Saturday, 14 December 2019

द्वैमित्रिः - अष्टाध्यायी - व्याकरणकार महर्षि भगवान श्रीपाणिनी...



भगवान महर्षि श्रीपाणिनींचे स्मरण झालं आज...

महर्षि पाणिनींनी त्यांच्या व्याकरणामध्ये द्विगोर्लुगनपत्ये (४।१।८८) नावाचे एक सूत्र अष्टाध्यायीमध्ये सांगितलं आहे. त्यावरील सूत्रभाष्यामध्ये इञ हा प्रत्यय लागून द्विग् वरून द्वैमित्रि असा शब्द निष्पन्न झाला आहे. त्याचा अर्थ आहे

'द्वयोः मित्रयोः अपत्यं पुमान् द्वैमित्रिः' द्विगोर्लुगनपत्ये। अपत्यार्थे विहितस्य तद्धितप्रत्ययस्य विषये अपि अस्य सूत्रस्य प्रसक्तिः न विद्यते । यथा, "द्वयोः मित्रयोः अपत्यम्" इत्यत्र अत इञ् ४|१|९५ इत्यनेन इञ्-प्रत्ययं कृत्वा "द्वैमित्रि" इति प्रातिपदिकं सिद्ध्यति ।*

संक्षेपांत सांगायचं तर ज्याचे पितृत्व दोन व्यक्तींकडे जात असेल म्हणजे दोन जवळच्या मित्रांपैकी कुणातरी एकाचं हे मूल आहे असं म्हणण्यासारखी परिस्थिती असेल, तर त्या संततीला महर्षि भगवान श्रीपाणिनींनी 'द्वैमित्रि' असा शब्द दिला आहे. अशा व्यभिचारजन्य संततीस ही संज्ञा आहे.

काही लोक असे आहेत की ज्यांच्याविषयी हा द्वैमित्रि शब्दही न्यून पडावा. आमच्यांमध्ये दुर्दैवाने भगवान श्रीपाणिनींची योग्यता कालत्रयीही संभव नसल्याने आणि आम्हांस व्याकरणांतलं वंही कळंत नसल्याने अशांसाठी आणखी एखादा शब्द शोधण्याचा मोह आवरता येत नसला तरी लेखणींस विराम. असं चिंतन शिष्टाचारांस धरून नाही हे आम्हांस ज्ञात असलं तरी काहीवेळा मर्यादा ओलांडाव्यांच लागतात.

असो. काहींना हे अगदी यथार्थपणे लागु होतं इतकंच आजच्यापूरतं...ते कोण हे सूज्ञांस सांगणे न लगें।

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#भगवानमहर्षि_श्रीपाणिनि_व्याकरण_द्वैमित्रि_पितृत्व_व्यभिचार_संतती

No comments:

Post a Comment