*संस्कृत भाषेचा आत्यंतिक द्वेष करणाऱ्यांनी अर्थात भारत विखंडन शक्तींनी नि त्यांच्या अनुयायांनी हे वाचूच नये. ज्यांच्या अंत:करणांत प्रामाणिक राष्ट्रभक्ती आहे, अशा प्रामाणिकांनीच हे वाचावे.*
संस्कृत भाषेविषयी बाबासाहेबांना प्रेम होते हे त्यांच्या चरित्रांवरून नि साहित्यावरून नि संविधान सभेतल्या भाषणांवरून दिसतेच. श्रमिक चळवळीतले एक दिग्गज नि एक विचारवंत श्री दत्तोपंत ठेंगडींच्या *"सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि बाबासाहेब"* ह्या ग्रंथामध्ये परिशिष्टामध्ये त्यांनी बाबासाहेबांच्या संस्कृतविषयीच्या भावनांचे समकालीन संदर्भ दिलेले आहेत. तिथे वाचावेंत.
*भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी संस्कृत भाषा ही ह्या देशाची राष्ट्रभाषा व्हावी हे आमचं केवळ प्रामाणिक मतंच नसून तो आग्रहही आहे. त्यादृष्टीने आम्ही स्वत: कार्यरत आहोतच. आमच्या आधीच्या अनेक लेखांतही मा. सर्वोच्च न्यायालयाची मते आम्ही मांडलीच आहेत.* मागील लेख वाचावेत.
पण आज एका महामानवाने ह्याभाषेविषयी व्यक्त केलेल्या मतांचा इथे विचार करणं आवश्यक असल्याने हा लेखनप्रपंच !
*बाबासाहेबांनी संस्कृतमध्ये संवाद केल्याचे संदर्भ निम्नलिखित घ्या...* 👇👇👇
*दै. हिन्दुस्थान, १२ सप्टेंबर, १९४९*
*राजभाषा संस्कृत व्हावी प्रस्ताव मांडणाऱ्यांमध्ये डॉ. आंबेडकर सुद्धा*
नवी दिल्ली - *विधान परिषदेच्या ज्या सदस्यांनी संस्कृत भारताची राजभाषा व्हावी म्हणून प्रस्ताव मांडला, त्यात भारताचे विधिमंत्री डॉ. आंबेडकर सुद्धा आहेत. त्यांना समर्थन देणारे उपनिवेश मंत्री श्री बी जी केसकर तसेच नसिरुद्दिन अहमद सुद्धा होते. हे केसकर आमच्या हिंदुसभेचे. ह्यांच्यावर कधीतरी सविस्तर लिहीन.*
या विषयात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर डॉ. आंबेडकर यांनी पीटीआयशी बोलताना त्यांनाच विचारले
*"का ? संस्कृत मध्ये काय दोष आहे?"*
*विधान परिषद भाषेवर विचार करण्याच्या वेळी या प्रस्तावावर विचार करेल. यावरच या सूचनेवर सह्या करणारे पंडित लक्ष्मीकांत मित्र, टीटी कृष्णम्माचारी इत्यादी तेरा-चौदा सदस्य होते. या दुरुस्तीत म्हटले होते ही भारताची राजभाषा संस्कृत असेल, पंधरा वर्षे राज्य भाषा इंग्रजी राहील. मूळ प्रस्तावात हिंदी भाषा शब्द होता तो बदलून संस्कृत भाषा हा शब्द घालून दुरुस्ती मांडली..*
*दि स्टेट्समन - दिनांक ११ सप्टेंबर, १९४९ ह्या वृत्तपत्रामध्येही मध्ये उपरोक्तच संदर्भ आहे.*
*डॉ.आंबेडकरांनी संस्कृत मध्ये संवाद केल्याचा समकालीन संदर्भ* 👇👇👇
*दै. आज (हिंदी), १५ सप्टेंबर, १९४९*
नवी दिल्ली - *केंद्राच्या चर्चेमध्ये आज मोठी उत्सुकता दिसत होती. भाषेच्या प्रश्नावर एक एक गट जोरजोरात चर्चा करीत होता. लोकांची उत्सुकता इतकी वाढली की आता डॉ. आंबेडकर तसेच लक्ष्मीकांत मैत्र आपापसात संस्कृत मध्ये चर्चा करू लागले. लक्षात असू द्या की त्या दोघांनी संस्कृत राजभाषा करण्यासाठी दुरुस्ती सुचवली होती..*
*दि लीडर (इंग्रजी) अलाहाबाद, १३ सप्टेंबर, १९४९* 👇👇👇
*डॉ. आंबेडकर व पंडित लक्ष्मीकांत मैत्र हे दोघे संस्कृत राष्ट्रभाषा व्हावी या चर्चेच्या वेळी विधिमंडळात संस्कृत मध्ये संभाषण करत होते.*
*दि हिंदु, ११ सप्टेंबर, १९४९* 👇
भारताची राज्यभाषा, संस्कृतसाठी आग्रह
घटनेच्या त्या कलमामध्ये दुरुस्ती सुचवण्यात आली. नवी दिल्ली
*ज्यांनी संस्कृत भारतीय संघराज्याची राजभाषा असावी असे सुचवले त्यात विधिमंत्री डॉक्टर बी आर आंबेडकर होते. त्यांना केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर बी व्ही केसकर यांनी व श्री नसरुद्दीन अहमद यांनी पाठिंबा दिला.* या ठरावाबाबत प्रश्न विचारल्यावर डॉक्टर आंबेडकर यांनी तिच्या वार्ताहराला विचारले ,
*"संस्कृत मध्ये काय दोष आहे?"*
जेव्हा घटना परिषदेत राज्य भाषेचा प्रश्न येईल, तेव्हा दुरुस्तीचा विचार केला जाईल.
ती दुरुस्ती याप्रमाणे होते
*अनुच्छेद ३१०(१) यामध्ये एक संघराज्याची शासकीय भाषा संस्कृत असावी*
*अनुच्छेद ३१०(१) काहीही सांगितले असले तरी ही राज्यघटना अमलात आल्यापासून पंधरा वर्षे इंग्लिश ही संघराज्याची राजभाषा म्हणून चालू राहील. पण या काळात राष्ट्रपती संस्कृत भाषेला इंग्लिश भाषेबरोबरच राजभाषा म्हणून वापरण्याची अधिकृत मान्यता देतील. हिंदी ऐवजी संस्कृत राष्ट्रभाषा करावी हे सुचविले गेले.*
आश्चर्य म्हणजे *दि नैशनल हेराल्डनेही हेच उपरोक्त दि हिंदुचे वृत्त छापले आहे ११ सप्टेंबर, १९४९*
*अखिल भारतीय मागास जाती संमेलन - १९४९ सप्टेंबर*
*डॉ. आंबेडकरांनी* ह्यामध्ये *संस्कृत हीच राष्ट्रभाषा व्हावी* हा ठराव मांडला होता.
*जाता जाता एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे* 👇
त्यांना संस्कृत येत होते ह्याचा अर्थ त्यांनी हिंदुधर्मशास्त्राची केलेली सर्व समीक्षा अगदी अचूकंच आहे असा ज्यांना अंधभक्तीचा भ्रम असेल तो दूर करावा ही विनंती. कारण त्यांनी स्वत:च प्रामाणिकपणे हे मान्य केलं आहे. आज रात्री ह्यावर लेख येईलंच.
पण त्याआधी ते काय लिहितात ते पाहुयांत.
हिंदुधर्मग्रंथांचा अनुवाद करण्याइतकं संस्कृत आंबेडकरांना येत नव्हते हे त्यांनी स्वत: मान्य केलं आहे. कारण वैदिक व्याकरण नि लौकिक व्याकरण हा भेद आहे. ह्यावर सविस्तर लेख आमचा आज येईलंच. तत्पूर्वी
*"शुद्र कौन थे*" ह्या त्यांच्या अभ्यासपूर्ण ग्रंथामध्ये त्यांनी स्वत:च ही गोष्ट मान्य केलीय की त्यांनी गत पंधरा वर्षांत हिंदु धर्मग्रंथांच्या आंग्लानुवादाचे(इंग्रजी भाषांतरांचे) अध्ययन करूनच धर्मशास्त्रीय चिकीत्सेचे निष्कर्ष काढलेले आहेत. त्यांना परंपरेतून वैदिक संस्कृतचे तितकेसे ज्ञान नाही. कारण हिंदुधर्मशास्त्राची चिकीत्सा करण्यापूर्वी न्यूनतम बारा ते पंधरा वर्षे कालावधी व्याकरण नि इतर सर्व वेदांगांच्या अध्ययनासाठी देणं आवश्यक आहे. एकट्या पातंजल महाभाष्याचे अध्ययनंच पाच वर्षांचे आहे. ज्यांना हे असत्य किंवा अत्युक्ती वाटते त्यांनी स्वत: ते करावे. आम्हांस ह्याचा अनुभव आहे.
हिंदुधर्मशास्त्राची चिकित्सा झालीच पाहिजे. ह्यात दुमत नाहीच. पण अनेकांना केवळ इतरांचे ग्रंथ वाचून हिंदुधर्मांवर बोलण्याची किंवा लिहिण्याची सवय असते. अस्तु!
आता बाबासाहेबांच्या वक्तव्याचे प्रमाण निम्नलिखित आहे.
*समग्र आंबेडकर हिन्दी वाङ्मय खण्ड १३ - शुद्र कौन थे ?*
ते म्हणतात
*"यदि चेतावनी इस आशय से दी जाती है कि मै संस्कृत भाषाका पारङ्गत नहीं हुँ, तो अपनी इस कमजोरी को मैं स्वीकार करता हुँ । संस्कृत में ऐसा कौनसा साहित्य हे जो अंग्रेजी भाषा मे उपलब्ध नही है । तब संस्कृत भाषा के ज्ञान का अभाव मुझे इस विषयपर विवेचन करनेसें कैसे रोक सकता है ?मैं यह कहने का साहस कर सकता हुँ कि अंग्रेजी अनुवाद के रुपमें उपलब्ध प्रासङ्गिक साहित्यके पन्द्रह वर्षोंके अध्ययन से कोई भी मेरे जैसा व्यक्ति औसत दर्जे का ज्ञान अर्जित कर सकता है जिस को कोई कार्य संपन्न करने की क्षमता प्राप्त हो सकती है ।"*
पृष्ठ क्रमांक १४ - उपरोक्त
पृष्ठ सोबत जोडलंच आहे.
ह्यात त्यांना कमी लेखण्याचा हेतु अजिबात नाही. त्यांच्याविषयी आम्हांस पूर्ण आदरंच आहे. केवळ सत्य स्थिती सांगण्याचा हेतु आहे.
*बाबासाहेबांचे समग्र वाङ्मय एकाच ठिकाणी स्कैन्ड*
ज्यांना हे आमचं उपरोक्त लेखन असत्य वाटत असेल, त्यांनी डॉ. आंबेडकरांचे समग्र वाङ्मय स्कैन्ड स्वरुपांत आहे, जे राज्य सरकार नि केंद्र सरकारने त्या-त्याकाळी प्रकाशित केलेलं आहे, ते पहावे ही विनंती. हे सर्व खंड पीडीएफ स्वरुपांत निम्नलिखित संकेतस्थळांवर उपलब्ध आहेतच.
http://velivada.com/2017/05/01/pdf-21-volumes-of-dr-ambedkar-books-in-hindi/
इथून संग्राह्य (डाऊनलोड) करावेत ही विनंती !
त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांस विनम्र अभिवादन !
भवदीय,
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
#डॉ_आंबेडकर_महामानव_संस्कृत_राज्यभाषा_राष्ट्रभाषा_संविधानसभा_भारतीयत्व_हिंदुधर्मशास्त्र_चिकीत्सा
No comments:
Post a Comment