Volumes – Elliot and Dawson (1867-1887)
७.     Letters on the State of Christianity in India by Abbe Dubois -  London, 1823
८.     Description of the People of India – Abbe Dobuis
९. Sanskrit English Dictionary - Monier Williams - Preface 
१०. Catholic Ashrams - Sannyasins Or Swindlers - Voice Of India

अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु !

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#सर्वधर्मसमभाव_नाताळ_धर्मांतर_सद्गुणविकृती_ख्रिस्तमयआशिया_शुद्धीकरण_Christianity_Churchanity

No comments:

Post a Comment