Sunday, 24 September 2017

वैदिक स्त्री-दर्शन - लेखांक द्वितीय - स्त्रियांचा वेदाधिकार

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विशेष लेखमाला
वैदिक स्त्री-दर्शन - लेखांक द्वितीय - स्त्रियांचा वेदाधिकार 
मागच्या लेखांत आम्ही वेदांविषयीची आमची भूमिका स्पष्ट केली. आता ह्या लेखांमध्ये एका महत्वाच्या प्रश्नाची उकल करणार आहोत की जी लेखमालेच्या दृष्टीने महत्वाची आहे. ती म्हणजे स्त्रियांचा वेदाधिकार ! जर स्त्रियांना वेदाधिकारच नसेल तर त्यांच्याविषयी वेद काय म्हणतो नि नाही हे पहायची आवश्यकताच काय? पण वेदांचा अधिकार स्त्रियांना आहेच आहे. म्हणूनच हा लेखनप्रपंच !
सर्वप्रथम प्रश्न येतो तो स्त्रियांच्या वेदाधिकाराचा !
दे॒वा ए॒तस्या॑मवदंत॒ पूर्वे॑ सप्तऋ॒षय॒स्तप॑से॒ ये नि॑षे॒दुः ।
भी॒मा जा॒या ब्रा॑ह्म॒णस्योप॑नीता दु॒र्धां द॑धाति पर॒मे व्यो॑मन् ॥
ऋग्वेद - १०.१०९.४
ह्या मंत्रात स्त्रीस स्पष्टपणे उपनीता अर्थात उपनयन झालेली म्हटलंय. अष्टाध्यायी मध्ये ४.१.४९ येथे स्त्रींस स्पष्टपणे उपाध्यायी, आचार्या म्हटलंय. सिद्धांतकौमुदी स्त्रीप्रकरणामध्ये हा संदर्भ आहे. वेदांचा अभ्यासच नाही तर ती आचार्या कशी काय असु शकते??? त्यामुळे स्त्रियांना वेदाधिकार आहे हे स्वत: वेदभगवान उच्चरवाने उद्घोषून सांगतोय. त्यांना उपनयनाचा व यज्ञाचाही अधिकार आहे. परंतु नंतरच्या काळातले परवर्ती साहित्य जिथे जिथे स्त्रियांना वेदाधिकार नाकारते, तितके ते प्रक्षेपयुक्त असून ते वेदवरुद्ध असल्याने ते अप्रमाण आहे. स्त्रियांना वेदाधिकार आहेच आहे, ह्यात काडीमात्र शंका असायचे कारण नाही. ह्याविषयांवर मी अनेकवेळा भाष्य केलंय. प्रत्यक्ष चार संहितांमध्ये स्त्रियांना वेदाधिकार नाकारणारा एकही निषेधात्मक मंत्र कदापि नाही. नाही म्हणजे ना आणि ही ! जे लोक पश्चातच्या परवर्ती ग्रंथांना प्रमाण मानून स्त्रियांना वेदाधिकार नाकारतात, त्या मूर्खांविषयी व स्वमतांधांविषयी इथे संवादच न केलेला बरा. असो.
जर स्त्रियांना वेदाधिकार नसताच तर वेदांवरच्या अनेक सूक्तांवर स्त्रियांची नावे का असती? परमेश्वर जर पक्षपाती असता तर त्याने ही नावे वर ठेवलीच नसती. अनेकांना हा युक्तिवाद वाचून आश्चर्य वाटेल. तेंव्हा ज्यांना वेदांच्या सूक्तांवरची ऋषि व देवतावाचक नावे ह्यांविषयी चिंतन पहायचे असेल त्यांनी आमचा "वेदांतील ऋषि व देवता विवेचन" हा लेख वाचावा ही विनंती. किंवा पंडित भगवद्दत्त वेदालङकार लिखित "ऋषि-देव विवेचन" व ऋषि रहस्य" हे दोन ग्रंथ वाचावेत. पीडीएफ हवे असल्यांस आपणांस पाठवेन.
या दंप॑ती॒ सम॑नसा सुनु॒त आ च॒ धाव॑तः ।
देवा॑सो॒ नित्य॑या॒शिरा॑ ॥
ऋग्वेद - ८.३१.४
ह्या मंत्रामध्ये स्पष्टपणे दंपती असे दोघांचा उल्लेख करून स्त्रींस पतीसमीप बसून यज्ञाचा अधिकार सांगितलाय.
ब्रह्मचर्येण कन्या युवानं विन्दते पतीम् !
अथर्ववेद - ११.५.१८
ह्या मंत्रांत कन्येंस ब्रह्मचर्य पालन करून उत्तम पतींस प्राप्त करण्याचा अधिकार आहे. हे ब्रह्मचर्य म्हणजेच वेदाध्ययन आहे, सर्वशास्त्रांचे अध्ययन ह्या अर्थानेच आहे.
वेदांतले स्त्रियांचे वेदाधिकार देणारे संदर्भ द्यायला आम्ही आरंभ केला की काही पौराणिक मंडळी
म्हणतात की स्त्रियांना यज्ञात पुरुषाच्या समीप बसायचा अधिकार आहे पण वेदमंत्र म्हणायचा नाही.
तर ह्या आक्षेपाचंही निवारण आता करुयांत. हे लोक ह्या निषेधासाठी वेदांतला एखादा मंत्राचा संदर्भ द्या म्हटलं की एकही देत नाही. आजपर्यंत कित्येकांना विचारला, एकानेही निषेधात्मक मंत्र वेदांतून दिलेला नाहीये. स्वमतांधतेसाठी हे लोक ज्या परवर्ती साहित्याचा संदर्भ आपल्या नकारासाठी योजितात आता त्याच परवर्ती साहित्यात स्त्रियांचा वेदाधिकार कसा मान्य केलाय ते पाहुयांत.
गोभिलगृह्यसूत्र २.१.१९
पश्चादग्ने: संवेष्टितङ्कटमेवञ्जातीयं वान्यत् पदा प्रवर्तयन्तीं वाचयेत् - प्र मे पतियान: पपन्था: कल्पतामिति !
अर्थ - इथे 'प्र मे पतियान्" ह्या मंत्राचा तिने पाठ करावा असे स्पष्ट निर्देश आहे.
आता आश्वलायन श्रौतसूत्र - १.११.१
वेदं पत्न्यै प्रदाय वाचयेद्धोताsध्वर्युर्वा वेदोsसि वित्तिरसि !
अर्थ - वेद पत्नींस देऊन होता किंवा अध्वर्युने हा "
वेदोsसि वित्तिरसि.." मंत्र तिच्याकडून वदवून घ्यावा.
आता शौनकाचार्यकृत ऋग्विधान - अध्याय ३, खंड २२
इमामिति जपेत् कन्या नाभिमालस्य नित्यश: !११७!
एवमेव जपेद्भर्ता ततो दीर्घायुषो नु तौ !११८!
कन्येने "इमां त्वमिन्द्रमीढ्व:" ह्या ऋग्वेदातल्या १०.८५.४५ ह्या मंत्राचा नाभींस स्पर्श करून उच्चार करावा व असाच पतीनेही करावा तर निश्चित दोघांसही दीर्घायु प्राप्त होते.
पुढे ह्यातच अध्याय ४, खंड १२, ६३ वा श्लोक
इमामिति त्रिसूक्तेन दशकृत्वो दशावरम् !
सपत्नीं बाधते तेन पतिताश्चातीव मन्यते !
इमाम् हे ऋग्वेदातले सूक्त दहावेळा जपेल तर सवतींस हानी प्राप्त होते व तिचा पती तिचाच जास्ती आदर करतो. (थोडक्यात वशीकरण)
चारीही वर्णाच्या स्त्रियांना वेदाधिकार
ब्राह्मणक्षत्रियविशां शुद्राणां स्त्रीजनेश्वर: !
यथाक्रमेण पुज्यैनां गन्धपुष्पजलाक्षतै: !८२!
कुंकुमालक्तकैर्दीपैर्माषान्नवटकै: शुभै: !
कुसुमैर्वत्सकञ्चापि मन्त्रेणानेन पाण्डव ! ८३!
ओं माता रुद्राणा दुहिता वसूनां स्वसादित्यानाममृतस्य नाभि: !
प्र नु वोचं चिकितषे जनाय मा गामनागामादितिं वधिष्ट" नमो नम: स्वाहा ! ८४!
इत्थं सम्पूज्य गां पृष्ट्वा पश्चात्तां च क्षमापयेत् !८५!
भविष्यपुराण - उ. अ. ६९, श्लोक ८२-८४
अर्थ - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र ह्यांच्या स्त्रियांनी इथे क्रमश: त्या गायींस गन्धपुष्पजलाक्षतादिंनी पुजन करून कुंक, पुष्पयुक्तदीप, तथा उडदाचे डाळीने (इथे माषान्न शब्दाने उडीद हाच अर्थ अभिप्रेत आहे व तोच अर्थ शास्त्रसंमत आहे) व फुलांनी गोमातेंस "ओं माता रुद्राणां" हा ऋग्वेदांतला मंत्राने पुजा करावी.
ह्यावरून चारीही वर्णांच्या स्त्रियेंस वेदमंत्र म्हणायचा अधिकार सिद्ध होतो हे वेगळं सांगायचे नाही.
जाताजाता एक सांगतो. ह्या उपरोक्त माता रुद्राणां मंत्राचा अतिशय चुकीचा अर्थ पाश्चिमात्यांनी व त्यांचीच री ओढणार्या भारतरत्न काणेंसारख्या विद्वानांनी घेतलाय, ज्याचे खंडण सप्रमाण मी माझ्या "मधुपर्कात गोमांस किवां मांस आहे का" ह्या लेखांत केलंय. जिज्ञासूंनी माझ्या पाखण्ड खण्डिणी नामक ब्लौगवर सविस्तर वाचावा ही विनंती. असो तो वेगळा विषय तरीपण सांगितला.
कलिवर्ज्य प्रकरण नावाचे थोतांड
स्त्रियांना वेदाधिकार नाकारणारे आजचे स्वयंघोषित मंडळी ज्या कलिवर्ज्य प्रकरण नामक थोतांड प्रकरणाचा संदर्भ नकारासाठी देतात, की ज्यांत कलियुगांत स्त्रियांना वेदाधिकार अकारण नाकारला आहे, त्याची समीक्षा खरंतर स्वतंत्रपणे करावी लागेल. पण एकाच वाक्यांत सांगायचे झाले तर मनुस्मृतीत म्हटल्याप्रमाणे
धर्मजिज्ञासमानानां प्रमाणं परमं श्रुती: !
धर्मजिज्ञासेंत मनुष्यांस श्रुती अर्थात वेदच प्रमाण आहे, आणि हे वेद म्हणजे काय हे आम्ही प्रथम लेखांकात स्पष्ट केलंच आहे. तरीही ह्याच मनुस्मृतीत म्हटल्याप्रमाणे
या वेदबाह्या: स्मृतय: याश्च काश्च कुदृष्टय: !
सर्वास्ता निष्फला: प्रेत्य तमोनिष्ठास्तु ता: स्मृता: !
१२.९५
जे वेदबाह्य स्मृत्या आहेत, त्या त्याज्य आहेत कारण त्या कुदृष्टीने आल्यामुळे हे स्पष्ट म्हटलंय. ह्यावरूनच वेदांच्या विरोधात जाणारे कोणतेही वचन, मग भले ते कोणत्याही प्रकांड विद्वानांचे किंवा महाराजांचे असो, ते त्याज्य असल्याचे प्रमाण आहे हे. त्यामुळेच हे कलिवर्ज्य प्रकरण मागच्या काही शतकांतले असल्याने व त्यातही ते वेदविरुद्ध असल्याने ते त्याज्यच आहे.
वेदमंत्रांनी स्त्रियांच्या गर्भावर परिणाम होतो म्हणून नकार????
वेदाधिकार मान्य करणारे पण तरीही नकार देणारे काही लोक असा तर्क करतात की वेदमंत्रांनी अंगात उष्णता होते. त्याने स्त्रियांच्या गर्भावर परिणाम होतो म्हणून स्त्रियांनी वेदमंत्र म्हणु नये.
अशा लोकांना आम्ही विचारु इच्छितो की एवढीच स्त्रियांच्या कल्याणाची चिंता आपण वहात असाल तर मग वेदकाळात स्त्रिया वेदाध्ययन कशा काय करत होत्या? त्यांना गर्भ नव्हते का? त्यांना काय विशेष अधिकार प्राप्त होत्या का???
त्या स्त्रिया नि आजच्या कलियुगांतल्या स्त्रिया ह्यांत काय शरीरभेद आहे का??? असे कुठल्या ग्रंथात लिहिलंय की त्याकाळच्या स्त्रियांमध्ये व आजच्या कलियुगांतल्या स्त्रियांमध्ये शरीरभेद आहे म्हणून???
मंत्रांचे सामर्थ्य मीही जाणतो व अनुभवतो. ते नाकारायचा आमचा प्रश्नच नाही नि हेतुही नाही. पण म्हणून अकारण आपल्या स्वमतांधतेपोटी हा अप्पलपोटेपणा दर्शवणे शहाणपणाचे लक्षण आहे का???
मी स्पष्टवक्ता आहे, ज्यांना राग येतो त्यांनी माझे लेख वाचु नयेत. शाप दिलेत तरी चालतील. वेदांची सेवा ह्यापेक्षा श्रेष्ठ माझ्यादृष्टीने ह्या जगांत काहीच नाही. कुमारिल भट्टांच्या भाषेत
यदि वेदा: प्रमाणं स्यु: जीवेयम् !
वेदांचा अधिकार स्त्रियांलाच काय सर्व मानवजातीलाच आहे.
यथेमां वाचं कल्याणीमावदानि जनेभ्य: !
ब्रह्मराजन्याभ्यां शुद्राय चार्याय च स्वाय चारणाय !
यजुर्वेद - २६.२
ह्या मंत्रांत वेदाधिकार सर्वांस सिद्ध आहे.
ज्याला साक्षात् ईश्वराची वाणी म्हणायची त्यांस केवळ कुणा विशिष्ट समुहांपूरते मर्यादित ठेवायचे हे किती शहाणपणाचे लक्षण? ह्यावरून आपण त्या परमात्म्यांसच दूषण लावतो आहेत हे का कळत नाही??? अर्थात आजकाल कुणीही कुणाला वेदाधिकार नाकारत नाही. काही अपवाद वगळता सर्वत्र सर्वांना वेदाधिकार आहे. हे अपवाद अर्थातच त्याज्य आहेत.
वेदोद्धारक महर्षि दयानंद सरस्वतींनी तर १५० वर्षांपूर्वीच अखिल मानवजातींस वेदाधिकार आहे हे वेदमंत्रांचे अनेकानेक स्पष्ट संदर्भ देऊन त्यांच्या अजरामर "सत्यार्थ प्रकाश" नामक ग्रंथात सिद्ध केलंय. तेंव्हापासून आर्य समाज अखिल मानवजातींस वेदाधिकार प्रदान करत आहे. तेंव्हा आजकाल ब्राह्मण लोक आम्हांला वेद शिकवित नाहीत असे बोंबलणार्यांनी कृपया इकडे लक्ष द्यावे. आर्य समाजच नव्हे तर इतरही अनेक ठिकाणी वेदाध्ययन सर्वांसाठी असलेले आम्ही स्वत: पाहुन आलोय. ज्यांना जिज्ञासा असेल त्यांनी शोध घ्यावा.
विस्तारभायस्तव इथेच स्त्रियांचा वेदाधिकार हा महत्वाचा विषय संपवून लेखणींस विराम देतो. पुढील लेखांत सविस्तर वैदिक स्त्रीदर्शन प्रत्येक वेदांनुसार घडविले जाईल. ज्यांना शंका असतील त्यांनी अवश्य विचाराव्यांत.
भवदीय,
©तुकाराम चिंचणीकर
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

वैदिक स्त्री-दर्शन - लेखांक एक - वेदपरिचय



शारदीय नवरात्रोत्सवामित्त लेखमाला

वैदिक स्त्री-दर्शन - लेखांक एक - वेदपरिचय
यः पा॑वमा॒नीर॒ध्येत्यृषि॑भिः॒ संभृ॑तं॒ रसं॑ ।
सर्वं॒ स पू॒तम॑श्नाति स्वदि॒तं मा॑त॒रिश्व॑ना ॥
पा॒व॒मा॒नीर्यो अ॒ध्येत्यृषि॑भिः॒ संभृ॑तं॒ रसं॑ ।
तस्मै॒ सर॑स्वती दुहे क्षी॒रं स॒र्पिर्मधू॑द॒कं ॥
ऋग्वेद - ९.६७.३१-३२
जो परमेश्वरस्तुतीरुप ऋचांचे पठण करतो तो मंत्रद्रष्ट्याऋषींपासून स्पष्ट झालेल्या ब्रह्मरसास (ब्रह्मानंदांस) भोगतो आणि समग्र वायुंनी स्वादुकृत पवित्र पदार्थांचे भोग घेतो. त्यांस जणु सरस्वती किंवा ब्रह्मविद्या साक्षात् मातेसमान दुध, तुप, मध आणि नानाप्रकारच्या रसांचे दोहन करून ते प्राप्त करून देते !( हे वर्णन अलंकारिक आहे)
श्रुण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्रा: !
वेदभगवान सर्वांस अमृताचे पुत्र अशी उद्घोषणा करतो. व हाच वेद भगवान आम्हांस
ओ३म् इन्द्रं॒ वर्ध॑न्तो अ॒प्तुर॑: कृ॒ण्वन्तो॒ विश्व॒मार्य॑म् । अ॒प॒घ्नन्तो॒ अरा॑व्णः ॥
ऋग्वेद - ९.६३.५
म्हणजे सर्वविश्वांस आर्य अर्थात निरुक्तकारांनी म्हटल्याप्रमाणे "आर्य्य: ईश्वरपुत्र:" म्हणजेच ईश्वराचे किंवा अमृताचे पुत्र किंवा पुत्री व्हा अशी आज्ञा देतो. हाच ऋग्वेद आम्हांस
मनुर्भव अर्थात मनुष्य बन अशी आज्ञा देतो व हाच ऋग्वेद ह्याच वेदांमध्ये सर्वत्र एकांच परमात्म्याचे अर्थात त्या ईश्वराचे चिंतन आहे असे सांगताना
ओ३म् इन्द्रं॑ मि॒त्रं वरु॑णम॒ग्निमा॑हु॒रथो॑ दि॒व्यः स सु॑प॒र्णो ग॒रुत्मा॑न् । एकं॒ सद्विप्रा॑ बहु॒धा व॑दन्त्य॒ग्निं य॒मं मा॑त॒रिश्वा॑नमाहुः ॥
ऋग्वेद - १.१६४.४६
ईश्वर एकच आहे परंतु त्यांस विद्वांन अनेक नावांनी ओळखतात हीच आज्ञा देतो. अशा ह्या साक्षात् ईश्वरकृत वेदवाणीचा प्रथम परिचय देण्यासाठी हा आरंभी लेखनप्रपंच !
ह्या वैदिक स्त्री-दर्शन लेखमांलेस आम्ही नाव दिल्याप्रमाणेच वेदांमध्ये स्त्रीविषयी काय चिंतन आहे हेच स्पष्ट करणार आहोत. वेद ही संज्ञा आम्ही आमच्या आधीच्या अनेक लेखांत सांगितल्याप्रमाणे केवळ चार मंत्र संहिता अर्थात मंत्रभागांसाठीच आहे. वेदांचा अभ्यास करताना मूळ संहिता भाग, त्यावरचे भाष्य ग्रंथ असे ब्राह्मणग्रंथ, त्यांचाच अंतिम भाग असे उपनिषदे व आरण्यके असे चार साहित्य अभ्यासावी लागतात. त्यापैकी अनेक लोक चारींनाही वेद अशी संज्ञा देतात की जे पूर्णत: सैद्धांतिक दृष्ट्या चूक व अप्रमाण आहे. काही लोक ब्राह्मणग्रंथांनासुद्धा वेद ही संज्ञा देतात ज्यासाठी हे लोक कातंयायन ऋषींच्या "मन्त्रब्राह्मणयोर्वेदनामध्येयम्" ह्या परिशिष्टांतला संदर्भ देऊन त्यांनाही वेद ही संज्ञा देतात की जे सर्वस्वी विरुद्ध व अप्रमाण आहे. येंविषयी सविस्तर भाष्य आम्ही कधीतरी करुच. पण तत्पूर्वी वेद ही संज्ञा केवळ नि केवळ चारी मंत्रसंहितांनाचा असून चार वेदांच्या संहिताभाग हाच तो केवळ अपौरुषेय अर्थात ईश्वरकृत भाग अर्थात वेद असून इतर सर्व ग्रंथ, म्हणजे सर्वच्या सर्व परवर्ती ग्रंथ हे ऋषिकृत किंवा मनुष्यकृत असल्याने ते सर्व जितके वेदानुकूल तितकेच ग्राह्य मानतो. पण ह्या लेखमालेंत केवळ चार संहिताभागांचाच विचार होणार असल्याने इतर ग्रंथांची चर्चा करण्याची आवश्यकता नसली तरी आरंभी नेमकी भूमिका प्रकट करणे आवश्यक असल्याने हा लेखनप्रपंच ! ह्या लेखमालेंत वादविवादासाठी आम्हांस रस नसल्याने ज्यांना वेदांविषयी आशंका आहेत त्यांना आमची भूमिका स्पष्ट व्हावी म्हणूनच हे लिहितोय. असो !
कोणताही ग्रंथ अपौरुषेय कसा काय असु शकतो, तो मानवकृत का असु शकत नाही, वगैरे वगैरे वादांसाठी स्वतंत्रपणे संवाद करता येईल. त्यासाठी आम्ही कधीही तयार असलो तरीही प्रस्तुत लेखमालेसाठी तो भाग तूर्तास आम्हांस संवादासाठी नको असल्याने ह्या विधेयांवर सांप्रत तरी वाद नको आहेत. स्वतंत्रपणे ही चिकीत्सा कधीही करता येईल ही विनंती.
तेंव्हा हा प्रथम लेख हा केवळ भूमिका मांडायसाठी लिहिला असून स्त्रीदर्शनाचे दिग्दर्शन व चिंतन पुढील लेखांपासून आरंभ होईल. नेमके किती लेख होतील ह्यांची आम्ही काही निश्चिती केलेली नसल्यामुळे जे काही सुचतंय त्यानुसार त्या ईश्वरेच्छेने लिहिण्याचा प्रयत्न ह्यांत करणार आहोत. आमच्या हातून अनुवादांस काही त्रुटी राहिल्यांस विद्वानांनी आमचा कान धरावा ही विनंती ! पण तेही केवळ प्रमाण देऊनच हेही न सांगणे लगे !
शेवटी जाताजाता हे सांगणे आवश्यक आहे हे सर्व लिहिण्यामागे आमची स्वत:ची काडीमात्र विद्वत्ता, बुद्धी किंवा व्यासंग वगैरे काहीही नसून जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेत
फोडिले भांडार, धन्याचा हा माल !
मी तों हमाल, भार वाहें !
हीच भूमिका राहणार आहे व शेवटपर्यंत राहीन. अनेक वेदवेत्त्या महर्षींपासून ते आत्ताच्या महर्षि दयानंद, महर्षि कात्यायन, भगवान पाणिनी, महर्षी पतंजली, सर्व वैदिक षड्दर्शनकार महर्षि, महर्षि सातवळेकर ह्या सर्वांच्या अभ्यासाने मला जे काही कळलं ते मांडायचा प्रयत्न करणार आहे. मी अल्पज्ञ व शुद्र व अज्ञानी आहे तरी ही सेवा गोड मानावी ही विनंती !
अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु !
भवदीय,
©तुकाराम चिंचणीकर
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

Wednesday, 19 July 2017

मूळ स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहिना ! जगद्गुरु तुकोबाराय



मार्क्सवादी, साम्यवादी, समाजवादी ह्यांचे एक ठरलेलं असतं. ह्यांचा इतिहासच आहे हा. ज्यांनी ज्यांनी त्यांच्यासाठी आयुष्य दिलं, त्यांची (कु)विचारसरणी व कार्य वाढविलं, त्यांच्याच पाठीत नंतर सुरा खुपसायचा. कसा? तर त्यांनी भविष्यात जर कधी हिंदु धर्म, वेद, गीता किंवा तत्सम कोणत्याही ग्रंथांची किंवा हिंदुधर्मपरंपरांची स्तुती केली किंवा तिचे आचरण केलं तर लगेचच त्यांस आंग्ल भाषेत डिसओन (disown) करायचं. म्हणजे त्यांची हकालपट्टी करायची. मग भले त्या मनुष्याने आयुष्यभर कितीही निष्ठेने ह्या विषवल्लीची सेवा केली का असेना.

खरंतर जगभरात ९.८ कोटी लोकांचे सरसकट अकारण हत्याकांड करणार्या मार्क्सवाद्यांकडून किंवा साम्यवाद्यांकडून आणखी काय अपेक्षा करायची म्हणा??? जिज्ञासूंनी "दि ब्लैक बुक ओफ कम्युनिझम" हा ग्रंथ वाचावा. आंतरजालावर (इंटरनेटवर) प्राप्त होईल.

एकीकडे आम्ही धर्म व ईश्वर नाकारतो म्हणणार्यांनी मार्क्सलाच देव बनविला. माझ्या आधीच्याच एका लेखांत म्हटल्याप्रमाणे मार्क्स हा मुळातच ईश्वरनिष्ठ व ख्रिस्तीपंथाचा प्रसारक होता. जिज्ञासूंनी त्याचा १८५७ वरचा ग्रंथ वाचावा.

मार्क्सचा प्रचंड भारतद्वेष व हिंदुधर्मद्वेष

१८५७चे स्वातंत्र्यसमर ब्रिटीशांना चिरडून टाकण्यासाठी प्रोत्साहित करणारा व भारतात पाववाल्या ख्रिस्ताचा प्रचार करण्यासाठी उद्युक्त करणारा मार्क्स ह्या लोकांचा आदर्श असतो ह्यातच सर्व काही आले.

मार्क्सवाद्यांनी, साम्यवाद्यांनी, समाजवाद्यांनी भारतातल्या महापुरुषांविषयी काय उद्गार काढले आहेत ते आपण पाहुयांत. त्यांनी महापुरुषांना घातलेल्या शिव्या

गांधींजीविषयी- a senile Old man

साम्यवादीच असलेल्या नेहरुंविषयी - a running dog of Imperialism

थोड्या समाजवादी असलेल्या सुभाष बाबूंविषयी - a traitor, a stooge, a goonda, a puppet, an agent of Hitler and Tojo, agent of Foreign Invaders etc.

समाजवादी जयप्रकाशजींविषयी - as above.

आश्चर्याची गोष्ट ही की उपरोक्त एकही हिंदुत्वनिष्ठ गटांतला नाही सावरकरांसारखा किंवा टिळकांसारखा. त्यांची तर गोष्टच नको.

ज्या नेहरुंनी आयुष्यभर मार्क्सवाद व साम्यवादाची पाठराखण केली त्यांनाच चीनच्या आक्रमणानंतरची साम्यवाद्यांनी केलेली शिवीगाळ जगजाहीर आहे. चीनशी हातमिळवणी करून मार्क्सवाद्यांनी केलेला देशद्रोह जगजाहीर आहे. त्या आक्रमणात जणु चीनचा काही दोषच नाही असे सर्व तत्कालीन मार्क्सवादी व साम्यवादी बोलत होते. आश्चर्य म्हणजे एका पाश्चिमात्य पत्रकारांस नेहरु ह्या आक्रमणानंतर काय बोलले होते हे वाचल्यावर नेहरुंची हतप्रभता लक्षात येते. आयुष्यभर गांधींना मानणारे नेहरु शेवटी त्यांस

गांधी - an awful old hypocrite

अशा शेलक्या विशेषणांत संभावना करतात ह्यातच त्यांना त्यांच्या जीवनाची इतिकर्तव्यता व हतप्रभता व अपराधीपण झाल्याचे दिसून येतं. स्वत:विषयी
You are meeting a failed Statesman

आता कॉ. डांगेंचे पाहुयांत.

डांगे हे भारतीय साम्यवादी पक्षाचे संस्थापक ! त्यांनी लिहिलेला
India - From Primitive Communism to Slavery
हा ग्रंथ मार्क्सवाद्यांना अगदी प्रमाण असतो. ग्रंथाची समीक्षा बाळशास्त्री हरदासांनी त्यांच्या "वेदांतील राष्ट्र दर्शन" ह्या पुण्यपत्तनीच्या व्याख्यानमालेत केली आहे. ग्रंथरुपाने तो द्विखंडात मामाराव दातेंनी प्रकाशितही केलाय. स्कैन्ड स्वरुपांत तो डिजिटल वर उपलब्ध ही आहे. प्रथम खंडात आहे समीक्षा.

इतिहासाचार्य  रावाड्यांच्या शेवटच्या अतिशय विकृत अशा " भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" ह्या ग्रंथाची प्रस्तावनाच त्यांची आहे. मुळात हा ग्रंथच अपूर्ण आहे. त्याची सविस्तर समीक्षा आम्ही योग्यवेळी करुच. पण आश्चर्य म्हणजे हिंदुद्वेष्टे लाल पावटे किंवा विद्रोही वगैरे सर्व लोक राजवाड्यांचाच हाच ग्रंथ नेहमी पुढे करतात. इतर साहित्य मात्र सोयीस्कर डोळेझाक. ब्राह्मणांनी खोटा इतिहास लिहिला म्हणून बोंबा मारायच्या पण सोयीस्कर राजवाडे उचलायचे. ह्यालाच आजच्या भाषेत पू-रोगामित्व म्हणतात. असो तर ह्याच डांग्यांची नवा काळच्या खाडिलकरांनीही एक आठवण सांगितलीय की त्यांचे लेखन वाचून पूर्वीचे भारतीय मार्क्सवादी पक्षाचे संस्थापक असे कॉ. श्रीपाद अमृत डांगे एकेदिवशी त्यांना बोलावून म्हणाले की तु फार छान लिहितोस. तुला आणखी एक सांगतो.

वैदिक षड्दर्शनांपैकी सांख्यदर्शनातच आजच्या आधुनिक अणुध्वमचे रहस्य आहे. वैदिक विज्ञान श्रेष्ठ आहे.
इति डांगे खाडिलकरांना उद्देश्युन

आणखीही असे काही प्रसंग घडल्यावर लगेचच लाल पावट्यांनी त्यांना बहिष्कृत केलं...कारण त्यांनी सगळ्यांच्या बाबतीत हेच केलंय व करतात व करतही राहतील.
.

प्रा. नरहर कुरुंदकर

आचार्य म्हणण्याइतके ते योग्यतेचे वाटत नाहीत. कारणमीमांसा कधीतरी स्पष्ट करेन. पण आयुष्यभर स्वत:ला मार्क्सवादी म्हणविणारे कुरुंदकर ह्याच द्वेषाला बळी पडले. पुढे कुरुंदकरांना पण तेच भोगावं लागलं. मुलाची सोवळ्यात मुंज लावल्याने त्या लाल पावट्यांनी त्यांनाही नेहमीप्रमाणे झिडकारलं.

जे आधी स्वत: साम्यवादी होते त्यांनाही त्यांनी तेच केलंय. डांग्यांच्या बाबतीतही तेच. नेहरुंच्याही तेच. कुरुंदकरांच्याही तेच

सीता राम गोयलांनी म्हणूनच "नेताजी अँड द सीपी आय" नावाने ग्रंथ लिहिलाय. त्यात सुभाषबाबूंना साम्यवाद्यांनी किती यथेच्छ शिव्या दिल्यात ते लिहिलंय.

पाकिस्तानच्या मदतीला सुईणीसारखे धाऊन जाणारे हे लाल पावटे. म्हणूनच एक साम्यवादी असणारे पण नंतर त्यांस वैतागलेले ख्वाजा अहमद अब्बास त्यांच्या आत्मचरित्रात म्हणतात

Who killed India? India was killed by the Communist Party of India which provided the Muslim separatists with an ideological basis for Irrational and Anti- national demand for Pakistan. Phrases like homeland,  nationalities, self-determination., etc were  all the ammunitions supplied by the Communists to the legion of Pakistan.

Page no. 281 - I am not an Island - An Experiment in autobiography by Khwaja Ahmed Abbas
1977 - New Delhi
संदर्भ - Gandhi's Assassination - Prof. Makkhan Lal - India First Foundation, New Delhi

मार्क्सवाद्यांचा पाकिस्तानच्या निर्मितीला असलेला पाठिंबा तर जगजाहीर आहे.

आता समाजवाद्यांचे पाहुयांत



गांधीवाद मार्क्सवादाची सांगड घालणार्या सत्याग्रही समाजवादाचे मूल लेखक व प्रवर्तक हे शंदा जावडेकर पण त्यांचे पुरस्कर्ते आचार्य(???) भागवतांचे समग्र साहित्य महाराष्ट्र राज्य साहित्य नि सांस्कृतिक महामंडळाने प्रकाशित केलंय तीन खंडात. संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. ते गांधींचे नि:स्सीम भक्त. एकीकडे समाजवादाच्या गप्पा ठोकणारे हे लोक सर्व हिंदुंच्या सहभोजनांना मात्र विरोध करायचे. ब्राह्मणांच्या पंगती वेगळ्या असाव्यांत ह्या विचाराचे ते आग्रही होते. गांधीजींनी साबरमती आश्रमाची नियमावली करताना तर सहभोजन करुच नये अशी आरंभी स्पष्टपणे आश्रमात नियमावली ठेवली होती. ते म्हणतात

"हा आश्रम वर्णाश्रम धर्मपूर्ण मानणारा आहे. जातीभेदामुळे नुकसान झालेले नाही, उलट फायदाच पुष्कळ झालेला आहे. एकत्र बसून जेवल्याने मातृभाव यत्किंचितही वाढत नसतो. भोजनही दुस-या अनेक दैनिक व्यवहारांप्रमाणेच, एकांतातच झाले पाहिजे."

संदर्भ - अवंतिकबाई गोखले लिखित " महात्मा गांधी" मुंबई, १९१८ - पृष्ठ क्रमांक ९२

 शं दा जावडेकर हे त्यांच्या एका ग्रंथात "गांधी व टिळक" मध्ये सावरकरांवर यथेच्छ तोंडसुख घेताना टिळकांची स्तुती करताना त्यांचे तथाकथित मुस्लीमप्रेम दर्शविण्याचा अट्टाहास दाखवितात. टिळकांचा लखनऊ करार व त्यांचे

"उद्या ब्रिटीश गेल्यावर येणारे मुस्लिमांचे राज्य हे मी १००% स्वदेशी मानतो."

हे टिळकांच्या कुठल्यातरी एका भाषणांच्या खंडातले वाक्य उद्धृत करून टिळकांची स्तुती करताना सावरकरांना त्यांच्या हिंदुत्वनिष्ठेसाठी शिव्यांची लाखोली वाहतात.

ह्याला म्हणतात समाजवाद ! आणखी काय लिहावं ? राम मनोहर लोहियांचे उदाहरण ही बोलकं आहे. (संदर्भ - ज्ञानयुक्त क्रांतियोद्धा - ज द जोगळेकर)

दुर्दैव हे की हे सर्व दिसत असूनही हे लोक साम्यवाद, समाजवाद, मार्क्सवादाकडे का वळतात हे कळत नाही. थोडक्यात काय तर थोडं आपल्याविरोधात गेलं की लगेचच त्यांस बहिष्कृत करायचं. तरीही लोक साम्यवाद, समाजवादाच्या नादी कसे काय लागतात कुणास ठाऊक ???

गोडगोड शब्द बोलायचे, समता, स्वातंत्र्य, न्याय, वगैरे गप्पा हाणायच्या, पण वास्तवात मात्र विरोधात गोले की लगेचच बहिष्कृत करायचं. शोषण, शोषित, शोषक, वगैरे मार्क्सवादी विचारसरणीच्या तथाकथित क्लास स्ट्रगल अर्थात तथाकथित वर्गसंघर्षाच्या खोट्याच कथा तरुणांच्या माथी मारायच्या व माथी भडकवायची.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणूनच मार्क्सवाद्यांची केलेली निर्भ्रर्त्सना जगजाहीर आहे. अर्थात दुर्दैवाने आता बाबासाहेबांनाच मार्क्सवादी ठरविण्याचा अट्टाहास सुरु आहे ही गोष्ट लपून राहिलेली नाही. कम्युनिस्टांपासून सावध राहा असे टाहो फोडून बाबासाहेब समाजबांधवांस समजावून सांगत असताना त्यांनाच त्याच (कु)विचारसरणीत गोंदविण्याचा प्रयत्न किती निंदनीय आहे हे वेगळं सांगायला नकोच. सविस्तर ह्यावर कधीतरी लिहीनच. तूर्तास लेखणींस विराम !

अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु !

©तुकाराम चिंचणीकर
#पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

Monday, 29 May 2017

यज्ञोपवीत (जानवे) - एक चिंतन




आर्य सनातन वैदिक हिंदु धर्मात यज्ञोपवीत अर्थात जानव्याला व डोक्यावरच्या सहस्त्रारचक्राच्या ठिकाणच्या शीखेला अतीव महत्व आहे. परमादरणीय श्री भिडे गुरुजींनी जो रायगडी सुवर्ण सिंहासनाचा संकल्प धारण करण्याविषयी चार जुनला येण्यासाठी आम्हा सर्व धारकर्यांना जी आज्ञा दिली आहे, तदनुसार गडावर तत्प्रसंगी सर्वांस यज्ञोपवीत धारण करण्यांस आम्ही सिद्ध आहोत. म्हणूनच आम्हा सर्व धारकरी बंधुंस त्याविषयीच्या स्पष्टतेचा व भ्रमांचा निराकरण करणारा एक लेख आमचे धारकरी बंधु योगेशजी देशपांडेंनी काही सप्ताहापूर्वीच लिहिला. इतर अभ्यासु बंधु धारकर्यांनीही वेळोवेळी त्यावर लिहिलंय. पण त्यावर त्यात शास्त्रीय प्रमाणांसहित थोडं स्पष्टीकरण द्यावे वाटलं म्हणून हा लेखनप्रपंच! पुण्यश्लोक श्रीशिवप्रभूंनी राज्याभिषेकसमयी उपनयन होतांच यज्ञोपवीत धारण करण्याचा व आग्र्याहून सुटकेसमयी धर्मवीर छत्रपती श्रीशंभुराजेंस उपनयन संस्कार केल्याचा उल्लेख सर्वश्रुत आहेच.

स्वराज्यसंकल्पक परमादरणीय श्री. शहाजी महाराजांच्या चरित्रातले उल्लेख

जयराम पिंडे नावाच्या समकालीन राजप्रासादातल्या (दरबारातल्याच) लेखकाने "राधामाधवविलासचम्पु"  नावाच्या अप्रतीम ग्रंथामध्ये शहाजी महाराजांची दिनचर्या दिलीय. त्यात वेदमंत्रांच्या पठनाने त्यांची पहाट होत असे लिहिलेय. जिज्ञासूंनी तो ग्रंथ मुळातून वाचावा ही विनंती!

पृष्ठ क्रमांक ३४-३५ - दिनचर्या
(सोबत पाने जोडली आहेत)

शहाजी महाराज अस्खलित संस्कृत मधून संवाद करीत व संस्कृत कोडी टाकत व ती पूर्ण करणार्यांस पारितोषिक देऊन सन्मान करत. प्रश्नांची कवींना उत्तरे द्यायला सांगत.

बजाजी निंबाळकरांच्या शुद्धीकरणाचा इतिहास हा सर्वश्रुत आहे कारण शुद्धीकरण करताना जो यज्ञ करतात त्यात गळ्यात यज्ञोपवीत घालणं आवश्यक आहे. कोणताही यज्ञ करताना ते घालावंच लागतं. कारण यज्ञोपवीताशिवाय यज्ञ करता येत नाही.

शंभुराजेंनी सुद्धा एका कुलकर्ण्याचे शुद्धीकरण केल्याचा इतिहास आहे.
लग्न करताना सुद्धा अनेक जण यज्ञोपवीत घालतात. आणि हे सर्व जातींमध्ये आहे.

नुकताच माझ्याच घरासमीप श्रीसंत नामदेव मंदीरातच पंढरपूरात कालच म्हणजे २८ मेला एक श्रीविश्वकर्मा त्वष्टापांचाळ समाज, पंढरपूर ह्यांचा सामुदायिक उपनयन सोहळा संपन्न झाला. चाळीस ते पन्नास जणांना मी स्वत: त्या कार्यक्रमात पाहिलंय. संध्याकाळी मोटी शोभायात्रा निघाली होती. पंढरपूरात ये ऊन खात्री करून घ्यावी. हे पांचाल समाजाचे आहेत. (सोबत चित्र जोडलं आहे)


महाराष्ट्र राज्य सरकारने प्रकाशित केलेल्या "महाराष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड - भाग १" - शिव काल (इ.स. १६३० ते १७०७) ह्या ग्रंथात

धार्मिक चालीरीती व परंपरा ह्या शीर्षकाखाली स्पष्ट लिहिलं आहे की त्या काळात सर्व जातीत ६ संस्कार केले जात. प्रमुख म्हणजे मौंजीबंधन (मुंज ), विवाह, गर्भाधान व अन्य संस्कार!

पृष्ठ क्रमांक ६१६
(सोबत चित्र जोडलं आहे)

ह्या ग्रंथाची ओनलाईन पीडीएफ www.msblc.Maharashtra.gov.inवर मिळेल.


आता आधुनिक इतिहास पाहुयांत

डॉ. आंबेडकरांनी ६,००० अनुयायांस वाटलेली यत्रोपवीतं !
( सोबत सर्व चित्रे जोडली आहेत. )

धनंजय कीर लिखित आंबेडकर चरित्रात पृष्ठ क्रमांक १४८ वर आंबेडकरांनी जानवी वाटल्याचा उल्लेख आह तो खालीलप्रमाणे.

"परिषदेच्या कार्याचा समारोप करतेवेळी प्रतिनिधींना यज्ञोपवीते वाहण्यात आली. आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी देवराव नाईक ह्यांनी पौरोहित्य स्वीकारून सहा सहस्त्र प्रतिनिधींचा वेदमंत्रांच्या गजरात हा समारंभ पार पाडला."

पुढे आंबेडकर गोलमेज परिषदेसाठी लंडनला ४ ओक्टोबर, १९३० साली "व्हॉईसरॉय ओफ इंडिया" ह्या बोटीने निघायच्या आधी आपले वरील ब्राह्मण मित्र देवराव नाईकांविषयी ते म्हणतात

"देवराव नाईक हे आपले उजवे हात असुन ते आपल्या(माझ्या) अनुपस्थितीत चळवळीला मार्गदर्शन करतील. "
ह्याच नाईकांवर पुढे त्यांनी "बहिष्कृत भारत" ह्या आपल्या मुखपत्राची जबाबादारी सोपवून संपादक पद दिले.

थोडक्यात त्यावेळी त्यावर कुणीही आक्षेप घेतला नाही. पण ३ जुनच्या प्रतिष्ठानच्या सिंहासन संकल्पांस व जानवी धारणांस मात्र काही द्वेष्टे लोक विरोध करताहेत. अर्थात अशा मुर्खांकडे कोण लक्ष द्यावे?

सावरकरांनीही जानवे वाटप केल्याचे उदाहरण

बाळाराव सावरकर लिखित रत्नागिरी पर्वातही सावरकरांनी अनेक ब्राह्मणेतर लोकांना गायत्री मंत्र, गीता, स्तोत्र शिकविल्याचे अनेक उल्लेख आहेत. वैश्य बंधुंचा वैदिक पद्धतीनेच उपनयनाचाही उल्लेख आहे. अनेक तथाकथित पृर्वास्पृश्य अशा आमच्या महार बंधुंस सावरकरांनी सर्वाधिकार दिल्याचे प्रसंग जागोजागी आढळतील. ह्या रत्नागिरीच्या स्थाबद्धतेत त्यांनी केलेली सामाजिक क्रांती ही केवळ अवर्णनीय व विलक्षण आहे. महत्वाचे म्हणजे आंबेडकर-सावरकर भेटीही ह्यावेळीच झाल्या आहेत. जिज्ञासूंनी हा ग्रंथ वाचावा. असो.

एका महत्वाच्या आक्षेपाला उत्तर

ब्राह्मणांनी आम्हाला जो अधिकार नाकारला तो आता का देताहेत????

ह्या आक्षेपांला पुरावा तर काहीच नाही. उलट आता अधिकार दिला नाही म्हणून बोंबलणारे तो आता देताहेत तर विरोध करताहेत. वाह रे वाह !

आता डॉ. आंबेडकर अधिकार नकार ह्याबाबतीत काय म्हणताहेत ते आपण पाहुयांत.

‘‘जहां तक उपनयन संस्कार और यज्ञोपवीत धारण करने का प्रश्न है, इस बात का कहीं कोई प्रमाण नहीं मिलता कि यह शूद्रों के लिए वर्जित था। बल्कि ‘संस्कार गणपति’ में इस बात का स्पष्ट प्रावधान है और कहा गया है कि शूद्र उपनयन के अधिकारी हैं।’’
(समग्र आंबेडकर हिंदी वांग्मय - खंड ७, पृष्ठ क्रमांक ३२५-३२६ - भारत सरकार)

म्हणजे उपनयन सर्वांना होतं हे स्वत: बाबासाहेबच म्हणताहेत. आता किती विरोध करणार????


बरं ही काही पहिली वेळ नाही प्रतिष्ठानने जानवी वाटायची!

धारकर्यांना माहिती असेल की ह्याआधीही अनेकवेळा आदरणीय गुरुजींनी सर्वांस जानवी धारण करण्यांस सांगितले आहे. थोडक्यात रायगडावरच्या यज्ञोपवीत धारणाला विरोध करणार्यांना व त्यातही अकारण ब्राह्मण-ब्राह्मणेतर किंवा वैदिक-अवैदिक वाद शोधु पहाणार्यांना आमच्या धारकरी बंधुंनी दुर्लक्षित करावे. आपलं काम आपण करावे ही विनंती ! त्यांना आता काही काम नसल्याने केवळ विरोधाला विरोध करायचे काम शेष आहे. दुर्लक्षावे ही विनंती!

आता धर्मशास्त्रीय मुळ संदर्भ पाहुयांत!

आमच्या हिंदुधर्मांतल्या १६ संस्कारांचे मुळ हे वेदांमध्ये आहे. त्यामध्ये जो दहावा असा उपनयन संस्कार आहे, त्यात प्रत्येकांस यज्ञोपवीत धारण करण्याचा अधिकार आहे. विशेषत: डोक्यावर शिखा (शेंडी) व गळ्यात यज्ञोपवीत (जानवे) ह्याचा आधार वैदिक आहे तो निम्नलिखित

शिखिभ्य: स्वाहा  !
अथर्ववेद - १९.२२.२५

इथे शिखा हा शब्द स्पष्टपणे आलाय..

उपवीतिने पुष्टानां पतये नम:!
यजुर्वेद - १६.१७

इथे उपवीत म्हणजेच यज्ञोपवीत धारण करणार्या पतींचा सन्मान करा अशी आज्ञा आहे.

अथर्ववेदाचे ब्रह्मचर्य सूक्त ११ वे कांड, ५ वा अध्याय हा स्पष्टपणे उपनयनाचे व यज्ञोपवीताचा उल्लेख करतो. म्हणूनच वेदांवरचे सर्वश्रेष्ठ भाष्यकार महर्षि दयानंद

"यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेर्यत् सहजं पुरस्तात् !
आयुष्यमग्र्यं प्रतिमुञच् शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेज:!
पारस्कर गृह्यसूत्र - २.२.१०
वैखानस व बौधायन गृह्यसुत्र सुद्धा !

हा संदर्भ देतात सत्यार्थ प्रकाश मध्ये.

यज्ञोपवीताची वैज्ञानिक कारणमीमांसा

यज्ञोपवीत का आवश्यक ह्याची वैज्ञानिक कारणमीमांसा उपरोक्त श्लोकात आहे. तिथे पुरस्तात् असा शब्द आहे ज्याचा अर्थ हे यज्ञोपवीत आधीपासूनच आहे असा होतो. आता आधीपासून म्हणजे कधी?

तर मातेच्या गर्भापासून!

 तिथे आपल्या शरीराचे भरणपोषण ज्या जोडलेल्या नाळीने होते, जी आपल्या नाभींस जोडलेली असते, त्याचे चित्र जर आपण पाहिले तर तेही आपल्या यज्ञोपवीताप्रमाणेच दिसते. (सोबत गर्भस्थ शिशुचे चित्र जोडले आहे.) थोडक्यात ज्याप्रमाणे मातेच्या गर्भात तिची नाळ आपले पोषण व रक्षण करते तद्वतच उपनयनानंतर आपले गुरु आपणांस ते यज्ञोपवीत घालून आपले रक्षण करतात असा भावार्थ आहे. ही झाली वैज्ञानिक कारणमीमांसा! बाकी यज्ञोपवीताचे शारीरिक लाभ तर आहेतच. मनुस्मृतीतही हा उल्लेख आहे पहा



मातुरग्रेsधिजनं द्वितीयं मौञजीबन्धने!  तृतीय यज्ञदीक्षायाम् !
२.१६९

म्हणजे आधी आईच्या गर्भात, दुसरे उपनयनावेळी व तिसरे यज्ञाच्या दीक्षेवेळी.

आयुर्वेदांत आयुष्यवर्धक अमृता नाडी म्हटलंय यज्ञोपवीताला !

जर गर्भातली ती नाळ तुटली तर जसे आपण जीवित नाही राहु शकणार तद्वतच यज्ञोपवीताचे आहे. म्हणूनच आयुर्वेदांत त्याचा असा गौरव आहे. असेच यज्ञोपवीत व शिखेचे उल्लेख गृह्यसुत्रादि धर्मग्रंथांमध्ये व नंतरच्या सर्व परवर्ती साहित्यातही आढळतात.विस्तारभयास्तव ते इथे देत नाही.

यज्ञोपवीतांस परमपवित्र समजलं जायचं कारण वेदाध्ययन, यज्ञाधिकार ह्या सर्वांस तो संस्कार आवश्यक असल्याने त्यांस विद्यासुत्र, यज्ञसूत्र, ब्रह्मसूत्र अथवा सावित्रीसूत्र अशी नावे आहेत. यज्ञोपवीत उपनयनाचा आत्मा असल्याने सर्व हिंदुंना तो अधिकार आहे. सर्व म्हणजे सर्व. हे आम्ही पूर्ण अभ्यासाअंती लिहितोय. असो.

वेदांचा अधिकार सर्वांस आहे व त्यासाठी यज्ञोपवीत आवश्यक आहे.

आता काही जण विचारतील की आदरणीय गुरुजी तिथे काय वेदाध्ययन करणार आहेत का?  तर तसे नाही. मी केवळ मुळ संदर्भ द्यावा म्हणून लिहिलंय. त्यामुळे सर्व धारकर्यांनी ते आणायलाच हवं. तिथे आपण बत्तीस मण सुवर्ण सिंहासनाचा पवित्र सत्यसंकल्प घ्यायचा असल्याने त्या यज्ञोपवीताच्या साक्षीने तो घ्यायचा आहे. म्हणूनच हा लेखनप्रपंच!

स्त्रियांना सुद्धा यज्ञोपवीताचा अधिकार

वाल्मीकि रामायणात सीतेने यज्ञोपवीत धारण केल्याचा, संध्या केल्याचा व मेघनाथाने युद्धात माया निर्माण करण्यासाठी सीतेची प्रतिकृती निर्माण करून तिचे यज्ञोपवीत कापल्याचे उदाहरण आहे. म्हणजे सीता यज्ञोपवीत धारण करत होती. संदर्भ

यज्ञोपवीतमाधुय भिन्नता तेन तपस्विनी
युद्धकांड - ६२.३१

 तिची सासु कौसल्याही यज्ञ केल्याचा उल्लेख आहेच. वालीची पत्नी तारा देखील मंत्रविद् होती असे म्हटलंय. (किष्किन्धा कांड - १६.१२) महाभारतात कुंती स्वत: यज्ञ करत होती. (वनपर्व २८९-२०)

जर स्त्रिया धारण करत होत्या तर आपणांस काय धाड भरली आहे???

यज्ञोपवीत ९६ पेरांचेच का?

कारण प्रकृती ही ९६ तत्वांनी बनलेली आहे व आपण त्या प्रकृतीने बाध्य आहोत ही भावना रहावी म्हणून. दुसरे महत्वाचे कारण असे की मानवी आयुष्य शंभर वर्षांचे कमीतकमी मानलेलं आहे व चौथ्या वर्षानंतर मुंज केल्यांस आयुष्यांत ९६ वर्षे शेष राहतात म्हणूनही हा संदर्भ आहे.

ते डाव्याबाजूवरून उजव्या बाजुंसच उतरते का घालायचे?

वामांसदक्षकट्यन्तं ब्रह्मसूत्रं तु सव्यत: !
अन्तर्बहिरिवात्रयर्थं तत्वतन्तुसमन्वितम्!
परब्रह्मोपनिषद - १०

ह्याचे कारण हेच आहे की ह्यात तीन अवयवांचा प्रामुख्याने समावेश येतो. एक ह्रदय, द्वितीय आपली नाभी व तिसरे उजवा हाताचा मुठ. आपले ह्रदय हे डाव्या बाजुंस असून ते जानवे नाभीपर्यंत येत असल्याने त्याची जाणीव ह्रदय म्हणून श्रद्धा, नाभी म्हणून सामर्थ्य किंवा वीर्य ह्या अध्यात्मिक अर्थाने आपणांस ज्ञात राहावी हा हेतु असतो. उजवा हात हा पुरुषार्थाचा प्रतीक आहे ह्याचे प्रमाण अथर्ववेदांत आहे

कृतं मे दक्षिणे हस्ते जियो मे सव्य आहित: !
७.५०.८

खरंतर विस्तारभयास्तव जानव्याच्या अर्थाविषयी जास्ती स्पष्टीकरण देऊ शकत नाही. क्षमस्व !

हा झाला धर्मशास्त्रीय इतिहास.


अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु!!!


भवदीय,

©तुकाराम चिंचणीकर
#पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

Friday, 26 May 2017

स्वातंत्र्यवीर सावरकर नास्तिक होते का की बुद्धिवादी होते की आस्तिक होते की बुद्धिवादी-आस्तिक होते की विज्ञाननिष्ठ-आस्तिक होते ?????????

#इतिहासाच्या_पाऊलखुणा

#स्वातंत्र्यवीर_सावरकर_विशेष_सप्ताह


यद्यदाचरति श्रेष्ठ: तत्तद्देवेतरो जना: !
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते!
गीता

श्रेष्ठ पुरुषांचे आचरण हे सर्वसामान्यांस नेहमीच अनुकरणीय व अनुसरणीय असल्यामुळे तात्यारावांसारख्या लोकोत्तर पुरुषाच्या व्यक्तिमत्वाचे हे वैशिष्ट्य आकळणे अत्यावश्यक आहे म्हणून हा लेखनप्रपंच!  सांप्रत बुद्धिवाद बुद्धिप्रामाण्यवाद, विवेकवाद वगैरे शब्द सतत कर्णांवर येतात. अनेकांचा असा भ्रम आहे की हे अगदी नवीनच आहे व आमच्या प्राचीन पूर्वज आर्यांस किंवा आम्हांसही जणु काही हे माहितीच नाही. तूर्तास ह्यावर भाष्य करत नाही. स्वतंत्रपणे कधीतरी करीन. पण प्रस्तुत विषयाचा विचार करता तात्यारावांच्या चरित्राचा अभ्यास करताना त्यांच्या प्रखर किंबहुना काहीठिकाणी टोकाच्या अशा बुद्धिवादाची मांडणी अनेकवेळा पहायला मिळते. सुदैवाने त्यांच्या बुद्धिवादावर प्रा. शेषराव मोरे व लंडनस्थित डॉ. वासुदेव शंकर गोडबोले ह्या दोन लेखकांनी विपुल लिखाण व संशोधन केलंय. आदरणीय प्र ल गावडेंचाही प्रबंध बर्याच वर्षांपूर्वी वाचला, त्यांना व्यक्तिगत भेटलोही व संवादही केला. भालबा केळकरांचाही ह्यावर ग्रंथ आहे असे सोबतच्या अंकात वाचायांस मिळालंय पण वाचला नाही अद्याप. असो.

समुळ ग्रंथ पाहिल्यावीण, उगाचच ठेवी जो दूषण!
गुण सांगता अवगुण, पाहें तो एक पढतमूर्ख!
दासबोध - दशक दोन, समास १०

तात्यारावांचे समग्र साहित्य नऊ खंडात प्रसिद्ध आहे. त्यांचे धनंजय कीरांनी लिहिलेलं चरित्र व बाळाराव सावरकरांनी लिहिलेलं चरित्रात्मक चार खंड हे सर्व वाचल्यावर तात्यारावांच्या ह्या व्यक्तिमत्वविशेषाचे चिंतन करणे व त्याविषयींच्या भ्रमांचे निराकरण करणे म्हणून हा लेखनप्रपंच!

नास्तिक शब्दाचा अर्थ ?

नास्तिको वेदनिन्दक: !
जो वेदांची निंदा करतो तो नास्तिक अशी मुळ व्याख्या आहे. सांप्रत ईश्वराचे अस्तित्व नाकारतो तो नास्तिक अशी व्याख्या रुढ आहे. ह्या दोन्ही अर्थाने तात्याराव नास्तिक होते का हा मुळ प्रश्न
आहे.

बुद्धिवादी बुद्धिप्रामाण्यवादी म्हणजे काय?

प्रत्यक्ष, प्रयोग, अनुभव व तर्क इत्यादींच्या आधारे सत्यशोधन करणे ही बुद्धीवादाची शास्त्रीय प्रक्रिया आहे.
बुद्धीला प्रमाण मानणे व जे बुद्धीस रुचेल, पटेल तेच मानणे व आचरणे व धर्मग्रंथात किंवा परंपरेने एखादी गोष्ट सांगितलेली आहे म्हणूनच ती प्रमाण न मानता बुद्धिवादाच्या, तर्काच्या कसोटीवर त्याची परीक्षा करणे हा थोडक्यात मला समजलेला बुद्धिवादाचा अर्थ आहे. जर ह्यात काही चुक असेल तर विद्वानांनी निदर्शनांस आणुन द्यावे ही विनंती!

विज्ञाननिष्ठा म्हणजे काय?

आमच्या धर्मशास्त्रात आम्ही ज्यांस पदार्थ विद्या म्हणतो त्यांस आधुनिक जगात आपण विज्ञान ही संज्ञा देतो. आंग्लभाषेतली साइन्स ही संज्ञा हीदेखील विज्ञानासाठी आपण योजित असतो. तेंव्हा विज्ञाननिष्ठा म्हणजे आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर प्रत्यक्ष प्रयोगाअंती जे सिद्ध होते तेच सत्य स्वीकारार्ह्य अशी साधी सोप्पी व्याख्या करता येईल. दोन गोष्टींतील कार्यकारणभाव ठरविणे हे विज्ञानाचे मुल आहे. चराचर सृष्टीची निर्मिती कशी झाली व तिचे अस्तित्व काय ह्यापासून मनुष्याच्या जीवनात त्याच्या अस्तित्वापर्यंतच्या कार्यकारणभावाची मीमांसा हा विज्ञानाचा विषय आहे. म्हणूनच विज्ञाननिष्ठेचा व बुद्धिवादाचा आधार बुद्धि हा एकच आहे असे प्रा. मोरे सर म्हणतात.

धर्मचिकीत्सा

मानवी जीवनांवर सर्वात महत्वाचा परिणाम असतो तो धर्माचा व तत्जन्य श्रद्धेचा. कुणी कितीही नाकारुदे. त्यामुळे बुद्धिवादाचा किंवा विज्ञाननिष्ठेचा किंवा आस्तिकतेचा-नास्तिकतेचा विचार करताना धर्मचिकीत्सा ही अर्थातच क्रमप्राप्त असते. अर्थात ती करत असताना आपल्याल्या त्या धर्माच्या मूलतत्वांचे ज्ञान असणे व त्या धर्मग्रंथांच्या भाषेचे ज्ञान असणेही आवश्यक असते. हे दुर्दैवाने अनेकजण समजून घेत नाहीत म्हणून गोंधळ होतो.

 असो आता सावरकरांची भूमिका उपरोक्त विषयांच्या संदर्भात काय आहे हे पहायला हवं. मुळ विषयांकडे वळुयांत आता !

सावरकर नास्तिक म्हणजे ईश्वर  नाकारणारे होते का???

अनेकजण तात्यारावांवर नास्तिकतेचे शिक्का चिकटविताना नेहमी त्यांच्या ज्या लेखाचा संदर्भ देतात तो म्हणजे

विश्वाचा देव व मनुष्याचा देव!

सावरकरांच्या गायीविषयीच्या मतांचा जसा विपर्यस्त अर्थ काढला जातो तसाच ह्या लेखाचा काढला जातो. आरंभी ह्यालेखांतून तात्यारावांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा मनुष्यजीवनांवर काहीच परिणाम होत नाही असा अर्थ लावला आहे. पण पुढे जाऊन ह्यावरून तात्याराव ईश्वराचे अस्तित्वच नाकारतात असा जो अर्थ काहीजण काढण्याचा प्रयत्न करतात ती मात्र आम्हांस अत्युक्ती वाटते. कारण की वैदिक सिद्धांतानुसार ईश्वर हा तसा निष्पक्ष आहे. तो आपल्या कार्यात तसाही कुठेच ढवळाढवळ करत नाही. प्रत्येक जीव हा कर्म करण्यांस स्वतंत्र आहे व त्याचे कर्मफलभोग भोगण्यांसही तो स्वतंत्र आहे. हा वैदिक सिद्धांत महर्षि दयानंदांनी त्रैतवाद म्हणून मांडला. आचार्य शंकरांनी मांडलेल्या अद्वैतवाद नाकारणारा हा सिद्धांत असल्याने अनेकांनी ह्याकडे दुर्लक्ष केलं. पण आमचे व्यक्तिश: ठाम मत आहे की आचार्यांनी अद्वैताचा मांडलेला सिद्धांत हा तत्कालीन परिस्थितीवश आहे. सविस्तर ह्यावर आम्ही कधीतरी लिहीन.

तूर्तास ह्या एका लेखांवरून सावरकर हे ईश्वराचे अस्तित्वच नाकारणारे होते असा आरोप प्रा. शेषराव मोरे प्रभृती लोक जो करतात तो आम्हांस अनाठायी वाटतो. कारण तात्यारावांना हेंद्री-फेंद्री सामग्री देवते मान्य नसून विश्वाचा देव एकच मान्य आहे, जो मुळचा वैदिक सिद्धांत आहे. ह्यालेखांवरून तात्याराव नास्तिक किंवा ईश्वर नाकारणारे सिद्ध होऊच शकत नाहीत.

आणि तसेही तात्यारावांनी ईश्वर नाहीच असे कुठेही ठामपणे म्हटलेलं नाहीये. शेषराव स्वत: हे मान्य करतात की ईश्वर आहे किंवा नाही, त्याचे स्वरुप काय यांत सावरकरांनी रस नाही. (पृष्ठ क्रमांक ३८) आणि हेच शेषराव पुढच्या पृष्ठांवर लगेचच ज्या ईश्वरांवर सावरकरांचा विश्वासच नाही असे म्हणतात?  ह्याला काय म्हणायचे? टीका करण्याचा आमचे हेतु नसून भ्रमांचा भोपळा फोडण्याचा हेतु आहे. अकारण निष्कर्ष काढणे वास्तवांस धरुन होणार नाही.

कुंडलिनी जागृतीचा तात्यारावांचा स्वानुभव
संदर्भ - पृष्ठ क्रमांक १८४-१८५ - रत्नागिरी पर्व - बाळाराव सावरकर

माझी जन्मठेपच्या आरंभीसच तात्यारावांनी मी व्यायाम करताना पतंजलींची योगसुत्रे तोंडपाठ म्हणत असे स्पष्ट लिहिलं आहे. अंदमानात त्यांनी कुंडलिनी जागृतीचा प्रयोग केला होता हे जगजाहीर आहे. हिंदुध्वजांवर कुंडलिनी कृपाणांकित करताना व्याख्यानात त्यांनी हा स्वानुभव प्रकट केलाय. ते म्हणतात

"कुण्डलिनी ही प्रत्येक माणसाच्या शरीर शांत पाठीच्या कण्यात असते. कमरेच्या बाजूला असलेल्या तिच्या खालच्या टोकाला मूलाधार म्हणतात. त्यांतील सुप्तशक्ती जागृत करून ती मस्तकांतील सहस्त्र धारापर्यंत पोंचली की मानवांला ब्रह्मानंद होतो, मोक्षांचे सुख मिळते असे योगशास्त्रांत सांगितले आहे. आणि आता विज्ञानानें ते सिद्ध झाले आहे. हा योगाभ्यांसी अधिकार्याचा विषय असल्याने मला त्यांची सत्यता चांगलीशी पटवून देता येणार नाही. तरी पण बंदिवासात असतांना एकट्याची एकांतातील करमणुक म्हणून या संबंधी ने मी जो थोडांसा अनुभव घेतला आहे. आणि ह्या विषयांवर जी अनेक पुस्तके वाचलीं आहेत त्यावर विश्वासून विचारविनिमयाच्या दृष्टीने आणि विद्यार्थी या नात्याने मी हा विषयसर्वांपुढे ठेवतो."

इति तात्याराव

पुढे योगसुत्रांवर तात्यारावांनी केलेलं विवेचन

ही घटना आम्हांस ऐकायला मिळाली की किंजवडेकर शास्त्री नावाच्या तत्कालीन धर्मशास्त्रांवरच्या विद्वानांशी तात्यारावांनी योगसुत्रांवर तासन्तास संवाद केला आहे. ह्यावरून त्यांचा योगाभ्यास सिद्ध होतो. आणि हा मोक्षप्राप्तीच्या दष्टीनेच आहे हे कसे नाकारणार?  केवळ शारीरिक लाभ म्हणून योग केल्याचे उदाहरण वेग ले पण कुंडलिनी जागृतीचा स्वानुभव व योगसुत्रांवर तासन्तास भाष्य हे निश्चितच चिंतनीय आहे. जिज्ञासूंनी ह्याविषयी विचार करावा.

आता ह्यावरूनही तात्यारावांना कुणी नास्तिक म्हणेल का?  तुम्हीच ठरवा !

अनादि मी अनंत मी!

ही कविता ज्या आत्मबलाचे प्रतीक आहे, ते आत्मबल तात्यारावांस नास्तिक सिद्ध करते का?

सावरकर बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ अवश्य होते!

हे आम्ही कुठेही नाकारत नाही. किंबहुना तसे ते असणे हेच त्यांच्यी व्यक्तित्वाचे वैशिष्ट्य आहे. पण बुद्धिवादी असणे म्हणजे नास्तिक असावेच हा कोण ता अट्टाहास? विज्ञाननिष्ठ असणे म्हणजेच ईश्वराचे अस्तित्व नाकारणे हे कुणी ठरविले ??? हा कुठला मापन दंड ???

हे म्हणजे आपली मानसिकता सावरकरांवर लादणे आहे. सावरकर निष्पक्षपातीपणे अभ्यासणे आवश्यक की आपली नास्तिक विचारसरणी त्यांच्यावर थोपविणे???  विचार व्हावा  ही विनंती!!!

काहीजण म्हणतात की सावरकर आधी आस्तिक होते पण ते आयुष्याच्या शेवटी काही वर्षे नास्तिक झाले!

ह्यासाठी हे लोक त्यांचा उपरोक्त लेख,  विज्ञाननिष्ठ निबंध, क्ष किरणे, अंधश्रद्धा निर्मुलन आदि लेखांचा संदर्भ देतात. पण एवढ्यावरूनही त्यांना नास्तिक ठरविणे अश्लाघ्य प्रयत्न ठरेल किंबहुना ती अत्युक्ती ठरेल.

थोडक्यात त्यांच्या समग्र साहित्याचा, चरित्राचा अभ्यास केल्यावर त्यांच्याविषयी निष्कर्ष काढताना ते बुद्धिवादी किंवा विज्ञाननिष्ठ असूनही  आस्तिकच होते असा निष्कर्ष आम्हांस काढण्याशिवाय गत्यंतर नाही!

एवंच लेखनसीमा!

तुकाराम चिंचणीकर
#पाखण्ड खण्डिणी

Wednesday, 10 May 2017

भगवान बुद्ध आणि वेद





गेली दीडशे वर्षे हे सांगण्यात येतंय की भगवान बुद्धाने एक नवीन धर्म स्थापन केला व त्यांनी मुळच्या वैदिक धर्माच्या विरोधात बंड उभारले. ज्यांचा वेदांचा तर राहुदेत पण बुद्धसाहित्याचाही अभ्यास आहे असे अभ्यासु लोकही असा बालिश तर्क करतात हे पाहून आश्चर्य वाटतं. ज्यांचा काहीच अभ्यास नाही त्या विषयी काय बोलावं ???? मुळात तत्कालीन इतिहासाचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते की बुद्धांनी नवीन काहीच सांगितले नाही. जैनादि-बौद्ध पंथ हे केवळ वैदिक धर्मातल्या महाभारतकालानंतरच्या काही निर्माण झालेल्या अवैदिक प्रथांना विरोध करण्यासाठी निर्माण झालेले प्रतिक्रियात्मकच आहेत असे स्पष्ट लक्षात येते. पण ना वेदांचा अभ्यास ना बौद्ध साहित्याचा!  केवळ पाश्चिमात्यांच्या लिखाणावर आपली मते बनवायची ही सांप्रतकालची विद्वत्तेची कसोटी आहे की काय असे म्हटल्यांस अत्युक्ती ठरणार नाही.  म्हणूनच सत्य काय आहे हे सिद्ध करण्यासाठी केलेला हा लेखनप्रपंच!


बुद्धाने हिंदु धर्म सोडून मी नवीन धर्म संस्थापत आहे असं एकही वाक्य मला कुठेही आढळलं नाही. तो मुळात जन्माने हिंदुच होता व मेलाही हिंदुच म्हणूनच की काय राहुल सांस्कृत्यायन ह्या बौद्ध पंडिताने देखील असं स्पष्ट म्हटलं की बौद्ध श्रमण व ब्राह्मण हे एकत्र राहत व त्यांना दोघांना जर कोणती उपाधी द्यायची तर ती फक्त आणि फक्त हिंदुच असेल. ह्याबबातीत राष्ट्रपती व एक विद्वान डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनांचं एक वाक्य फार महत्वाचे आहे. ते त्यांच्या भारत सरकारनेच प्रकाशित केलेल्या बुद्धधर्मावरच्या २५०० वर्षाच्या इतिहासकथन करणार्या एका ग्रंथात म्हणतात

बुद्धाने कोणताही नवा धर्म संस्थापिला नाही ! तो हिंदुच म्हणून जगला व महा निर्वाण करता झाला.

भारत सरकारने प्रकाशित केलेला हा ग्रंथ 👇

Buddha did not feel that he was announcing a new religion. He was born, grew up and died up a Hindu. He was restating with a new emphasis the ancient ideals of Indo-aryan civilization.

 अर्थ - बुद्धाला आपण नवा धर्म संस्थापित आहोत असं कुठेही वाटलं नाही. तो हिंदु म्हणूनच जन्माला आला, वाढला व मेलाही हिंदु म्हणूनच. त्याने इण्डो-आर्यन संस्कृतीची प्राचीन तत्वे नव्या उत्साहात पुनरुज्जीवित केली.

Dr Radhakrishnan in his Foreward to "2500 years of Buddhism", page no.68
Govt. Of India, Publication Division

ह्याचा अर्थ काय? स्पष्ट आहे.

आता काहीजण आक्षेप घेतील तर आम्ही एकच प्रश्न विचारतो की त्यांनी बुद्धाने नवीन धर्म संस्थापिल्याचे एकतरी वाक्य आणून दाखवावं.

बुद्धाला वेदद्वेष्टा ठरविणार्यांनी खालील बुद्धाचेच वेदस्तुतीचे संदर्भ पहावेत


सम समानाय वतानि जन्तु उच्चावच्च गच्छति सन्नसत्तो !
विद्वा च वेदेहि समेच्च धम्मं न उच्चावच्चं गच्छति भूरिपँजो !
सुत्तनिपात - २६२

अर्थ - इंद्रियाधीन होऊन आपल्या इच्छेने काही कर्म किंवा तप करून लोक उच्च नीच अवस्थेला प्राप्त होतात. पण जो विद्वान वेदांचा आश्रय घेऊन धर्मज्ञान प्राप्त करतो, त्याची अवनती कधीच होत नाही.

थोडक्यात धर्माचे ज्ञान हे फक्त वेदांनीच होतं हे ते स्पष्ट सांगतो. ही त्याची वेदनिष्ठा नव्हे काय???

एव पि यो वेदगु भावितत्तो बहुस्सुतो होति अवेध धम्मो !
सो खो परे निँझपये पजाना, सोतो वधानूपनिसूपपन्नो !
सुत्तनिपात ३२२

अर्थ- ज्याने वेद जाणले आहेत, ज्याने स्वत:ला स्थिर ठेवलं आहे, जो बहुश्रुत आहे व ज्याने वेदांना सत्यप्रकारे जाणलं आहे, तो स्वत: ज्ञानी बनून इतरांना जे ज्ञानाचे अधिकारी आहेत, त्यांना ज्ञान देऊ शकतो.


इथेही पुन्हा वेदज्ञानीच सर्वज्ञानी आहे असा पुनरुच्चार केलाय.

यो वेदगू ज्ञानरतो सतीमा, संबोधिपत्तो सरणं बहूनाम् !
कालेन तम्हि हव्येन पवेच्छे, यो ब्राह्मणो पुँजपेक्खो यजेय !
सुत्तनिपात - ५०३

अर्थ - जो वेदांना जाणणारा(वेदगू), ध्यानपरायण, उत्तमस्मृती असलेला(सतीमा), जो अनेकांना शरण देणारा आहे, जो पुण्य अर्जित करणारा यज्ञ करतो, त्यालाच भोजन द्या !


इथे देखील खर्या वेदज्ञ मनुष्याबद्दल आदर आहे.
आता वेदज्ञ ब्राह्मणाची केलेली प्रशंसा पाहुयात.

यं ब्राह्मणं वेदगुं अाभिजन्ना, अकिचनं कामभावे असत्तं !
अद्धा हि सो ओघमिम अतारि, तिण्यो च पारं अखिलो अकखो !
सुत्तनिपात - १०५६

अर्थ - ज्याने त्या वेदज्ञ ब्राह्मणाला जाणलं की जो अकिंचन म्हणजे धनहीन आहे, कामहीन आहे, तो आसक्तीरहित असा ह्या संसारातून नक्कीच तारला जातो.

थोडक्यात वेद जाणणाराच संसारसागरातून पर होतो.

विद्वा च सो वेदगु नरोइव, भवाभवे संग इम विसज्जा !
सो विततण्णो अनिघो निरासो अतारि सो जाति जरांति ब्रूमीति !
सुत्तनिपात - १०६०

अर्थ - वेदांना जाणणारा विद्वान (वेदगु) ह्या संसारात जन्म किंवा मृत्युमध्ये आसक्ति सोडून, तृष्णा व पापरहित होऊन, जन्म व वृद्धावस्था रहित होतो, असं मी (बुद्ध) म्हणतो.

थोडक्यात पुन्हा इथे वेदज्ञानी मनुष्याचे कौतुक केलं असून तो पापरहित होऊन मुक्ती प्राप्त करतो हे स्वत: बुद्धच सांगतोय.

ब्रूमीति म्हणजे मी म्हणतो असा अर्थ आहे ! मी म्हणजे बुद्ध स्वत: !

ने वेदगु दिठ्ठिया न मुतिया स मानमेति नहि तन्मयोसो !
न कम्मुना नापि श्रुतेन नेय अनुपनीत: न निविशनेषु !

अर्थ - वेदांना जाणणारा कधीही सांसारिक दृष्टी व असत्यविचाराने कधी अंहकारास प्राप्त होत नाही. केवळ कर्म नि श्रवणाने तो कधीही प्रेरित होत नाही.


बुद्धाने जी काही निंदा केलीय ती खोट्या वैदिकांची ! सत्य जाणणार्या वैदिकांची नव्हे ! जे स्वत:ला वैदिक म्हणवितात परंतु वेदांचा अर्थच जाणत नाही, त्यांची निंदा केलीय. अर्थात अशी निंदा निरुक्तकार यास्काचार्यांनी पण केलीय. पण म्हणून त्यांना कुणी वेदनिंदक म्हणतं काय???तसंच हे बुद्धाचे आहे.

संस्कृतमध्ये एक श्लोक आहे

यथा खरश्चंदनभारवाही न तु वेत्ति तत्वत: !

म्हणजे चंदनाचा भार वाहणार्या गाढवाला त्याचं ज्ञान असतं का? नाही ! कारण त्याच्यासाठी ते फक्त ओझंच असतं.

तसंच वेद नुसते पाठ करणारे पण त्याचा अर्थ न जाणणार्यांबद्दल व त्यानुसार आचरण न करणार्यांबद्दल बुद्धाने म्हटलंय. ह्याचा अर्थ वेदपठण करणारे गाढव आहेत असे नसून त्यांनी अर्थही जाणावा अशी अपेक्षा असते. आता ह्यावरून बुद्धाला वेदनिंदक म्हणणे हे वदतो व्याघाताचे उदाहरण होणार नाही काय???


मी ब्राह्मणच आहे - इति बुद्ध

एक कथा पाहणं आवश्यक आहे

सुंदरिक भारद्वाज सुत्ता मध्ये कथा येते की सुंदरिक ब्राह्मणाने जेंव्हा यज्ञ समाप्त केला, तेंव्हा त्या यज्ञाचा शेषभाग तो एका ब्राह्मणाला देऊ इच्छित होता. त्याने संन्यासी गौतमाला पाहिलं व त्याची ज्ञाती (जात) विचारली. तेंव्हा बुद्ध म्हणाला

"जात विचारु नये. मी ब्राह्मणच आहे."

 तो पुढे म्हणतो

यदन्तगू वेदगु यन्नकाले, यस्साहूति लभे तरस इज्जेति ब्रूमि
सुत्तनिपात ४५८

अर्थ - वेदांना जाणणारा (वेदगु) ज्याच्या आहूतीस प्राप्त करतो, त्याचा यज्ञ सफल होतो, असं मी म्हणतो.

पुढे सुंदरिक भारद्वाज म्हणतो की,

"माझा यज्ञ आज सफल झाला कारण आपल्यासारखा वेदज्ञ महापुरुष आज माझा यज्ञशेष प्राप्त करता झाला."

आता ह्यावरूनही बुद्ध हा यज्ञांचा समर्थक ठरत नाही काय? की हे वाचूनही त्याकडे दुर्लक्ष करणार??की ह्यावरून बुद्धाला ब्राह्मणद्वेष्टा ठरविणार??? पण तरीही काही लोक बुद्धांस यज्ञद्वेष्टा ठरवितात.

काय म्हणावं ह्यांच्या बुद्धीमांद्यास???


बुद्धाचे वेदाध्ययन


डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या "बुद्ध आणि त्याचा धम्म" ह्या ग्रंथात बुद्धाच्या वेदाध्ययनासंबंधी सविस्तर लिहिलं आहे. तरीही
ललितविस्तार नामक ग्रंथात बुद्धाच्या वेदाध्ययनाची कथा सविस्तर आलीय.

सिद्धार्थाने ब्रह्मचारी राहून चारीही वेदांचं अध्ययन केलंय ह्याचा पुरावा ललितविस्तार मध्ये आहे.

स ब्रह्मचारी गुरुगेह वासी, तत्कार्यकारी विहितान्नभजी !
सायं प्रभातं च हुताशसेवो, वूतेन वेदाश्च समध्यगीष्ट !

अर्थ - त्याने ब्रह्मचारी बनून गुरुगृही निवास करून त्यांची सेवा करून शास्त्रविहीत भोजन करून प्रात:सायं यज्ञ करून वेदांचं अध्ययन केलंय.

बुद्धाने यज्ञाची निंदा केली नसून यज्ञातल्या पशुहत्येची निंदा केलीय.

ब्राह्मणाधिगम्य सुत्त नावाने जे सुत्त आहे, त्यात बुद्धाच्या यज्ञाची निंदा वाचायांस मिळते. पण ही निंदा यज्ञाची नसून हिंसक यज्ञाची आहे. ज्या यज्ञात पशुहत्या केली जाते व प्राण्यांचा जीव घेतला जातो, त्या यज्ञांची निंदा बुद्धाने केलीय.पण काही दीडशहाण्यांनी ह्याचा विपरीत अर्थ काढून बुद्धाला यज्ञद्वेष्टा ठरविला.

त्रिपीटककारांनी स्पष्टपणे बुद्धाचा वेद व यज्ञावरचा विश्वास प्रकट केलाय.

बुद्ध स्वत:स वेदगु व वेदांतगु म्हणतो

(संदर्भ - चुल्लनिद्देश्य २.४.१८ व २.४.२८,  महानिद्देस्स १.९.८१ व १.१५.१८२, सिघनिक्काय)


संयुत्त निकाय हे पाच वेदांचा उल्लेख करतो. आता पाचवा वेद म्हणजे महाभारत किंवा इतिहास असेल हे स्पष्ट आहे. कारण महाभारताला पंचम वेद म्हणण्याची परंपरा आहे.

"टिन्नम् वेदनम् परगु" असं शैल ब्राह्मण मझ्झिम निकाय मध्ये स्पष्ट म्हणतो. इथे वेदनम् हा शब्द स्पष्ट आहे.

उज्जय सुत्त, सम्युत्त निकाय व सहावग्गसुत्त हे ३.९ मध्ये स्पष्टपणे बुद्धाच्या दृष्टिकोनातुन खरा यज्ञ कोणता व खोटा कोणता हे स्पष्ट करतं.

"एतम् यन्नं महाफ्फलो, एतं यजेत मेधावी, एतं हि यजमानसेवा सेयं होति " असे उल्लेख स्पष्ट आहेत.

आता अग्निहोत्राचा उल्लेख

अंगुत्तरनिकाय, सम्युक्त निकाय, मझ्झिमनिकाय ह्यामध्ये अग्निहोत्र करा असा उल्लेख निषाद व रथाकारास आहे.

गौतम बुद्ध हा यज्ञ च्या ऐवजी "यन्न" हा पालीभाषेतला शब्द वापरतो फक्त एवढाच फरक.  अनेक ठिकाणी बुद्धाने यज्ञसंस्थेचे कौतुक केल्याची उदाहरणे आहेत व ती विश्वासार्ह आहेत. अगदी धम्मपदाची किंवा सुत्तनिपात किंवा तत्सम ग्रंथांची उपरोक्त उदाहरणे नक्कीच अभ्यसनीय आहेत.

आता तुम्हीच ठरवा सत्य काय ते !

तुका म्हणे सत्य असत्यासी !
मन केले ग्वाही !

© तुकाराम चिंचणीकर
पाखंड खंडिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

महात्मा गौतम बुद्ध जयंतीनिमित्त त्याच्या हिॅदुत्वाचं चिंतन!



एक असत्य सहस्त्रवेळा सांगितलं की ते सत्य वाटायला लागतं - इति गोबेल्स, मार्क्सवादी साम्यवादी, सेक्युलर, पुरोगामी, सर्धर्मसमभावी, बामसेफी, ब्रिगेडी तंत्र

गेली दीड दोन शतके ब्रिटीशप्रणित व मार्क्सवादी साम्यवादी दृष्टीकोनातून हिॅदुस्थानच्या इतिहासासंबंधित असा काही भ्रम हेतुपुरस्सर पसरविण्या येतो की 
१. बुद्धाने हिॅदु धर्म सोडून नवीन धर्म संस्थापिला
२. बुद्धाने वैदिक धर्माच्या विषमतेला कंटाळून त्याला विरोध करून आपल्या नवीन धर्माची संस्थापना करून फार मोठी सामाजिक क्रांती केली. जैनांनीही ही अशीच क्रांती केली असाही प्रवाह आहे.
३. बुद्धाने व जैनांनीच अनादिकाळापासून असेलेली अस्पृश्यता नष्ट केली व बहुजन समाजास ब्राह्मणांच्या दास्यातून मुक्त केले. 
४. बुद्धाचा जन्म अडीच सहस्त्र वर्षापूर्वीचा ! 
५. बुद्धाने वेद व यज्ञ संस्थेच्या विरोधातच बंड पुकारले व यज्ञ बंद पाडले. 
६. बुद्धाने ब्राह्मणांचं परंपरागत श्रेष्ठत्व नष्ट केलं किंवा तो ब्राह्मणद्वेष्टा होता.
७. बुद्धाने यज्ञातील पशुहिॅसेस विरोध केला व यज्ञ बंद पाडले
८. बुद्धाने सर्वांस समान अधिकार दिले व ब्राह्मणशाही नष्ट केली.
९. बुद्ध हे डुकराचे मांस खाऊन मेला काय???

आता ह्या थोतांड असलेल्या आक्षेपांचं थोडक्यात निराकरण आपण करुयात. कारण आज बुद्ध जयंती असल्याबद्दल ह्या महान हिॅदुश्रेष्ठास योग्य न्याय देणं हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो म्हणूनच हा लेखनप्रपंच ! 

आम्ही पुनश्च एकदा सांगु इच्छितो की आम्हांस बुद्धाबद्दल नितांत आदरच आहे परंतु त्यांच्याबद्दल पसरविल्या जाणार्या कपोलकल्पित कल्पनांना आमचा विरोध आहे व त्यांचं निकाकरण करणं हीच आम्ही त्याला एक श्रद्धांजली समजतो. असो

पहिला आक्षेपाचं खंडण

बुद्धाने हिॅदु धर्म सोडून मी नवीन धर्म संस्थापत आहे असं एकही वाक्य मला कुठेही आढळलं नाही. तो मुळात जन्माने हिॅदुच होता व मेलाही हिॅदुच म्हणूनच की काय राहुल सांस्कृत्यायन ह्या बौद्ध पंडिताने देखील असं स्पष्ट म्हटलं की बौद्ध श्रमण व ब्राह्मण हे एकत्र राहत व त्यांना दोघांना जर कोणती उपाधी द्यायची तर ती फक्त आणि फक्त हिॅदुच असेल. ह्याबबातीत उपराष्ट्रपती व एक विद्वान डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णनांचं एक वाक्य फार महत्वाचे आहे. ते त्यांच्या भारत सरकारनेच प्रकाशित केलेल्या बुद्धधर्मावरच्या २५०० वर्षाच्या इतिहासकथन करणार्या एका ग्रंथात म्हणतात


बुद्धाने कोणताही नवा धर्म संस्थापिला नाही ! तो हिॅदुच म्हणून जगला व मेला.

भारत सरकारने प्रकाशित केलेला हा ग्रंथ 👇

Buddha did not feel that he was announcing a new religion. He was born, grew up and died up a Hindu. He was restating with a new emphasis the ancient ideals of Indo-aryan civilization. 
 अर्थ - बुद्धाला आपण नवा धर्म संस्थापित आहोत असं कुठेही वाटलं नाही. तो हिॅदु म्हणूनच जन्माला आला, वाढला व मेलाही हिॅदु म्हणूनच. त्याने इण्डो-आर्यन संस्कृतीची प्राचीन तत्वे नव्या उत्साहात पुनरुज्जीवित केली.

Dr Radhakrishnan in his Foreward to "2500 years of Buddhism", page no.68

Govt. Of India, Publication Division

ह्याचा अर्थ काय? स्पष्ट आहे. 

आता काहीजण आक्षेप घेतील तर आम्ही एकच प्रश्न विचारतो की त्यांनी बुद्धाने नवीन धर्म संस्थापिल्याचे एकतरी वाक्य आणून दाखवावं.


दुसर्या आक्षेपांचे खंडण 

म्हणे बुद्धाने व जैनांनी वैदिक धर्माच्या विषमतवादी धोरणांस कंटाळून वेगळा धर्म संस्थापून फार मोठी वेगळी सामाजिक क्रांती केली.

हा विचार किती तथ्यहीन व तर्कदृष्ट व वास्तवांस सोडून आहे हे आता पाहु.

बुद्ध हा स्वत:च विषमता वादी अर्थात वर्णश्रेष्ठत्वाचा अभिमानी होता - हे घ्या पुरावे

न बोधिसत्ता हीनकुलेषु उपद्यन्ते

म्हणजे बौधिसत्व हे हीन कुळात कधीच जन्म घेत नाही.

ह्याचा अर्थ काय? ह्याला वर्णवर्चस्वाचा अभिमानच म्हणणार ना??? बुद्धाच्या शाक्य कुळात भावा बहिणींची लग्ने होत होती ! स्वत: बुद्ध अंबष्ठसुतात अंबष्ठ ब्राह्नणाला सांगतो की "आम्ही क्षत्रिय वंशाचे शुद्धत्व राखण्यासाठी बहिणींशी लग्न करतो !"

गौतम बुद्ध हा कुळाचे वंशाचे शुद्धत्व राखणारा आहे म्हणजेच तो जातीवादी होता ! अशा जातीवादी बुद्धाला आंबेडकर शरण का गेले हेच कळत नाही. हे बुद्धाचे रिडल्स आंबेडकरांना का दिसले नाही???

गौतमाचा पुर्वज औक्काक राजा ! त्याच्या मुलामुलींनी भाऊ बहीण असून आपसांत लग्न केली ! म्हणजेच वंशाचे व कुळाचे शुद्धत्व राखले ! ह्यावरून बुद्धाने फार मोठी सामाजिक क्रांती केली ह्याचा पुरावा काय???

थोडक्यात आंबेडकरांचा बुद्ध हा मुळ बुद्धापेक्षा वेगळा आहे

हे तत्कालीन महाबोधी मासिकाने व बौद्ध पंडितांनी वेळोवेळी आंबेडकरांच्या धम्मांतराबद्दल मांडलेले मत आहे. आंबेडकरांनी श्रीरामाला शिव्या घातल्या पण स्वत: बुद्ध हा श्रीरामचंद्राबद्दल काय म्हणतो ते पहा
जातककथा स्पष्ट सांगते की बुद्ध हा रामाचाच अवतार आहे ! दशरथ जातक सांगते की स्वत: गौतम बुद्ध म्हणतात की, " शुद्धोधन म्हणजे दशरथ, कौसल्या म्हणजे महामाया, सीता म्हणजे यशोधरा व राम म्हणजे मी स्वत: गौतम ! 


तिसर्या आक्षेपाला उत्तर

म्हणे अस्पृश्यता ही वैदिक धर्मप्रणितच होती व ती बुद्धांनी व जैनांनी नष्ट करून फार मोठे उपकार केले.

एकतर ह्या सिद्धांताला एकही तत्कालीन पुरावा नाहीये. जो बुद्ध स्वत: वंशश्रेष्ठत्व राखतो, तो अस्पृश्यता नष्ट करीलच कसा??? व अस्पृश्यता त्याच्या आधी होती ह्याचा एकही पुरावा नाहीये. आता खालील पुरावे घ्या.

जातीव्यवस्था नि अस्पृश्यता हिॅदुस्थानात कशी आली ह्यासंदर्भात अनेकांनी अनेक तर्कवितर्क करून वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत. 

पण आंबेडकर व महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंच्या मतानुसार हिॅदुस्थानात ह्या कुप्रथा ह्या बौद्ध व जैनकाळातच निर्माण झाल्या !

आंबेडकरांनी तर पहिल्या खंडात (इंग्रजी) स्पष्ट सांगितलंय की अस्पृश्यता किॅवा जातीव्यवस्था ही ब्राह्नणांनी निर्माण केली असा जो आपला समज आहे तो चुकीचा आहे. वस्तुत: ही गोष्ट त्यांच्या क्षमतेबाहेरची आहे असं ते म्हणतात ( Brahmins are to be blamed for many things but as far as creation of untouchability is concerned, such creation of Untouchability or Casteism was a work beyond the mettle of the Brahmins.)

महर्षी विठ्ठल रामजी शिॅदेंनी तर "अस्पृश्यतेचा प्रश्न" ह्या त्यांच्या निबंधात तर स्पष्ट पुराव्यासहित प्रतिपादन केलंय की बौद्धांनी व जैनांनीच नंतर
ह्या कुप्रथा निर्माण केल्या.

अस्पृश्यता ही वेदप्रणीत नाहीच नाही.

त्यामुळे आधी हे सर्व होते व बुद्धाने येऊन हे सर्व झुगारून देऊन फार मोठी समाजिक क्रांती केली हा तथ्यहीन सिद्धांत आहे. थोडक्यात बुद्धाने सामाजिक क्रांती केली हे केवळ थोतांड असून खरं तर त्यानेच जातीव्यवस्था निर्माण केली असा आरोप करायलाही जागा आहे. कारण तो वंशश्रेष्ठत्वाचा अभिमानी आहे. 

आता ह्याबाबतीत डाॅ सर्वपल्ली राधाकृष्णन पुन्हा त्यांच्या  "Indian Philosophy" ह्या त्यांच्या द्विखंडात्मक ग्रंथात ते म्हणतात. 
की बुद्धाने व जैनांनी कोणतीही सामाजिक क्रांती केलीच नाही ! घ्या पुरावे ' 👇


The Myth of Buddha's Social revolution

Actually Buddha did not create any kind of social revolution. 

"We cannot say that Buddha abolished caste, for the religion of buddha is an aristocratic one. We cannot say that Buddha effected any Social revolution. Even Birth in a Bramhin family, Buddha allows it to be a reward for the merit.

The still very prevalent notion that Buddhism and Jainism were reformatory movements, and that more especially they represented the revolt against the tyranny of caste, is quite erroneous. 

Buddha was not social reformer."

अर्थ - आपण असं नाही म्हणु शकत की बुद्धाने ज्ञातीव्यवस्था नष्ट केली, कारण बुद्धाचा पंथ हा स्वत:च वंशाभिमानी आहे. त्यामुळे बुद्धाने फार मोठी सामाजिक क्रांती केली असं आपण म्हणूच शकत नाही. कारण बुद्ध हा ब्राह्नण कुलात जन्म घेणं हेदेखील एक गुणश्रेष्ठत्वाचे प्रतीक मानतो. 

बुद्ध व जैन चळवळी ह्या ज्ञातीव्यवस्थेच्या छळाविरुद्ध झालेल्या आहेत ही आजपर्यंत असलेली समजूतच पूर्ण चुकीची आहे. कारण बुद्धाने कोणतीही सामाजिक क्रांती केली नाही. 

Dr Radhakrishnan - Indian Philosophy Volume 1  - pg no. 437-441


अर्थात इथे एक गोष्ट जाता जाता सांगायला हवी की आंबेडकरांनी ह्या संदर्भात अनेक कोलांट्या उड्या मारल्या आहेत. प्रसिद्ध अभ्यासक शेषराव मोरे सरांचं पण हेच मत आहे की बुद्धाला श्रेष्ठ ठरविण्यासाठी आंबेडकरांनी फार फिरवफिरवी केली आहे. असो तो स्वतंत्र विषय कधीतरी लिहु.


चौथ्या आक्षेपाचं खंडण

पाश्चिमात्य इतिहासकारांनी विशेषत: ब्रिटीशांनी अठराव्या, एकोणिसाव्या व विसाव्या शतकाच्या सुरुवातीस जे काही भारताबद्दल इतिहासलेखन केलं, त्यात भारताचा इतिहास हा दीड ते दोन सहस्त्र वर्षांनी पुढे आणण्याचं एक घोर पातक त्यांनी केलं. बुद्धाचा काळच ह्या लोकांनी १५०० ते १८०० वर्षे पुढे आणला ! त्यामुळे आदि शंकराचार्यांचा काळही तेराशे वर्षे अकारण पुढे आला जो आज चुकीचा असा इ स ७८८ ते ८२० असा मानला जातो ! 
पण पु ना ओक व इतिहासभूषण श्रीपाद दत्तात्रय कुलकर्णी ह्या दोन सत्यनिष्ठ व प्रथितयश इतिहासकारांनी मात्र ह्या थोतांडांना उघड्यावर पाडुन वास्तव मांडलं. पण लोक त्यांना मानायला तयारच नाहीत कारण डोक्यावर अजुनही मार्क्सवादाचा पगडा आहे. ओकांच्याही पुढे जाऊन कुलकर्णींनी त्यांच्या भीष्म नावाने प्रकाशित केलेल्या अष्टादश खंडात्मक इतिहासविवेचनातून हिॅदुस्थानचा इतिहास हा संदर्भासहित व पुराव्यासहित मांडला. त्यात त्यांनी बुद्धाचा व आदि शंकराचार्यांचा काळही हे दोघेही वास्तव स्वरुपात कित्येक वर्षे मागे नेले.

शंकराचार्यांचे जन्मवर्ष सामान्यत: इ स ७८८ धरण्याच येते जे चुक असून एकही शंकराचार्यांची गादी किॅवा पीठाधीशांचे संदर्भ हे मानत नाहीत. विशेष म्हणजे ह्या सर्व पीठाधीशांकडे ज्या काही आचार्यांच्या जन्मतिथ्या आहेत, त्यात सर्वत्र त्यांची जन्मवर्ष हे ई. सन पूर्वीचंच आहे 
संदर्भ - भारतीय इतिहास संशोधनातील घोडचुका - पु ना ओक

म्हणूनच आचार्यांचा काळ १२९७ वर्षे मागे म्हणजेच इस पूर्व ५०९ हाच योग्य जन्मकाल आहे !

हे इतिहासभूषण श्रीपाद दत्तात्रय कुलकर्णींचे मत ग्राह्य व योग्य व वस्तुनिष्ठतेस धरून आहे. 

आता हे पाश्चिमात्यांनी असं का केलं?

साहजिकय की पाश्चिमात्यांना त्यांच्या येशु ख्रिस्तांच्या अवतरणपूर्वी सर्व जग हे अंधारातच आहे असं वाटत होतं. त्यामुळे त्या अट्टाहासापायीच त्यांनी भारतीय इतिहासलेखन करताना ह्या दोन महापुरुषांवर हा अन्याय केला. आणि इतकंच नव्हे तर ह्याच इतिहासकारांनी अनेक ठिकाणी त्यांच्या प्रसिद्ध "फोडा आणि राज्य करा"
ह्या नीतीसाठीच हे केलं हे उघड आहे. बुद्धाला व जैनांना वेगळा पाडलं की आपोआप हिंदुसमाज विभाजित होतो हे षडयंत्र होतं. असो.

पाचव्या आक्षेपाच खंडण

बुद्ध हा यज्ञ व वेद विरोधी होता असा एक खोडसाळ प्रचार केला जातो, जो कितपत सत्य आहे आता आपण पाहु. खरंतर ह्यासाठी एक स्वतंत्र ग्रंथनिर्मिती करता येईल असा हा विषय आहे. तरीही थोडक्यात पाहु.

त्रिपीटककारांनी स्पष्टपणे बुद्धाचा वेद व यज्ञावरचा विश्वास प्रकट केलाय. 

बुद्ध स्वत:स वेदगु व वेदांतगु म्हणतो

(संदर्भ - कल्लनिद्गेश्य २.४.१८ व २.४.२८, 
 महानिद्देस्स १.९.८१ व १.१५.१८२, सिघनिक्काय)

सम्युत्त निकाय हे पाच वेदांचा उल्लेख करतो. आता पाचवा वेद म्हणजे महाभारत किॅवा इतिहास असेल हे स्पष्ट आहे. कारण महाभारताला पंचम वेद म्हणण्याची परंपरा आहे. 

टिन्नम् वेदनम् परगु असं शैल ब्राह्मण मझ्झिम निकाय मध्ये स्पष्ट म्हणतो. इथे वेदनम् हा शब्द स्पष्ट आहे.

उज्जय सुत्त, सम्युत्त निकाय व सहावग्गसुत्त हे ३.९ मध्ये स्पष्टपणे बुद्धाच्या दृष्टिकोनातुन खरा यज्ञ कोणता व खोटा कोणता हे स्पष्ट करतं. 
"एतम् यन्नं महाफ्फलो, एतं यजेत मेधावी, एतं हि यजमानसेवा सेयं होति " असे उल्लेख स्पष्ट आहेत.

 अग्निहोत्राचा उल्लेख

अंगुत्तरनिकाय, सम्युक्त निकाय, मझ्झिमनिकाय ह्यामध्ये अग्निहोत्र करा असा उल्लेख निषाद व रथाकारास आहे. 

गौतम बुद्ध हा यज्ञ च्या ऐवजी "यन्न" हा पालीभाषेतला शब्द वापरतो फक्त एवढाच फरक.   अनेक ठिकाणी बुद्धाने यज्ञसंस्थेचे कौतुक केल्याची उदाहरणे आहेत व ती विश्वासार्ह आहेत. अगदी धम्मपदाची किंवा सुत्तनिपात किंवा तत्सम ग्रंथांची उदाहरणे नक्कीच अभ्यसनीय आहेत. त्यामुळे बुद्धाला यज्ञद्वेष्टा ठरविणं अशक्य आहे. ह्याविषयांवर स्वतंत्रपणे मी लेख लिहीनच तूर्तास तरी एवढंच सांगतो की जिज्ञासुंनी श्रीपाद दत्तात्रय कुलकर्णी लिखित "Dharma and Vedic Foundations" हा ग्रंथाच्या शेवटचा भाग वाचावा ज्यात म्हणजे  VIII Chapter हा Buddha's love for Cow and yajnya" असा विषय आहे जो पृष्ठ क्रमांक ३४७ ते ३५६ वर विस्तारलेला आहे.


सहाव्या आक्षेपाचं खंडण

बुद्धाला ब्राह्नणद्वेष्टा ठरविणार्यांनी खालील गोष्टी पहाव्यात. 

आपला धम्म म्हणजे ब्राह्मणधर्मच आहे हे त्रिपिटकात शेकडो वेळा सांगितलेलं आहे.

१) संयुकातनिकाय-महावग्ग

"भिख्खू हो! ब्राह्मण्य म्हणजे काय आणि ब्राह्मणफल म्हणजे काय ते तुम्हास उपदेशितो."

२) खुद्दकनिकाय- उद्दालकजातक.

(नर कशाने) ब्राह्मण होतो , कसा केवली होतो. ' असा प्रश्न आहे. त्याचे उत्तर ' अग्निचयन करणारा , जलसिंचन करणारा , यज्ञासाठी यूप उभारणारा असा ब्राह्मण क्षेमी होतो आणि तो धर्माच्या ठायी प्रतिष्ठित समजावा (ध्म्मे ठित)

३) थेरगाथा- सुनीतथेर.

तपाने, ब्रह्मचर्याने , संयमाने , दमाने , ह्याने (माणूस) ब्राह्मण होतो. हेच उत्तम ब्राह्मण्य.

४) खुद्दकनिकाय मोरजातक.

जे ब्राह्मण सर्वधर्माच्या बाबतीत वेदज्ञ (वेदगू) असतात त्यांना मी नमितो , ते माझे रक्षण करोत .

५) अपण्णकजातक -

त्याचे शरीर ब्रह्मतेजाने झळकत होते. ब्रह्मस्वराने त्याने धर्म कथा सांगितली.

६) खुद्दकनिकाय - महावग्ग - अजपालकथा.

जो ब्राह्मण पापवृत्ती सोडून , निरहंकारी होवून ,संयत होवून ब्रह्मचर्य आचरितो (असा) वेदज्ञान (वेदांतगू) ब्राह्मण त्यानेच 'ब्रह्म ' वाद सांगावा.

७) खुद्दकनिकाय- महावग्ग बोधिकथा -

जेंव्हा प्रयत्नशील , ध्यानी ब्राह्मणासाठी प्रकटतात अस्तित्वधर्म (गौतमाला बोधी प्राप्त झाल्यानंतर त्याच्या मुखातून   उमटलेल्या पहिल्या काही उद्गारात ' ब्राह्मणाचा ' उल्लेख आहे.) आणि हा श्लोक तीन वेळा पुनरुक्त आहे.

८) अंगुत्तरनिकाय -

परीव्राजकांनो! ही चार ब्राह्मणसत्ये , ती मी स्वत: जाणून , साक्षात पाहून उपदेशिली.

९) धम्मपदामध्ये एक संपूर्ण प्रकरण (वग्ग)
ब्राह्मणस्तुतिमय आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने ते प्रकाशित केलंय. संकेतस्थळांवर ते आहे. 

मनुलाही हेवा वाटेल अशा शब्दात गौतमाने ब्राह्मणांचा आणि ब्राह्मण्याचा गौरव केला आहे. ह्या प्रकरणात एक्केचाळीस श्लोक आहेत. त्यातील अनेक श्लोकात ' तमहं ब्रुमि ब्राह्मणं' ' त्यास मी म्हणे ब्राह्मण ' हे पालुपद येते. गौतमबुद्धाला प्रिय असलेला हा ब्राह्मणम्हणजे भगवद्गीतेतील स्थितप्रज्ञ , गुणातीत ,भक्त, योगी , संन्यासी , कर्मयोगी , सात्विक वगैरे. ह्या संपूर्ण ब्राह्मणवग्गांच निरुपण स्वतंत्र शोधलेखाचा विषय आहे.ह्या आदर्श ब्राह्मणाला गौतमाने स्नातक , वृषभ (नेता) प्रवर , वीर ,महर्षी , अर्हत , सुगत आणि बुद्धसुद्धा ह्या संज्ञा वापरून गौरविले आहे. ह्या सर्व संज्ञा तीपिटक-ग्रंथात अनेकवार बुद्धाला स्वत:ला लावलेल्या आढळतात.

धम्मपदातील ३८९ वा श्लोक नोंद घेण्यासारखा आहे.

'ब्राह्मणांचे वाईट करू नका , आपल्यावर हल्ला करणाऱ्यावरही ब्राह्मणाने धावून जाऊ नये. जो ब्राह्मणावर प्रहार करील त्याचा धिक्कार असो. '

१०) खुद्दकनिकाय- भूरिदत्तजातक.

ब्राह्मण १) अध्ययन करणारा.
            २) भिक्षचर्य आचरणारा.
            ३) आहुताग्नी असतो. ह्या तीन गोष्टींमुळे ब्राह्मण हा अवध्य ठरतो.

११) खुद्दक- निमिजातक.

जे अत्यंत पापी लोक श्रमणाला किंवा ब्राह्मणाला इजा करतात किंवा आणतात, ते भीषणकर्मे लोक पाप प्रसवून,  खाली डोके (अश्या अवस्थेत) (उकळत्या) लोहकुंभीत पडतात.

१२) मजिझ्म- जे धम्म श्रमणकरणीय ,ब्राह्मणकरणीय , ते स्वीकारून आम्ही आचरु.

१३) मजिझ्म - ह्या भिक्खुला , अरे भिक्खु हो! श्रमण म्हणतात, ब्राह्मण म्हणतात.

चांगल्या अर्थाने गौतमाला ब्राह्मण्याने झपाटलेलं होतं. ( obsessed) आता आजच्या बुद्धिस्टांना हे पटणार आहे काय?

की ह्यालाही बामणी कावा म्हणूनच तुम्ही ठोकरणार आहात??? स्वत:च्या सोयीनुसार??? 

हे वाचल्यावर बुद्ध हा मनुपेक्षा ब्राह्नणवादी जास्ती आहे हे का लक्षात येत नाही लोकांच्या???


सातव्या आक्षेपाचं खंडण

बुद्धाने यज्ञातील पशुहिॅसेस विरोध केला व यज्ञ बंद पाडले असा एक खोटा सिद्धांत मांडला जातो, जो थोतांड आहे. कारण वर आपण पाहिलेच आहे की बुद्ध हा यज्ञसंस्थेचा किती स्तुतीपाठक होता. जो वेदांना मानतो तो यज्ञाला मानणार हे जगजाहीर आहे. 

फक्त प्रश्न आहे यज्ञातील मांसाहाराचा किंवा पशुहत्येचा

त्याबाबतीतही केवळ गृह्यसुत्रांचा संदर्भ देऊन काही लोकांनी गोहत्या वेदप्रणीतच आहे असा सोयीचा निष्कर्ष काढला आहे व तोच मुळात तर्कहीन व आधारहीन आहे. खरंतर ह्यावर आम्ही स्वतंत्रपणे ग्रंथनिर्मिती करतच आहोत व त्यात ह्याबद्दल पूर्ण भूमिका मांडूच. तूर्तास तरी एक सांगणं आवश्यक आहे की जर बुद्ध हा मांसांच्या विरोधात होता तर मग तो स्वत: मांस खात होता हे का? त्याचा मृत्यु डुकराच्या मांसखाल्याने झाला असा एक प्रचार आहे व अनेक बौद्ध इतिहासकार हे मानतात पण हे व्यक्तिश: मला पटत नाही. त्यावर मी स्वतंत्रपणे कधीतरी लिहीनच. पण तूर्तास तरी हे सांगु इच्छितो की त्याकाळी वेदांना न जाणणार्या वामपंथी लोकांनी कदाचित यज्ञात प्राणीहत्या सुरु केलीही असेल व बुद्धाने ती बंद केली असेल. पण म्हणुन तो यज्ञद्वेष्टा होता हे मात्र चुकीचं आहे हे वेगळं सांगायला नको.



आठव्या आक्षेपाचं खंडण

बुद्धाने सर्वांस समान अधिकार दिले व ब्राह्नणशाही नष्ट केली हा आक्षेप किती तथ्यहीन आहे ते पाहु. एकतर बुद्ध हा वंशश्रेष्ठत्व राखतो त्यामुळे तो समरसता आणतो व सर्वांना समान लेखतो ही गोष्टच चुकीची आहे. दुसरं असं की त्याने सर्वांना समान अधिकार दिले हेही खोटं आहे कारण ते अधिकार हिॅदुधर्मात सर्वांना आधीपासूनच होते. मुळात हा अधिकारवादच नंतरच्या काळात निर्माण झालाय. जर तसं नसतं तर मग बुद्धाने उच्यकुळातच जन्म घेणं का पसंत केलं असतं??? 
जर सर्व समान आहेत, हे बुद्धाचे मत असतं तर मग हे का घडतं??


मुळात वैदिक धर्म हा समता प्रणितच आहे

ज्यांनी वेदांचा सखोल अभ्यास केला असेल त्यांना हे माहिती असेल की वेदांतले अनेक ऋषी हे ब्राह्नण नाहीयेत. कारण जन्माने मनुष्य शुद्र म्हणजे संस्कारहीन असून तो कर्मामे ब्राह्मण बनतो हा वेदप्रणित हिॅदुधर्माचा अकाट्य सिद्धांत आहे. हाँ ही गोष्ट खरी की लोकांनी हे विसरून जाऊन नंतरच्या काळात जन्माधिष्ठित व्यवस्था निर्माण केली असेल पण त्याचा दोष वेदांना द्यायचा संबंधच कुठे येतो??? हा कुठला न्याय??

सगळी उपनिषदे ही क्षत्रियांनी रचलीयेत. काही तर स्त्रियांनी रचली असताना बुद्धाने स्त्रियांवर फार मोठे उपकार केले हा डांगोरा पिटण्यात काय हशील???

मुळात बुद्दाच्या नंतर त्याच्या संघातच किती स्वैराचार माजला हे जिज्ञासुंनी अभ्यासावे व खरेतर ते जगजाहीर आहे. तरीही लोक हे हेतुपुरस्सर विसरून वैदिक हिॅदु धर्माला शिव्या घालतात व बुद्धाला फार मोठा समाजसुधारक मानतात व बंडखोर मानतात, हे अज्ञानाचेच लक्षण नव्हे काय???



पाश्चिमात्यांनी केलेली इतिहासमीमांसा

फोडा आणि राज्य करा ह्या नीतीचा अवलंब करून पाश्चिमात्यांनी हेतुपुरस्सर इतिहासाची मीमांसा करताना
buddhism and Brahminism 
किंवा 
buddhism and Hinduism 
किंवा 
Hinduism and Brahminism असा हेतुपुरस्सर बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला जो किती चुकीचा होता हे माझ्या वरील समग्र विवेचनावरून लक्षात येईल. तेंव्हा एतद्देशीयांनी तर ह्या असल्या भूलथापांना बळी पडून आपला घात करून घेऊ नये व बुद्धाला विनाकारण वेगळा समजू नये.

आता महत्वाची शंका व त्याचं उत्तर

जर हे सर्व खरं असेल तर कुमारील भट्ट व आदि शंकराचार्यांसारख्यांनी आपलं अख्खं आयुष्य ह्या बौद्ध व जैन मत खंडणासाठी व वैदिक धर्म पुनर्संस्थापनेसाठी का खर्चिलं???

ह्याचं उत्तर

बुद्धाच्या नंतरच्या काळात त्यांच्या अनुयायांनी बुद्धाच्या संदेशाचा चुकीचाच प्रचार केला. जो आजही केला जातो हे वरील माझ्या सविस्तर विवेचनावरून लक्षात येईल. त्यामुळे मुळचा बौद्ध पंथ जो वैदिकच होता, त्याला अनुयायांनी अकारण वैदिकद्वेष्टा बनविलं व त्यानंतर हिॅदुस्थानात वेदद्वेष सुरु झाला. व खोट्या बौद्धमतांचं प्रसार व्हायला लागला. त्यामुळेच ह्या खोट्या बौद्धमताचे खंडण करण्यासाठीच कुमारील भट्ट व आदि शंकराचार्यांनी जीवाचं रान केलं हा इतिहास आहे. आणि त्यामुळेच खोटं बौद्ध नष्ट करून खर्या बुद्धमताचा प्रचार त्यांनी केला म्हणूनच की काय शंकराचार्यांना "प्रच्छन्न बुद्ध" ही संज्ञा प्राप्त झाली.
आणि त्यातही शंकराचार्यांच्या वेळी हिॅदुस्थानात नक्की बौद्ध मत किती अस्तित्वात होतं हाही एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. इतिहासभूषण श्रीपाद दत्तात्रय कुलकर्णींनी हा विषय स्वतंत्रपणे मांडलाय जिज्ञासूंनी तो अभ्यासावा. 

नवव्या आक्षेपाचं खंडण

बुद्ध डुकराचे मांस खाऊन मेले नाहीतच हे माझं स्पष्ट मत आहे.

खरंतर हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे कारण ह्यात अनेक संस्कृत विषयांचा अभ्यास असल्याने मी स्वतंत्रपणे केंव्हातरी माझी भूमिका मांडेनच. तूर्तास तरी एवढंच सांगु इच्छितो की वैदिक संस्कृत व आताची लौकिक संस्कृत ह्यात फरक आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. तो न कळल्यामुळेच बुद्धाच्या मृत्युचा संबंध "सूकरं मद्दवं खादयित्वा" ह्यातल्या सूकरं मद्दवं ह्या शब्दावरून डुकरांचं मांस असा सोयीस्कर अर्थ लोक काढतात जो चुकीचा आहे असं माझं स्पष्ट मत आहे. ह्यावर मी स्वतंत्र पणे कधीतरी लिहीन. माझ्याकडे पुरावे आहेत. तूर्तास तरी मला बुद्धावरचा हा आरोप मान्य नाहीये.

हिॅदुमहासभेने केलेला अलौकिक प्रयोग

१९३५ साली हिॅदुमहासभेने बौद्ध भिक्षु उत्तमा ह्यांना हिंदुसभेचे अध्यक्ष केलं होतं हे अनेकांना माहितीही नसेल. बौद्ध भिक्षु उत्तमा हे अभ्यासु वृत्तीचे व नामांकित बौद्ध होते व त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात स्पष्टपणे हिॅदु व बौद्ध एकच आहेत ठासून सांगितलं होतं. जिज्ञासूंनी हिॅदुमहासभेचा इतिहास वाचावा. असो. पुढे अनेक वर्षे ते हिॅदु सभेचे उपाध्यक्षही होते. पुढे जाऊन त्यांनी ब्रह्मदेशाच्या निर्मितीला कडाडून विरोध केला होता. ते वाचावं ही विनंती आहे.

आता हा सर्व लेखनप्रपंच कशासाठी??? हा अट्टाहास कशासाठी???

हिॅदुस्थानातले नवबौद्ध हे अकारण स्वत:ला हिॅदुद्वेष्टा बनवितात किंवा बनविले जातात. कारण त्यांचा ह्या विषयांतला अभ्यास कमी असल्याने व त्यांच्या मनावर गोबेल्स तंत्राने पकड घेतल्याने ते हिॅदुद्वेषी ठरतात व हे थांबावं हाच उद्देश्य आहे म्हणूनच हा प्रामाणिक लेखनप्रपंच ! 


नवबौद्धांनी स्वत:ला वेगळं न समजता आपण हिॅदुच आहोत हे ठरवून ह्या हिंदुराष्ट्राच्या निर्मितीस आपलं योगदान द्यावं हीच विनंती ! 

आजच्या बुद्धपौर्णिमेनिमित्त त्या महात्म्यास माझे विनम्र प्रणाम व आदरांजली !!!

©तुकाराम चिंचणीकर