Thursday, 3 October 2019

*Gandhi, as a Political leader, has failed - Subhash Chandra Bose*



Part - One

It may sound ludicrous although it is not at all far from the truth that Gandhi was no doubt the most failed politician of our nation. Many of his contemporaries have described him as such. Ambedkar is one of such staunch crtitic. But it is more surprising that the same admonition comes from a man none other than Shri Subhash Chandra Bose. Shri Subhash Chandra Bose, one of the greatest freedom fighters of all times, who having been expelled from Congress Presidency for six years and many times insulted by Gandhiji and Congies, has criticized Gandhi's political career in harsh words.While appreciating some positive aspects of Gandhian leadership, Subhash was also critical of some negative aspects of Gandhiji's stewardship.Although he revered Gandhiji as Mahatma and Father of Nation too, his criticism was so sharp that he he called *Gandhi a complete political misfit.* In his famous autobiography titled *"The Indian Struggle -1920-1942* published by Asia Publishing House, Mumbai in 1964, he vehemently declared Gandhi as a lunatic. Chapter 16 of the book deals with the title *"The Role of Mahatma Gandhi in Indian History*" wherein he has vividly contemplated on the political ideas of Gandhi. In his own words...

*"Born in another country he might have been a complete misfit. What, for instance, would he have done in a country like like Russia or Germany or Italy. His doctrine of non-violence would have led him to the cross or to the mental hospital."*

Page no. 292 - ibid...

*Gandhi - a failed politician*

Subhash Bose has sternly criticised Gandhi as a failed politician. On sudden suspension of Civil Disobedience Movement by Gandhiji, Subhash retorts..

*“The events of the last thirteen years have demonstrated that a political warfare based on the principle of maximum suffering for ourselves and minimum suffering for our opponents cannot possibly lead to success. It is futile to expect that we can ever bring about a change of heart in our rulers merely through our own suffering and by trying to love them. And the latest action of Mahatma Gandhi in suspending the Civil Disobedience Movement is a confession of failure as far as the present method of the Congress is concerned. We are clearly of the opinion that as a political leader Mahatma Gandhi has failed. The Time has therefore, come for a radical reorganisation of the Congress on anew principle and with a new method.*

Page no. 357 - The Indian Struggle - 1920-1942

Subhash had his first meeting with Mahatma Gandhi on July 16th,1921, at Mani Bhavan in Bombay. He asked a number of questions regarding the non-cooperation movement of Gandhiji. Subhash did not feel satisfied with the replies of Gandhiji. He felt that there was a deplorable lack of clarity in the plan which Gandhiji had formulated.  Gandhiji himself did not have a clear idea of the successive stages of the campaign which would bring India to him cherished goal of freedom. The sudden suspension of Non-cooperation movement by Gandhiji in February 1922 also led Subhash to put following resentment

*"To sound the order of retreat just when public enthusiasm was reaching the boiling point was nothing short of a national calamity".*

Ibid - page no. 69-74

Subhash Bose again quoted Bar. Chittaranjan R. Das as saying that

*"the Mahatma opens a campaign in a brilliant fashion, he works it up with skill, he moves from success to success till he reaches the zenith of his campaign but after that he loses his nerve and begins to falter."*

Ibid - page no. 70

Subhash Bose attributed the failure of non-cooperation to Gandhiji's faulty strategy. He said that

*"The promise of Swaraj within one year was not only unwise but childish."*

Remaining criticism we shall see in next article.

Till then, stay tuned...

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#SubhashChandraBose_Gandhi_failedpolitician_criticism_Noncooperation_Swaraj_CivilDisobedience

Wednesday, 25 September 2019

*स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक गुण आहेत - इति मनुस्मृती*



महाराजा मनुंनी केलेली स्त्री-प्रशंसा

हा श्लोक वर्तमान मनुस्मृतीमध्ये कोणत्याही संस्करणामध्ये उपलब्ध नाहीये. मधील काळात तो हटलाही असेल. कारण मनुस्मृतीचे ९व्या शतकांतलं मेधातिथीचे भाष्य १२व्या शतकापर्यंत नष्ट झालं होते हे कुल्लुकभट्टाच्या भाष्यांत आपणांस उल्लेख प्राप्त होतोच. इतरही संदर्भ आहेतंच. परंतु प्रसिद्ध ज्योतिर्विद श्रीवराहमिहीरांनी त्यांच्या संहितेमध्ये हा श्लोक मनुमहाराजांचा म्हणून नोंद केली आहे. पहा.

*प्रब्रूत सत्यं कतरोङ्गानानां दोषोस्ति यो नाचरितो मनुष्यै:।*
*धाष्टर्येन पुम्भि: प्रमदा निरस्ता गुणाधिकास्ता मनुनात्र चोक्तम्।।*

वराही संहिता अध्याय ७४, श्लोक ६वा

अर्थ - *जर आपण विरक्त (निष्पक्ष) आहात तर सांगा की स्त्रियांमध्ये असे कोणते दोष आहेत, जे पुरुषांनी पूर्वी केले नसतील. अर्थात् सर्व दोष पुरुषांमध्ये पूर्वीच होते. पुरुषांनी धृष्टतेने स्त्रींस जिंकलंय, वास्तवांत पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक गुण आहेत असे मनु महाराजांनीच म्हटलंय..*

*मनुनात्र उक्तम्।*

धर्मशास्त्राचे प्रमुख आचार्य श्रीमनुमहाराजांनी हे विधान स्त्रियांविषयी केलंय असे श्रीवराहमिहीर सांगताहेत.

हा बृहत्संहितेचा संपूर्ण ७४वा अध्याय स्त्रीस्तुतीने भरलेला आहे. आता एवढ्यावरून पुरुषांनी मनु महाराजांना किंवा वराहमिहीरांस पुरुषद्वेष्टा म्हणावं का ? नाही ना. मग उगाचच विरोधाला विरोध का???

*स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक गुण आहेत हे मनुमहाराज सांगताहेत ह्यापेक्षा अधिक स्पष्टीकरण त्यांच्या निःपक्षपातीपणाचे काय आहे?*

*आता मग स्त्रीनिंदा करणार्या वाईट श्लोकांचे काय???*

काही जण विचारतील की मनुस्मृतीमध्ये स्त्रियांविषयी गौरवोद्गार काढणारे अनेक श्लोक जसे आहेत किंवा पूर्वी असायचे तसे दुसरीकडे काही ठिकाणी त्यांची निंदा करणारे आक्षेपार्ह श्लोकही आज विद्यमान आहेतंच.

इतका परस्परविरोध एकाच ग्रंथांत कसा काय असु शकतो?

*मनुमहाराजांच्या नावाने त्यांना स्त्रीद्वेष्टा म्हणून चोवीस तास बेंबीच्या देठापासून बोंबलणारे जशी ही गोष्ट लक्षांत घेत नाहीत किंवा घेऊ इच्छितही नाहीत, तद्वतंच मनुस्मृतीत काहीच दोष नाहीत किंवा ती अगदी निर्दोष आहे किंवा तिच्यात काहीच प्रक्षेप विक्षेप झालेले नाहीत असे मानणारे आमचे कथित सनातनी परंपरेचे अंधाभिमानी विद्वान नि धर्मपंडितही ही गोष्ट लक्ष्यीं घेत नाहीत ही शोकांतिका नव्हे तर काय???*

हा मनुमहाराजांवरचा घोर अन्याय नव्हे काय ???

*ज्यांनी मनुस्मृती कोणताही पूर्वग्रहदोष न ठेवता अत्यंत चिकीत्सकपणे नि सुक्ष्मदृष्टीने किंवा अगदी वरवर व्यवस्थित शब्दशः वाचलीय, त्यांना हे कळेलंच की तींत अनेकठिकाणी अनेकविषयांत परस्परविरोध आहे. हा विरोध का आहे त्याची संपूर्ण समीक्षा किंवा कारणमीमांसा करण्याचे हे स्थान नव्हेच. ते भविष्यांत करुच. अनेक विद्वानांनी ते पूर्वी केलंच आहे. पण ज्यांना हे पहायची इच्छाच नाही त्यांची गोष्ट काय करावी म्हणा??? मग ते कुठल्याही विचारधारेचे, संप्रदायाचे, परंपरेचे, मानसिकतेचे असोत. कुठल्याही.*

सर्वांनाच विनंती आहे की वरहामिहीरांच्या ह्या श्लोकासंबंधी तुमचं काय म्हणणं आहे? उपरोक्त श्लोकावरून मनुमहाराजांच्या मनांत स्त्रियांविषयी किती आदर होता हे दिसून येते. ह्यापूर्वीही आमच्या लेखांत आम्ही लिहिलंय की वेदांच्या चार संहिता घनपाठादि अष्टधा विकृतीने संरक्षित असल्याने त्या सोडून अन्य कोणताही ग्रंथ निर्दोष नाही. मनुस्मृतीत मधल्या काळांत प्रक्षेप नि विक्षेप दोन्हीही झाले आहेत. ह्यावर आम्ही आमच्या एका परमादरणीय श्रीभिडेगुरुजींवरील वृत्तपत्रांतील एका लेखांत सविस्तर मीमांसा केलीच आहे.

सांगण्याचा उद्देश्य इतकाच आहे की प्रस्तुत श्लोक वराहमिहीरांच्या वेळी मनुस्मृतीत होता पण आजच्या उपलब्ध एकाही मनुस्मृतीच्या प्रतीत तो नाहीये असा निष्कर्ष काढण्यांस कोणतीही अत्युक्ती आम्हांस वाटत नाही. लेखासह आम्ही संदर्भ जोडलेच आहेत.



ज्यांना ही अत्युक्ती वाटते त्यांनी हे आमचं विधान सप्रमाण खंडन करावं. कारण मनुस्मृतीत अनेक श्लोक असे आहेत की जिथे मनुरवेब्रवीत असे म्हटलंय. म्हणजे हा श्लोक मनुमहाराजांनी सांगितलंय अशा अर्थाची वचने आहेत. आता जर हे श्लोक मनुमहाराजांनी स्वतः रचले असते तर त्यांनी हे 'मनुने म्हटलंय' असे विधान कशाला केलं असतं ??? भले मनुस्मृती ही भृगुप्रोक्त आहे असे काही मतांत मानलं जात असलं तरीही त्यान्यायाने उपरोक्त वराहमिहीरांचा श्लोकही मनुस्मृतीचाच भाग होता हे लक्ष्यीं येते.

पण काही एकदोन अपवाद वगळता आजपर्यंतच्या एकाही मनुस्मृतीभाष्यकारांस ही गोष्टही लक्ष्यीं येऊ नयें ह्यापेक्षा शोकांतिका ती काय???

अर्थात ज्यांना सत्य स्वीकारायचीच मानसिकता नाही त्यांना कितीही घसा खरडून सांगितलं तरी त्यांना हे मान्य होणार नाही ही गोष्ट वेगळी. अस्तु।

*नोलुकोप्यवलोकते दिवा सूर्यस्य किं दूषणम्।*

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#मनुस्मृती_स्त्रियांची_स्तुती_प्रशंसा_गुण_पुरुष_वराहमिहीर

Monday, 23 September 2019

*तथाकथित आर्याक्रमण किंवा स्थलांतर नि भारतीयांची वैचारिक दारिद्रता*


*हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं।*
*तत्वं पृषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये।*

ईशावास्योपनिषद - १।१।१५

गेली एकवीस वर्षे इतिहासाचा अभ्यास करतोय. शाळेत असल्यापासूनंच...आपण सर्वंच करताहोत. एकंच गोष्ट सतत ऐकतोय नि वाचतोय....

आर्य बाहेरुन आले किंवा त्यांचे स्थलांतर झालं...???????

किती दिवस हे मिथ्यावचन???

*वैचारिक दारिद्रता नि परदास्यता हा भारतीयांचा गेल्या तीन शतकांतला जणु स्थायीभाव बनला आहे. कुणीही यावं, काहीही लिहावं आणि आम्ही ते प्रमाण मानावं. पाश्चात्यांनी भारतीय इतिहासांवर संशोधन करावं नि आमचे डोळे दिपून जावेत. अहाहाहाहाहा. त्यांचा हेतु काय होता तेही आम्ही न अभ्यासावं. काय दरिद्रता असावी एका देशाची? हेच कार्य आमच्या एतद्देशीय विद्वानांनी कुणी केलं तर मात्र तो आमच्या विचारधारेचा नाही म्हणून आम्ही त्याला अनुल्लेखानेच टाळावं.*

*किती दिवस पाश्चात्यांना आम्ही बुद्धी गहाण टाकणाराहोत?*

स्वत्व-स्वाभिमान नि तज्जन्य स्वयंप्रज्ञेचा विनाश झालेल्या भारतीयांनी आपल्या प्राचीन परमोज्वल इतिहासाकडे परकीयांच्या द्वेषपूर्ण नि पक्षपाती दृष्टी असलेल्या उपनेत्रांतूनच पहावेत ह्यापेक्षा शोकांतिका ह्या राष्ट्राची काय असु शकते ? काही सन्माननीय अपवाद, होय अगदी काहीच असे अपवाद वगळता, इथल्या सर्वच विद्वानांची नि राष्ट्रपुरुषांची बुद्धी ही परकीयांना इतकी दास्यभावाने कशी काय आत्मविस्मृतीने बद्ध होते हे अनाकलनीय आहे. बाबा वाक्यं प्रमाणं ह्याप्रमाणे *मैक्स वेबर अथवा मैक्सम्युलर, विल्यम जोन्स, व्हिन्सेंट स्मिथ वाक्यं प्रमाणं* ही इथली शोकांतिका कशी काय असु शकते?

*दीड-दोनशे वर्षांपूर्वी माथी मारलेला थोतांड आर्याक्रमण सिद्धांत*

*केंब्रिज हिस्टरी ओफ इंडियाच्या* माध्यमांतून नि मैक्सम्युलरच्या पन्नास खंडात्मक विकृत साहित्यातून ब्रिटीशांनी 'फोडा आणि राज्य करा'साठी आमच्या माथी मारलेला हा विभाजनकारी सिद्धांत अद्यापही पाठ्यपुस्तकांतून अध्ययनांस प्राप्त होतो ह्यापेक्षा शोकांतिका ती काय? आपल्या एकाही धर्मग्रंथात कुठेही आर्य बाहेरुन आल्याचा पुसटसाही उल्लेख नाही. काही पढतमूर्ख लोक वेदांमध्ये आर्य-अनार्य हा कथित ऐतिहासिक वाद शोधण्याचा एक बालिश प्रयत्न करतात. ह्यांची कीव जितकी करावी तितकी थोडीच. अशांचे स-प्रमाण खंडन खुप पूर्वीच एतद्देशीय पण पाश्चात्यांना बुद्धी गहाण न टाकलेल्या स्वयंप्रज्ञेच्या विद्वानांकडून झालंय. आम्ही आमच्या आठशे पृष्ठांच्या स्वतंत्र ग्रंथांतही हे केलंच आहे. ह्या लेखाच्या माध्यमातून आम्ही सर्वांस उघड आव्हान अर्थात ओपन चेलेंज देतो की वेदांमध्ये कुणीही आर्य-अनार्य हा कथित ऐतिहासिक वाद शोधून दाखवावा व सिद्ध करावा. ज्यांना व्याकरणांतलं वंही कळंत नाही, ते लोक कुणाची तरी पुस्तके वाचतात नि गप्पा ठोकतात. समाजमाध्यमे अर्थात सोशल मीडियावर तर अशांचा भडिमार आहे. आमची बुद्धिमत्ता इतकी लयांस गेलीय का?

*परवर्ती साहित्यातही कुठेच आर्य बाहेरुन आल्याचाही संदर्भ नाही*

वेदांत राहुदे, निदान पुराणांत वगैरे तरी तो असावा कारण ते इतिहासग्रंथ आहेत. तोही नाही. तरीही ब्रिटिश तो माथी मारतात नि आमचे सर्व विद्वान त्याचे एकतर समर्थन किंवा फारतर विरोध करण्यांत जीवनाची इतिकर्तव्यता मानतात. हीच आमची विद्वत्ता ??हीच आमची बुद्धिमत्ता?? हीच आमच्या बुद्धिवैभवाची परिसीमा???

*माणसं ओळखायला आम्ही कधी शिकणाराहोत???*

मैक्सम्युलरसारख्या ख्रिस्ती मिशनर्याला ज्याचा सर्व पत्रव्यवहार आम्ही पूर्ण अभ्यासला आहे, त्याला ब्रिटीशांनी ख्रिस्तीपैशाचपंथाच्या प्रचारासाठी वेदादि साहित्याचा अत्यंत विकृत अनुवाद करायला पाठवलं, ज्याला मरेपर्यंत संस्कृत बोलताही येत नव्हतं, ह्याचे प्रमाण उपलब्ध आहे, त्याला आमचे स्वामी विवेकानंद नि लोकमान्य टिळक सायणाचार्यांचा अवतार घोषित करतात. त्या मैक्सम्युलरने रामकृष्णांचे चरित्र काय लिहायला घेतलं विवेकानंद त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळतात. लोकमान्यांना मैक्सम्युलर डोंगरीच्या कारावासांतून बाहेर यायला सहकार्य काय करतो, लोकमान्य आर्य उत्तर ध्रुवावरून आले असा सिद्धांत मांडतात. त्यांच्या समकालीन पावगी नामक पुण्यातल्याच एका चित्पावनानेच (हेतुपुरस्सर हा उल्लेख) भारतीय साम्राज्य नावाचे चोवीस खंड लिहून नि आर्यावर्तिक होम नावाचा स्वतंत्र ग्रंथ लिहून टिळकांना भेटून हा सिद्धांत खोडूनही टिळक दुराग्रहाने तो मान्यंच करत नाहीत..प्रमाण उपलब्ध आहे...मैक्सम्युलर उत्तरायुष्यांत बदलला खरं पण आधीचे काय ?

*इतकी शोकांतिकाय इथल्या विद्वानांची ????*

*पण टिळकांच्या विरोधांत काही बोलायचं नाही, लिहायचं नाही....का ते महापुरुष होते म्हणून ?*

*विवेकानंदांच्या विरोधांत काही लिहायचं नाही ते विवेकानंद होते म्हणून*

*हे दोन्हीही राष्ट्रपुरुष पूज्यनीय आहेतंच. निःसंशय पण...*

*ही अंधभक्ती नि व्यक्तीपूजा आमच्या पतनाचे कारण हे आमच्या लक्ष्यींही येऊ नयें?*

*माणसं ओळखायला कधी शिकणार आहोत आम्ही???*

*इतिहासातून काहीच शिकायचं नाहीये का ?*

*व्यक्तीपूजेचा नि अंधभक्तीचा त्याग कधी करणाराहोत?*

*चुकीला चूक कधी म्हणणार आहोत?*

*कधी विचार करणाराहोत???*

*आर्याक्रमण किंवा स्थलांतर कधी नाकारणाराहोत???*

*एकटा आर्यसमाज सोडला तर कुणीही हे सर्वप्रथम खोडलेलं नाहीये.*

*ब्रिटीशांना जाऊन ७० वर्षे झाली तरीही स्थितींत काही परिवर्तन नाहीये...*

*नेहरुप्रणीत लाल पावट्या इतिहासकारांनी तर ह्यात आणखी तेल ओतलं नि ओतताहेत...*

आम्हाला जाग कधी येणार?

*भारतीय इतिहासाचे पुनर्लेखन भारतीय दृष्टिकोनातून कधी होणार???*

विचार व्हावा ही विनंती...!

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#आर्याक्रमण_आर्यस्थलांतर_ब्रिटीश_भारतीयइतिहास_लोकमान्य_विवेकानंद

Friday, 9 August 2019

*#काश्मीर_स्वातंत्र्यवीर_सावरकर_हिंदुमहासभा_आर्य समाज_ रास्वसंघ* - लेखांक प्रथम



सर्वप्रथम सर्व भारतीयांचे अभीष्टचिंतन ! आदरणीय पंतप्रधान श्री. मोदीजी, केंद्रीय गृह मंत्री श्री. अमित शहाजी नि सर्व मंत्रीमंडळ, भारत सरकार नि सर्वांचेच अभीष्टचिंतन नि आभार !

हिंदुजगताची, हिंदुहिताची नि पर्यायाने अखंड हिंदुराष्ट्राची अविरत चिंता वाहणार्या हिंदुराष्ट्रपती श्री विनायक दामोदर सावरकरांचे काश्मीरविषयी मत काय होते हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून हा लेखनप्रपंच. सावरकरांनी काश्मीरविषयक नेमकं काय कार्य केलं हे पाहण्यासाठी हा लेखनप्रपंच.

१३ डिसेंबर, १९३७ मध्ये नागपूरात तात्यारावांनी पापस्तानच्या योजना उधळून लावण्यासाठी आवाहन करताना काश्मीरमधल्या हिंदुंच्या दुःस्थितीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं होते. पुढे तात्याराव काश्मीरच्या प्रवासांस निघाले तो वृत्तांत...

*आता जीवनांत काश्मीरचा शेवटचा प्रवास मी करत आहे...* इति सावरकर

१९३७ ह्या संवत्सरामध्ये स्थानबद्धतेतून मूक्त होताच अखिल भारत हिंदुसभेचा अध्यक्ष ह्या नात्याने स्वा. सावरकरांनी अखंड भारताचा प्रवास केला. ठिकठिकाणी त्यांचे अत्यंत हर्षभरित स्वागत नि त्यांस त्यांची भाषणात्मक उत्तरे प्राप्त झाली. सहस्त्रोंच्या संख्येने लोक उपस्थित राहत. अधिक अध्ययनासाठी अ स भिडे लिखित *"Savarkar's Whirlwind Propaganda"* अर्थात सावरकरांचा झंझावाती प्रचार हा ग्रंथ जिज्ञासूंनी अभ्यासावा. पीडीएफ आहे. ह्या प्रवासाच्या अंती तात्याराव काश्मीरांस गेले.

*९ जुलै १९४२ यादिवशी तात्याराव काश्मीरला जाण्यांस निघाले.* १० जुलैंस ते दिल्लीस पोहोचले. तिथे प्रचंड जनसमुदायासमोर भाषण करताना तात्याराव म्हणाले की
*"तुम्ही मुर्दाबाद नि जिंदाबाद हे परकीय उर्दु शब्द त्यागून नाश हो, अमर रहे, जय हो आदि घोषणा द्यावांत."*
श्रीशिवछत्रपतींच्या भाषाशुद्धीच्या नि स्वभाषा अभिमानाच्या विचारांचे नि कृतीचे सत्यनिष्ठ कृतिशील संवाहक सावरकरंच होते ह्यात यत्किंचितही संदेहंच नाही. आणि म्हणूनंच त्यांच्या सूचनेनुसार तिथल्या प्रचंड जनसमुहाने *"अखंड भारत अमर रहे, पाकिस्तान नाश हो, स्वा. सावरकर की जय"* वगैरे घोषणांचा उद्घोष केला. मीरत, अंबाला, लुधियाना, अमृतसर, गुजराणवाला आदि स्थानके करत  *अंबाला स्थानकांवर विमान दलाचे युवक नि रा.स्व. संघाचे स्वयंसेवक तात्यांना भेटण्यांस आले* नि उपरोक्त उद्घोष करते झालें.

*गांधींची वैचारिक दिवाळखोरी*

ह्याकालावधीतंच कथित महात्मा गांधींनी आपल्या ब्रिटीशनिष्ठेचे प्रदर्शन करीत...

*ब्रिटीशांना इथून निघून जाऊद्या पण त्यांचे सैन्य मात्र इथेच राहुद्या...*


असे बाष्कळ विधान केले होते. आयुष्यभर ख्रिस्तप्रणीत अहिंसेची टिमकी वाजविणारा हा कथित महात्मा ही अत्यंत वैचारिक दरिद्रतेची घोषणा करतो ह्यापेक्षा दुर्भाग्य ते काय?ज्या ब्रिटीशांनी सैन्याच्या सहाय्यानेच आपल्यावर राज्य केले त्यांचे सैन्य इथेच राहु द्या असले भंपक नि अव्यवहार्य तत्वज्ञान मांडणारा हा राष्ट्रपिता म्हणावा काय ह्याचा विचार प्रस्तुत लेखकांस करावासा वाटतोच. वाचकांनी ठरवावे काय योग्य नि अयोग्य ते...
*दिनांक १४ जुलैच्या काँग्रेस कार्यकारिणीने संमत केलेल्या ठरावांत हे अत्यंत परस्परविरोधी विधान आहेच.* कुणीही पाहु शकतं ज्यांना प्रमाण हवंय ते निम्नलिखित पाहु शकतात


Gandhiji had repeatedly made it clear that “Quit India”demand meant only the removal of the British power and not the physical removal of British officers, administrators and army personnel. All of them, including the armies of Britain and the Allies, would continue to stay here—only under an agreement with us and not against our will as at present. 

संदर्भ - Collected Works Of Mahatma Gandhi - Volume Eighty-three : (Jun 7, 1942 - Jan 26, 1944)





एकीकडे पाकिस्तान पाप आहे असे म्हणायचे नि दुसरीकडे पापस्तानला स्वयंनिर्णयाची मान्यता द्यायची. तद्वतंच ब्रिटीश गेले तरी सैन्य इथेच ठेवा ह्यासारखा भोंगळ गांधीवादी गोंधळ जगांत कुठेच पहायला प्राप्त होणार. ह्यासाठी प्रतिकार म्हणून सावरकरांनी त्यांस प्रत्युत्तर देताना लाहोर मध्ये तात्यांनी गांधींची ही घोषणा किती बाष्कळपणाची आहे हे सांगितले आणि

*हिंदुंनी राजनीतीचे हिंदुकरण नि हिंदुंचे सैनिकीकरण करावे*

ही घोषणा दिली जी तात्याराव ह्याआधीही अनेकवेळा देत आले होते...

*११ जुलैला तात्याराव दुपारी ४ वाजता जम्मुंस पोहोचले...*

तिथे खड्गधारी शीखांनी त्यांस मानवंदना दिली. अनेक सुवासिनींनी त्यांस ओवाळले. १५-२० सहस्त्रांच्या संख्येत त्यांची मिरवणुक निघाली होती.. मानपत्रे, पानसुपारी, अत्तरांचा सडा नि त्याचा घमघमाट, छोटी छोटी भाषणे असा हा कार्यक्रम सुरु होता.

*पुढे १२ दिनांकास हरी चित्रपटगृहात 'अखंडभारत' ह्या विषयांवर तात्याराव दीड तास* बोलत होते. त्यात त्यांनी काँग्रेसचा राष्ट्रद्रोह, ब्रिटीशांची कुटनीती, मूस्लिमांची घातकी प्रवृत्ती, गांधीगोंधळ ह्या सर्वांपासून परावृत्त होण्याची कळकळ व्यक्त केली.

*पुढे तात्याराव श्रीनगरला गेले.* राजा नरेंद्रनाथांनी त्यांचे उत्साहांत स्वागत केले. मानपत्र, हारतुरे, मिरवणुकींस उत्तर देताना तात्यारावांनी एका तासाच्या भाषणामध्ये

*"आर्य येथे कसे आले, त्यांनी इथे मुक्तसंचार कसा केला, राज्ये कशी स्थापन केली, ती कशी लढविली ह्याचा धावता चित्रपट माझ्या अंतःचक्षुंपुढे उभा आहे."*

या भाषणांत तात्याराव स्वतः नि श्रोते इतके रंगले की ते मान डोलवायला लागले, हसत होते, टाळ्यांचा गडगडाट करत होते. त्यानंतर प्रचलित देशांतील प्रश्नांसाठी संवाद करून त्यांनी आणखी दोन सभांमध्ये भाषणे दिली, ज्यातली एक सभा महिलांची होती. ह्या उत्साहाने भारावून जाऊन तिथल्या लोकांनी त्यांची दुसर्या दिवशी पुन्हा मिरवणुक काढली व चाळीस सहस्त्रांच्या समोर ती सभा वितस्ता नदीच्या काठी सभेत रुपांतरित झाली.

एखाद्यांस वाटेल की ते आर्याक्रमण सिद्धांताचे पुरस्कर्ते होते की काय पण उपरोक्त वचनांतून हा अर्थ निघत नाही हे त्यांच्या समग्र साहित्याच्या अध्ययनाने आपणांस पटण्यासारखं आहेच. त्यांच्या मते आर्य बाहेरुन आलेले नसून ते मूळचे इथलेच होते. त्यांनी कुठेही आर्याक्रमणाचे समर्थन साहित्यात केलेले नाहीच.

ह्या सभेचे एका तत्कालीन वार्ताहराने केलेलं वृत्तवर्णनही उत्तम आहे. तो लिहितो...

*"ह्या दृश्याने सावरकरांची वाग्देवी सुप्रसन्न न होती तरच आश्चर्य. कधा ललित नृत्य तर कधी तांडव नृत्य अशा प्रकारे सर्व श्रोत्यांची मने तिने आकर्षून घेतली...त्यावेळी सावरकरांच्या पायाला स्पर्श करून त्यांना वंदन करण्यासाठी स्त्री-पुरुष मुलांनी दाटी केलेली होती."*

*पुढे तात्याराव १७ दिनांकास रावळपिंडीस पोहोचले. रा स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी व इतरांनी* त्यांचे स्वागत केलं. ह्या प्रवासाच्या आरंभीच तिथल्या मुस्लिमांनी तात्यारावांना एक निवेदन दिलं होते ते असे

*"तुम्ही लोकशाहीवादी, तर्क शुद्ध विचारांचे, निर्भीड नि व्यवहारी आहात. काश्मीरमध्ये तर ७५ प्रतिशत मुसलमान असतानादेखील त्यांना त्यांच्या अधिकाराच्या पन्नास प्रतिशत जागाही प्राप्त होत नाहीत. आपण ह्या मागण्यांचा विचार करावा नि आम्हांला न्याय द्यावा."*

तात्यारावांनी त्यांच्या भाषणांतून ह्यांस उत्तर तर दिलेच होते पण महाराष्ट्रांत परत आल्यावर त्यासंबंधी एक पत्रकही काढले, ज्याचे संपूर्ण वृत्त *"Historic Statements - ऐतिहासिक निवेदने"* ह्या ग्रंथामध्ये वाचण्यांस प्राप्त होईल. पुढील लेखांकांत आपण ते सविस्तर पाहुयांत...

*एक महत्वाचे*

ह्या *संपूर्ण प्रवासांत अमर हुतात्मा पंडित नथुराम गोडसे तात्यारावांबरोबर अगदी छायेसारखे होते बरंका. त्यांचे कार्य, व्याख्याने ह्याविषयी पुढील लेखांकात त्याविषयी सविस्तर लिहुच.*


भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandined.blogspot.com

Wednesday, 10 July 2019

पंढरीचा श्रीविठ्ठल बुद्ध किंवा बौद्ध, जैन, वीरगळ आहे काय??? - लेखांक प्रथम



*लेखांक प्रथम*

*धर्माचे पालन, करणे पाषांड खंडण।*
*हेचिं आह्मांसि करणे काम, बीज वाढवावें नाम।*
जगद्गुरु श्रीतुकोबाराय 

आमच्या मागील लेखांत आम्ही म्हटल्याप्रमाणे ह्या लेखमालेत आमच्या भूवैकुंठाधिपती परमात्मा श्रीपंढरीशाच्या मूर्तींवर नि एकूणच इतिहासांवर गेल्या काही दशकांत जे काही निराधार आक्षेप घेतले गेले आहेत, त्यांचे निराकरण करण्याचे कार्य करणार आहोत. वास्तविक हे कार्य आमच्या पूर्वसूरींनी केंव्हाच करून ठेवलं आहेच. त्यात *वै. हभप. श्री सोनोमामा दांडेकर* असतील, आमच्या पंढरीतले *डॉ. श्री. गोपाळराव बेणारे* असतील, पंढरीतलेच संतसाहित्याचे अभ्यासक आणि भाष्यकार आणि *'वारकरी संप्रदायाचा उगम आणि इतिहास'* हा अभ्यासपूर्ण ग्रंथ निर्माण करणारे *श्री भा पं बहिरट* असतील, *ज्येष्ठ इतिहासकार, पुरातत्ववेत्ते आणि मूर्तीशास्त्रज्ञ श्री ग ह खरे उपाख्य तात्या खरे* असतील. ह्या सर्वांनीच भगवान श्रीविठ्ठल मूर्तीवरील निरर्गल नि निराधार वादांचे निराकरण आपल्या प्रगल्भ बुद्धीने, तर्कशुद्ध विवेचनाने, प्रत्युत्पन्न मतीने आणि सप्रमाण ससंदर्भ विवरणाने साडेतीन दशकांपूर्वीच करून ठेवले आहे. त्यामुळे आमची भूमिका केवळ

*फोडिलें भांडार, धन्याचा हा माल।*
*मी तो हमाल, भारवाही।*

अशीच आहे. ह्या श्रीतुकोक्तीप्रमाणे हा लेखनप्रपंच करताहोत.

गेली अडीच वर्षे हा विषय अंतःकरणात असल्याने येविषयीं लिहिण्याची इच्छा वारंवार व्हायची. मागील वर्षीच ह्या दृष्टीने अध्ययन केल्याने तेंव्हाच लेखन करायचे होते पण ते तसेच कार्यबाहुल्यामुळे राहिले. म्हणूनच आषाढी एकादशीच्या आधी काही दिवस हा प्रपंच करताहोत.

*भारत विखंडन शक्तींचे षडयंत्र*

इतिहासाच्या नि वर्तमानाच्या विकृतीकरणातून समाजाचा किंवा मानवसमूहाचा बुद्धिभेद करणे हा देशविघातक शक्तींचा नेहमीचा प्रयत्न असतो. त्यातूनच मग हे असे प्रयत्न वारंवार केले जातात.

प्रतिवर्षी आषाढी किंवा कार्तिकी आली की समाज माध्यमांवर पंढरीश श्रीविठ्ठलाच्या विषयी वाट्टेल ते लेख प्रसृत व्हायला लागतात. हे एकवेळ ठीक होते. पण हे द्वेषाचे वावटळ इतके उठलं की दीड वर्षांपूर्वी आमच्या काही नवबौध्द बांधवांनी कोरेगाव भीमाच्या उदात्तीकरणासाठी कोरेगाव ते पंढरी यात्राही सुरू केली. इतकंच काय पण पंढरीतच श्रीविठ्ठल मंदिराभोवती ह्यातल्या काही कथित भिक्षूंनी प्रदक्षिणा घालून विठ्ठल आमचाच आहे अशीही खोटीच आवई उठविण्याचा एक बालिश प्रयत्न केला. त्यावेळी दुर्भाग्याने ते दृश्य आम्ही पाहिलं होते.

मुळात विद्यमान भाजप सरकारने मतांच्या लाचारीसाठी जिथे ह्या कोरेगाव भीमासारख्या प्रसंगाचे उदात्तीकरण केलंय, तिथे ह्या आमच्या नवबौध्द बांधवांना आवेशात येऊ वाटणार त्याचे नवल ते काय? सरकारी पाठिंब्यानेच हे सर्व होत असेल तर काय लिहावे? आणि काही कथित उजव्या समाजवाद्यांनीही ह्यांस मूक संमतीही दिलीच होती. शेवटी एकदा पेशव्यांना जातीयवादी घोषित केलं की संपलंच ना. असो तो स्वतंत्र विषय.

पण जगद्गुरु श्रीतुकोबारायांच्या भाषेंत

*बुडती हे जन न देखवेना डोळा।*
*येतो कळवळा म्हणोनियां मज।*

इतर कुणी ह्याविषयी भीतीने किंवा लांगुलचालनाच्या दुष्प्रवृत्तीने मूग गिळून गप्प राहत असतील तर खुशाल राहोत, आम्ही शांत राहूच शकत नाही म्हणून हा अट्टाहास. कारण आपल्यासमोर हा सत्याचा प्रकट अपलाप होताना आपण तो षंढपणे पाहत बसणे ह्यासारखी आत्मवंचना नव्हेच. म्हणूनच...

ह्याआधी ह्याच श्रीविठ्ठल मूर्तींवर ती जैन असल्याचा, ती वीरगळ असल्याचा तर काही रा चिं ढेरेंसारख्या कथित अभ्यासकांनी तो मूळचा यादव जनजातींचा म्हणजे गवळी धनगर बांधवांचा लोकदेव असल्याचा आणि पुढे त्याचे वैदिकीकरण केल्याचाही मिथ्या आरोप केला होता. त्यातही त्यांनी माढ्याची मूर्ती मूळ असाही तर्क केला होता.

पण सुदैवाने त्याचवेळी उपरोल्लेखित ज्येष्ठ इतिहासकार श्री तात्या उपाख्य ग ह खरेंनी त्यांच्या *श्रीविठ्ठल आणि पंढरपूर* आणि *महाराष्ट्रातील चार दैवते* ह्या दोन ग्रंथांमध्ये ह्या आक्षेपांचे साधार नि सप्रमाण खंडण साडेतीन दशकांपूर्वीच केलं आहे. त्याआधी केसरीत त्यांनी लेखमालाही सविस्तर लिहिली होतीच आणि ढेरेंचं सारेच कथित संशोधन खोडून काढले होतेच. दुर्दैवाने ढेरेंचा ग्रंथ प्रकाशितही आहे. त्याचे खंडण झाल्याचेही लोकांस ज्ञात नाही ही शोकांतिका आहे.

*हभप डॉ. बेणारेंचा विशेष उल्लेखनीय ग्रंथ किंवा पुस्तिका*

पंढरीतल्या श्रीविठ्ठलांस पहाटे वेदमंत्रांनी जागृत करण्याचे कार्य जे बेणारे परंपरेने करत आले होते, त्याच बेणारे वंशातले *ज्ञानेश्वरी वरील मराठी आणि हिंदी भाष्यकार डॉ. श्रीगोपाळराव बेणारे ह्यांनीही *श्रीविठ्ठलमूर्ती वाद नि खंडण* नावाने एक पुस्तिका लिहून उपरोक्त आक्षेपांचे सप्रमाण खंडण केले होते. आश्चर्य म्हणजे पुण्यातल्या प्रथितयश भारत इतिहास संशोधक मंडळ इथे ह्याविषयी एक अभ्यास परिषद किंवा परिसंवाद झाला असताना त्यांस ग ह खरे, प्र. न. जोशी आदि इतिहासक्षेत्रातील दिग्गज मंडळी आणि डॉ. बेणारे स्वतः उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रणही करण्यात आले होते.

*आश्चर्य म्हणा किंवा काहीही म्हणा पण रा चिं ढेरे पुण्यात असूनही ह्या कार्यक्रमात हेतुपुरस्सर उपस्थित राहिलेच नाहीत. ह्यावरूनच त्यांच्या कथित संशोधनाची सत्यता आकळते.* ह्यावर ह्या लेखमालेतच सविस्तर आम्ही येणारंच आहोत.

*२१ मार्च १९८१ ह्या दिवशी हा परिसंवाद मंडळात झाला होता.* म्हणूनच जे कार्य पूर्वसुरीच्या विद्वानांनी करून ठेवलं आहे, तेच पुढं आणायचा हेतु आहे. भूमिका मांडण्यासाठीच हा प्रथम लेख आहे. उद्यापासून प्रथम् बुद्ध किंवा बौद्ध ह्या आक्षेपांचे खंडण करूयांत.

*आमच्या हिंदु नवबौध्द बांधवांना नम्रतेची विनंती !*

आंबेडकरांच्या नावाखाली काही देशविघातक शक्ती, ज्या भारत विखंडन शक्ती नावाने कार्यरत आहेत, त्या आमच्या हिंदु नवबौध्द बांधवांना अकारण त्यांच्याच बांधव असलेल्या आम्हा शेष हिंदू समाजाच्या विरोधात पेटविण्याचा प्रयत्न करताहेत. नवबौध्द बांधवांनी कृपा करून ह्या राष्ट्रविघातक शक्तींपासून दूर राहावे ही नम्रतेची विनंती !

एका महत्त्वाच्या शंकेचे निरसन

*जर श्रीविठ्ठल सर्वांचाच आहे तर त्यावर नवबौद्धांनी केवळ आपला अधिकार सांगितला तर त्यात आक्षेप काय?*

ह्याचे समाधान मुळात असे आहे की मुळात जे नाहीच ते ठसवायचा प्रयत्न का? श्रीविठ्ठलाच्या भक्तीचा सर्वांना अधिकार आहेच. तुम्हांस भक्ती करायची असेल तर श्रीविठ्ठल म्हणुनच करायला काय अडचण आहे तुम्हांस? त्याला अकारण विठ्ठल नसून बुद्ध किंवा बौद्ध सिद्ध करायचा अट्टाहास का? कारण एकीकडे बुद्धाने देवाचं अस्तित्वच नाकारलं असं म्हणायचे आणि दुसरीकडे श्रीविठ्ठल हाच बुद्ध आहे असे म्हणायचे हा कुठला भंपकपणा आहे? ही कसली आंबेडकरी पद्धत आहे संशोधनाची???

*एकीकडे २२ प्रतिज्ञा उच्चारून सर्व हिंदू देवी देवतांचा द्वेष करायचा आणि दुसरीकडे सर्व देवतांवर आता त्या आमच्याच मूळ बुद्ध आहेत असा वाद निर्माण करायचा? हे कुठले संशोधन?*

*आम्ही तुम्हांस आमचे बंधुच समजतो. पण एकीकडे आपल्याच बांधवांच्या देवतांचा द्वेष करायचा आणि दुसरीकडे सगळे देव आमचेच आहेत अशी टिमकी वाजवायची? हा कुठला न्याय???*

अस्तु।

पुढील लेखांत विठ्ठल मूर्तीचे बुद्ध किंवा बौद्ध आक्षेप पाहुयांत आणि निराकरण करूयांत.

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#पंढरपूरचा_श्रीविठ्ठल_बुद्धबौद्धनाहींच_आंबेडकर_आषाढीवारी_इतिहासाचे_विकृतीकरण

Saturday, 13 April 2019

*महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संस्कृतभाषा*



*संस्कृत भाषेचा आत्यंतिक द्वेष करणाऱ्यांनी अर्थात भारत विखंडन शक्तींनी नि त्यांच्या अनुयायांनी हे वाचूच नये. ज्यांच्या अंत:करणांत प्रामाणिक राष्ट्रभक्ती आहे, अशा प्रामाणिकांनीच हे वाचावे.*

संस्कृत भाषेविषयी बाबासाहेबांना प्रेम होते हे त्यांच्या चरित्रांवरून नि साहित्यावरून नि संविधान सभेतल्या भाषणांवरून दिसतेच. श्रमिक चळवळीतले एक दिग्गज नि एक विचारवंत श्री दत्तोपंत ठेंगडींच्या *"सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि बाबासाहेब"* ह्या ग्रंथामध्ये परिशिष्टामध्ये त्यांनी बाबासाहेबांच्या संस्कृतविषयीच्या भावनांचे समकालीन संदर्भ दिलेले आहेत. तिथे वाचावेंत.

*भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी संस्कृत भाषा ही ह्या देशाची राष्ट्रभाषा व्हावी हे आमचं केवळ प्रामाणिक मतंच नसून तो आग्रहही आहे. त्यादृष्टीने आम्ही स्वत: कार्यरत आहोतच. आमच्या आधीच्या अनेक लेखांतही मा. सर्वोच्च न्यायालयाची मते आम्ही मांडलीच आहेत.* मागील लेख वाचावेत.

पण आज एका महामानवाने ह्याभाषेविषयी व्यक्त केलेल्या मतांचा इथे विचार करणं आवश्यक असल्याने हा लेखनप्रपंच !

*बाबासाहेबांनी संस्कृतमध्ये संवाद केल्याचे संदर्भ निम्नलिखित घ्या...* 👇👇👇

*दै. हिन्दुस्थान, १२ सप्टेंबर, १९४९*

*राजभाषा संस्कृत व्हावी प्रस्ताव मांडणाऱ्यांमध्ये डॉ. आंबेडकर सुद्धा*

नवी दिल्ली - *विधान परिषदेच्या ज्या सदस्यांनी संस्कृत भारताची राजभाषा व्हावी म्हणून प्रस्ताव मांडला, त्यात भारताचे विधिमंत्री डॉ. आंबेडकर सुद्धा आहेत. त्यांना समर्थन देणारे उपनिवेश मंत्री श्री बी जी केसकर तसेच नसिरुद्दिन अहमद सुद्धा होते. हे केसकर आमच्या हिंदुसभेचे. ह्यांच्यावर कधीतरी सविस्तर लिहीन.*

या विषयात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर डॉ. आंबेडकर यांनी पीटीआयशी बोलताना त्यांनाच विचारले

*"का ? संस्कृत मध्ये काय दोष आहे?"*

*विधान परिषद भाषेवर विचार करण्याच्या वेळी या प्रस्तावावर विचार करेल. यावरच या सूचनेवर सह्या करणारे पंडित लक्ष्मीकांत मित्र, टीटी कृष्णम्माचारी इत्यादी तेरा-चौदा सदस्य होते. या दुरुस्तीत म्हटले होते ही भारताची राजभाषा संस्कृत असेल, पंधरा वर्षे राज्य भाषा इंग्रजी राहील.  मूळ प्रस्तावात हिंदी भाषा शब्द होता तो बदलून संस्कृत भाषा हा शब्द घालून दुरुस्ती मांडली..*

*दि स्टेट्समन - दिनांक ११ सप्टेंबर, १९४९ ह्या वृत्तपत्रामध्येही मध्ये उपरोक्तच संदर्भ आहे.*



*डॉ.आंबेडकरांनी संस्कृत मध्ये संवाद केल्याचा समकालीन संदर्भ* 👇👇👇

*दै. आज (हिंदी), १५ सप्टेंबर, १९४९*

नवी दिल्ली - *केंद्राच्या चर्चेमध्ये आज मोठी उत्सुकता दिसत होती. भाषेच्या प्रश्नावर एक एक गट जोरजोरात चर्चा करीत होता. लोकांची उत्सुकता इतकी वाढली की आता डॉ. आंबेडकर तसेच लक्ष्मीकांत मैत्र आपापसात संस्कृत मध्ये चर्चा करू लागले. लक्षात असू द्या की त्या दोघांनी संस्कृत राजभाषा करण्यासाठी दुरुस्ती सुचवली होती..*

*दि लीडर (इंग्रजी) अलाहाबाद, १३ सप्टेंबर, १९४९* 👇👇👇

*डॉ. आंबेडकर व पंडित लक्ष्मीकांत मैत्र हे दोघे संस्कृत राष्ट्रभाषा व्हावी या चर्चेच्या वेळी विधिमंडळात संस्कृत मध्ये संभाषण करत होते.*

*दि हिंदु, ११ सप्टेंबर, १९४९* 👇

भारताची राज्यभाषा, संस्कृतसाठी आग्रह

घटनेच्या त्या कलमामध्ये दुरुस्ती सुचवण्यात आली. नवी दिल्ली

*ज्यांनी संस्कृत भारतीय संघराज्याची राजभाषा असावी असे सुचवले त्यात विधिमंत्री डॉक्टर बी आर आंबेडकर होते. त्यांना केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर बी व्ही केसकर यांनी व श्री नसरुद्दीन अहमद यांनी पाठिंबा दिला.* या ठरावाबाबत प्रश्न विचारल्यावर डॉक्टर आंबेडकर यांनी तिच्या वार्ताहराला विचारले ,

*"संस्कृत मध्ये काय दोष आहे?"*

जेव्हा घटना परिषदेत राज्य भाषेचा प्रश्न येईल, तेव्हा दुरुस्तीचा विचार केला जाईल.

ती दुरुस्ती याप्रमाणे होते

*अनुच्छेद ३१०(१) यामध्ये एक संघराज्याची शासकीय भाषा संस्कृत असावी*

*अनुच्छेद ३१०(१) काहीही सांगितले असले तरी ही राज्यघटना अमलात आल्यापासून पंधरा वर्षे इंग्लिश ही संघराज्याची राजभाषा म्हणून चालू राहील. पण या काळात राष्ट्रपती संस्कृत भाषेला इंग्लिश भाषेबरोबरच राजभाषा म्हणून वापरण्याची अधिकृत मान्यता देतील. हिंदी ऐवजी संस्कृत राष्ट्रभाषा करावी हे सुचविले गेले.*

आश्चर्य म्हणजे *दि नैशनल हेराल्डनेही हेच उपरोक्त दि हिंदुचे वृत्त छापले आहे  ११ सप्टेंबर, १९४९*

*अखिल भारतीय मागास जाती संमेलन - १९४९ सप्टेंबर*

*डॉ. आंबेडकरांनी* ह्यामध्ये *संस्कृत हीच राष्ट्रभाषा व्हावी* हा ठराव मांडला होता.

*जाता जाता एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे* 👇

त्यांना संस्कृत येत होते ह्याचा अर्थ त्यांनी हिंदुधर्मशास्त्राची केलेली सर्व समीक्षा अगदी अचूकंच आहे असा ज्यांना अंधभक्तीचा भ्रम असेल तो दूर करावा ही विनंती. कारण त्यांनी स्वत:च प्रामाणिकपणे हे मान्य केलं आहे. आज रात्री ह्यावर लेख येईलंच.

पण त्याआधी ते काय लिहितात ते पाहुयांत.

हिंदुधर्मग्रंथांचा अनुवाद करण्याइतकं संस्कृत आंबेडकरांना येत नव्हते हे त्यांनी स्वत: मान्य केलं आहे. कारण वैदिक व्याकरण नि लौकिक व्याकरण हा भेद आहे. ह्यावर सविस्तर लेख आमचा आज येईलंच. तत्पूर्वी

*"शुद्र कौन थे*" ह्या त्यांच्या अभ्यासपूर्ण ग्रंथामध्ये त्यांनी स्वत:च ही गोष्ट मान्य केलीय की त्यांनी गत पंधरा वर्षांत हिंदु धर्मग्रंथांच्या आंग्लानुवादाचे(इंग्रजी भाषांतरांचे) अध्ययन करूनच धर्मशास्त्रीय चिकीत्सेचे निष्कर्ष काढलेले आहेत. त्यांना परंपरेतून वैदिक संस्कृतचे तितकेसे ज्ञान नाही. कारण हिंदुधर्मशास्त्राची चिकीत्सा करण्यापूर्वी न्यूनतम बारा ते पंधरा वर्षे कालावधी व्याकरण नि इतर सर्व वेदांगांच्या अध्ययनासाठी देणं आवश्यक आहे. एकट्या पातंजल महाभाष्याचे अध्ययनंच पाच वर्षांचे आहे. ज्यांना हे असत्य किंवा अत्युक्ती वाटते त्यांनी स्वत: ते करावे. आम्हांस ह्याचा अनुभव आहे.

हिंदुधर्मशास्त्राची चिकित्सा झालीच पाहिजे. ह्यात दुमत नाहीच. पण अनेकांना केवळ इतरांचे ग्रंथ वाचून हिंदुधर्मांवर बोलण्याची किंवा लिहिण्याची सवय असते.  अस्तु!

आता बाबासाहेबांच्या वक्तव्याचे प्रमाण निम्नलिखित आहे.

*समग्र आंबेडकर हिन्दी वाङ्मय खण्ड १३ - शुद्र कौन थे ?*

ते म्हणतात

*"यदि चेतावनी इस आशय से दी जाती है कि मै संस्कृत भाषाका पारङ्गत नहीं हुँ, तो अपनी इस कमजोरी को मैं स्वीकार करता हुँ । संस्कृत में ऐसा कौनसा साहित्य हे जो अंग्रेजी भाषा मे उपलब्ध नही है । तब संस्कृत भाषा के ज्ञान का अभाव मुझे इस विषयपर विवेचन करनेसें कैसे रोक सकता है ?मैं यह कहने का साहस कर सकता हुँ कि अंग्रेजी अनुवाद के रुपमें उपलब्ध प्रासङ्गिक साहित्यके पन्द्रह वर्षोंके अध्ययन से कोई भी मेरे जैसा व्यक्ति औसत दर्जे का ज्ञान अर्जित कर सकता है जिस को कोई कार्य संपन्न करने की क्षमता प्राप्त हो सकती है ।"*

पृष्ठ क्रमांक १४ - उपरोक्त

पृष्ठ सोबत जोडलंच आहे.



ह्यात त्यांना कमी लेखण्याचा हेतु अजिबात नाही. त्यांच्याविषयी आम्हांस पूर्ण आदरंच आहे. केवळ सत्य स्थिती सांगण्याचा हेतु आहे.

*बाबासाहेबांचे समग्र वाङ्मय एकाच ठिकाणी स्कैन्ड*

ज्यांना हे आमचं उपरोक्त लेखन असत्य वाटत असेल, त्यांनी डॉ. आंबेडकरांचे समग्र वाङ्मय स्कैन्ड स्वरुपांत आहे, जे राज्य सरकार नि केंद्र सरकारने त्या-त्याकाळी प्रकाशित केलेलं आहे, ते पहावे ही विनंती. हे सर्व खंड पीडीएफ स्वरुपांत निम्नलिखित संकेतस्थळांवर उपलब्ध आहेतच.

http://velivada.com/2017/05/01/pdf-21-volumes-of-dr-ambedkar-books-in-hindi/

इथून संग्राह्य (डाऊनलोड) करावेत ही विनंती !

त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांस विनम्र अभिवादन !

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#डॉ_आंबेडकर_महामानव_संस्कृत_राज्यभाषा_राष्ट्रभाषा_संविधानसभा_भारतीयत्व_हिंदुधर्मशास्त्र_चिकीत्सा

Wednesday, 14 November 2018

अथ ऋग्वेदे यम-यमी सूक्त विचार: । - लेखांक तृतीय

मागील द्वितीय लेखांकात आपण चतुर्वेदभाष्यकार श्रीमत्सायणाचार्यांची वेदभाष्याविषयीची नि एकुणच वेदांविषयीची भूमिका त्यांच्याच शब्दांत पाहिली. ज्यांना तो लेखांक वाचायचा असेल, त्यांनी इथे वाचावा ही विनंती.

*http://pakhandkhandinee.blogspot.com/2018/11/blog-post_10.html?m=1*

आता त्या लेखांतच म्हटल्याप्रमाणेच या लेखामध्ये आपणांस त्यांच्या यम-यमी सूक्ताविषयीच्या विचारांची मांडणी करायची आहे नि त्याची समीक्षा करायची आहे.

सायणांचे भाष्य अनेकांनी प्रकाशित केलं. *आम्ही प्रस्तुत लेखमालेसाठी परमादरणीय राष्ट्रसूत्रधार श्रीलोकमान्य टिळकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पुण्यातच स्थापन झालेल्या वैदिक संशोधन मंडळाने संपादित केलेली ऋग्वेदभाष्याची चतुर्खंडात्मक संपूर्ण संस्कृत प्रतच अभ्यासली आहे. राजवाडे, सातवळेकर आदि विद्वानांनी त्याचे संपादन केलं होते. आंतरजालांवर ती पीडीएफ स्वरुपांत*

https://archive.org/search.php?query=Rg%20Veda%20with%20Sayana%27s%20Commentary

येथे प्राप्य आहे. जिज्ञासूंनी ती इथे अभ्यासावी. अस्तु ।

ह्याचे चार खंड असून चतुर्थ खंडात नवम नि दशम मंडलाचे भाष्य असून पृष्ठ क्रमांक २९४ ते २९९ पर्यंत हे यम-यमी सूक्त आहे. ह्यात सायणाचार्यांनी जागोजागी यम-यमींस भाऊ-बहीणच सिद्ध करण्याचा अट्टाहास केलेला आहे हे ज्याला संस्कृत कळतं त्याला सहज लक्षात येईल. ज्यांना संस्कृत येत नाही त्यांनी पंडित श्रीराम शर्मा आचार्यांचे सायणावलंबी भाष्य अभ्यासावे. तेही पीडीएफ उपलब्ध आहे. किंवा कोणत्याही सायणाचार्यांच्या हिंदी भाष्यकाराचे अभ्यासावे. *सोबत मूळ सायण भाष्य नि त्याचा पंडित भीमसेन शर्माकृत हिंदी भाष्य १८९५ ह्या वर्षीचे हे सर्व पीडीएफ जोडलंच आहे.*

https://drive.google.com/file/d/1yKbm5-TwTZVPmVY5AeDmGJaUVAP9hzNB/view?usp=drivesdk

ह्या सूक्ताच्या प्रथम मंत्रामध्ये सायणाचार्यांच्या मते विवस्वान नामक पुरुषांस जन्माला आलेले यम-यमी नामक पुत्र-पुत्री असून एके दिवशी एका निर्जन अशा विस्तीर्ण समुद्राच्या तीरावर मध्यभागी यमी यमांजवळ येऊन त्यांस प्रणययाचना करते. द्वितीय मंत्रामध्ये आपण दोघे सहोदर असल्याने हा संपर्क योग्य नाही असे बोलून यम तिला नाकारतो. केवळ हा भाग निर्जन आहे म्हणजे आपल्याला इथे कुणी पाहणार नाही हा तर्क खोडताना यम तिला वायु, अंतरिक्ष आदि साक्षीदारांची मांडणी करतो नि ते आपलं हे निंद्यनीय कर्म पाहतील असा तर्क करतो. ईश्वराने ही सर्व व्यवस्था केली आहे असे सांगतो. तृतीय मंत्रात तर यमीचे उत्तर सांगताना सायणांनी  प्रजापतीने अर्थात ब्रह्मदेवाने पूर्वी स्वकन्येशी ते कर्म केलं असा संदर्भ देऊन यमी याचना करते असे भाष्य केलं आहे. किंवा पूर्वी देवांनीही ते कर्म केलं आहे असे लिहिलंय.

सायणाचार्यांसारख्या विद्वानांनी असे लेखन करावे? कधी देवांनी असे निंद्य कर्म केलंय ? हे त्यांच्या समग्र वेदभाष्याविषयीच्या भूमिकेशी, जी आम्ही मागील लेखांकातच मांडलीच आहे, तिच्याशी पूर्ण विद्रोह करणारे आहे. म्हणून आमचं ठाम मत आहे की सायणांचे हे भाष्यच नव्हे. आणि जरी असले तरी हे निंद्यच आहे. मूळीच अनुकरणीय नाही.

*मूळात प्रजापतीने स्वदुहितेशी अर्थात ब्रह्मदेवाने स्ककन्येशी व्यभिचार कर्म केले असा जो आरोप ऐतरेय ब्राह्मणांच्या मूळ सूर्य नि उषेच्या अलंकारिक कथेवरून पुराणकथाकारांनी लावलेला आहे की ज्यावरून वैदिक धर्मांवर वाट्टेल ते घाणेरडे आक्षेप घेण्यांस शत्रुंचं फावतं, ती प्रजापतीची दूहिता ही कथा नेमकी काय आहे येंविषयी निरुक्तकारांनी स्पष्ट अभिप्राय दिला असून, अगदी ऐतरेय ब्राह्मणकारांनीही ती कथा सूर्याचे रुपक आहे असे स्पष्ट सांगूनही तिचा संबंध तथाकथित चतुर्मुखी ब्रह्मदेवाशी जोडून त्यांस निंदित करण्याचे पातक जे झालं आहे, त्याविषयी स्वत:ला पुराणप्रेमी म्हणविणारे काय स्पष्टीकरण देणार आहेत ?*

सुदैवाने ह्यावर सर्वप्रथम *वेदोद्धारक महर्षि दयानंदांनी त्यांच्या *ऋग्वेदादिभाष्यभूमिका* ह्या ग्रंथामध्ये स्पष्टपणे शंका निरसन केलंच आहे. ही *कथा अलंकारिक आहे* हे सप्रमाण सिद्ध केलं आहे. पुढे *वेदमहर्षी श्रीपाद दामोदर सातवळेकरांनीही त्यांच्या वेदभाष्यामध्ये नि *भारतीय संस्कृती* नामक ग्रंथामध्ये ह्या *प्रजापतीची दुहिता* नामक कथेचा विस्तार करताना ती सूर्याची अलंकारिक कथा किंवा *त्या प्रजापतीच्या अर्थात राजाच्या सभा नि समिती अशा दोन कन्या असा राज्यव्यहारपरक अर्थ लावला आहे. ह्यासाठी त्यांनी अथर्ववेदाच्या मंत्राचाच संदर्भ दिला आहे.* ज्याने वैदिक साहित्याचे प्रामााणिक अध्ययन डोळसपणे केलंय, त्याला हे अलंकार सहजगत्या लक्ष्यात येतीलच. अस्तु !

तरीही सायणाचार्य ह्या सूक्तामध्ये प्रजापतीची दूहिता ह्या कथेचा विकृतार्थ काढून यमीच्या मुखातून ते उच्चारतात हे कितपत वैदिक सिद्धांतांस धरून आहे ? यद्यपि पुढील मंत्रांत यमाने तिचा निषेध केला असला तरी हा अर्थ विकृतच आहे. सायणांनी सूर्यापासून सरण्युंस हे दोन पुत्रपुत्री झाले असे यमाच्या तोंडी घातलंय. आता मूळात सूर्य हा जड पदार्थ आहे. तो कसा रुप धारण करेल ? सूर्य नामक जडापासून कशी कुठल्या स्त्रींस कन्यापुत्र होतील ? वेदांमध्ये स्पष्टपणे मनुष्यजीवनिर्मितीसाठी स्त्री-पुरुषांचे रजो-वीर्यमीलन हेच मैथुनी सृष्टीचे कारण यजुर्वेदामध्ये सांगितलं आहे, ज्यात पुरुष हा उपादान कारण असून स्त्री ही निमित्त कारण आहे. अमैथुनी सृष्टी ही केवळ आदिसृष्टीत होते अशी वेदांची स्पष्ट मान्यता असल्यामुळे इथे सूर्याची कुठल्याही स्त्रीपासून संतानोत्पत्ती संभवच नाही. हे सर्व आम्ही यम-यमींस मानवदेहधारी स्त्री-पुरुष अथवा जीवविशेष मानणार्यांसाठी लिहिलं आहे.

पुढील सहाव्या मंत्रामध्ये यमीने स्वर्ग (द्यौ) नि नरक नामक स्थानविशेषाची गोष्ट केली आहे की जी वैदिक सिद्धांतांस मूळीच अनुसरून नाही. *स्वर्ग किंवा नरक हे कोणतेही स्थानविशेष नसून निरुक्तकारांनी स्पष्टपणे त्यांस केवळ सुखादि भावना हेच नाव दिलं आहे. येविषयी आमचा एक आधीचा लेख आहेच. निरुक्तकारांनी स्पष्टपणे अध्याय २ खंड १२ व १३ येथे स्पष्टपणे स्वर्ग हा कोणताही स्थानविशेष नसून तो केवळ सुखनाम आहे असे स्पष्ट सांगितलं आहे. तरीही सायणाचार्य निरुक्तकारांना नाकारताना ते स्थानविशेष असे मानताना दिसतात. हे भाष्य खरंच सायणांचेच आहे का ?*

*स्वत: परमहंस भगवान पुज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांनीही वैकुंठादि लोक स्थानविशेष नाहीत असे स्पष्ट एका स्तोत्रांत लिहिलं आहे. तो संदर्भ मी सविस्तर देईनच.*

*दहाव्या मंत्रामध्ये "जामय:" शब्दाचा अर्थ सायणांनी बहिण असा काढलाय. वास्तविक पाहता निघण्टु मध्ये १.१२ येथे जामि हे उदकनाम अर्थात जल ह्या अर्थाने आहे. अंगुली अर्थात बोट असाही दिलाय.*

अमरकोशामध्ये जामि शब्दाचा अर्थ

*जामि स्त्री। भगिनी*

*समानार्थक: भगिनी,स्वसृ,जामि*

*३।३।१४२।२।२* असा दिला आहे तर तिथेच आणखी कुलस्रिया किंवा स्नुषा अर्थात सून असाही आहे. मनुस्मृतीमध्येही जामयो म्हणजे घरातील स्त्रिया असा शब्द आहेच.

ऋग्वेद ६.२५.३ येथील मंत्रानुसार

*इन्द्र॑ जा॒मय॑ उ॒त येऽजा॑मयोऽर्वाची॒नासो॑ व॒नुषो॑ युयु॒ज्रे । त्वमे॑षां विथु॒रा शवां॑सि ज॒हि वृष्ण्या॑नि कृणु॒ही परा॑चः ॥*

म्हणजेच वेदाच्या प्रत्यक्ष अंत:साक्षीनुसार इथे *जामय शब्दाचा अर्थ पतिव्रता भार्या* असाच घ्यायला हवा. महर्षि दयानंदांनीही तोच घेतला आहे. बहिण म्हणून नव्हे.

*ज्या सायणांनी आपल्या वेदभाष्याच्या भूमिकेत स्पष्टपणे वेदांमध्ये कोणताही मनुष्यादिकांचा किंवा कुणाचाही इतिहास नाही असे स्पष्ट म्हटलं आहे, तेच सायण प्रजापतीने अर्थात ब्रह्म्याने स्वकन्येशी व्यभिचार केला असे लिहितील का? किंवा देवांनी असे कर्म आधी केलं असे लिहितील का ? बरं ह्याच सायणांनी वेद सृष्ट्यारंभीच प्रकाशित झाले असे स्पष्ट लिहिलं आहे. असे सायणाचार्य श्वेताश्वतरोपनिषदाच्या*

*यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै ।*

ह्या वचनानुसार त्या परमात्म्याने त्या ब्रह्म्यांस चार वेद दिले असे वचन कसे नाकारतील ? ह्याचाच अर्थ हे भाष्य सायणांचे नाहीयेच हे सिद्ध होते. अन्यथा ते त्यांच्याच भूमिकेशी विरोध कसा दर्शवतील ? बरं जरी त्यांचं आहे असे मानलं तरी स्वप्रतिज्ञाहानीचा नि पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा अदि सर्वांशीच विरोध केल्यासारखं होईल.

बाराव्या मंत्रातही यमाचा नकार कळविताना सायण बहिण-भावांचा संपर्क पाप आहे असाच अर्थ घेतात. तो पाप आहे हे जाहीरच आहे पण मूळात ते भाऊ बहीणच नाहीत तर. तेराव्यांतही ती यमी यमांस अन्य स्त्रीला तु स्वीकारशील पण मला नाही असा आरोप करते. शेवटी चौदाव्या मंत्रांत यम तिला पुन्हा परपुरुषाशी संपर्क करण्यांस सांगून स्वत:पासून विलग करतो.

असा हा एकुण यम-यमी सूक्ताचा सायणप्रणीत अर्थ आहे. ज्यांना अधिक इच्छा असेल, त्यांनी सायणांचे कोणतेही भाष्य उघडून पहावं. आम्ही वर पीडीएफ दिलीच आहे.

*आता आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ह्याच सायणांनी यजुर्वेदाच्या १२.६३ येथील मंत्रामध्ये मात्र यम-यमींस पती-पत्नी मानलंय.*

आणि इथे मात्र ते ह्या सूक्तामध्ये तींस भाऊबहिण मानतात. असे का ? मान्यय की सूक्तानुसार नि मंत्रानुसार अर्थ बदलतो. पण इतका विरोध ?

असो पुढील लेखांकामध्ये ह्या सूक्ताविषयी अन्य भाष्यकारांनी दिलेले अर्थ पाहुयांत.

अस्तु ।

क्रमश: ।

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

*#ऋग्वेद_यमयमी_सायणाचार्य_ऋग्वेदभाष्य_वेदकालीन_विवाहसंस्था_राजवाडे_वास्तव_विपर्यास:*