भक्तशिरोमणी, भक्ताग्रणी, नामयोगाचा मेरु, नामचिंतामणी, प्रल्हाद-अंगद-उद्धवाचा पुनर्जन्म, श्रीविठ्ठलाचे प्रेमभांडारी संतश्रेष्ठ श्रीनामदेवराय ६७२ वा संजीवन समाधी सोहळा...!
आषाढ वद्य त्रयोदशींस आजच्यांच तिथींस ६७२ वर्षांपूर्वी श्रीनामदेवरायांसंहित त्यांच्या घरातल्या १५ जणांनी जिवंत समाधी घ्यावी...! संत श्रीजनाबाईही त्यांत होत्या. म्हणजे इतिहासांत श्रीभीष्माचार्यांस त्यांच्या आजीवन अखंड ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेने नि पित्याविषयीच्या निष्ठेने पित्याने त्यांस इच्छामृत्युचं वरदान दिलं होते. त्यापश्चात् प्रत्यक्ष कैवल्यचक्रवर्ती संतसम्राट श्रीज्ञानोबारायांनीही संजीवन समाधी घेऊन जगाचें डोळे दिपविले...! त्याच श्रीज्ञानोबारायांना संजीवन समाधींस घेऊन जाणारे आमचे भक्तशिरोमणी श्रीनामदेवराय त्यांच्याच कुटुंबासहित आमच्या पंढरीत त्या परमात्मा पंढरीशाच्या समोरंच समाधी घेतात...!
शारीरिक व्याधींनी गांजलेले लोक अगदी मरणासन्न असताना मृत्युच्या त्या असह्य वेदना सहन न होऊन अंतिमत: मृत्यु यावा व ह्यातून सुटका तरी व्हावी म्हणून काहीवेळा तळमळताना दिसतात पण तरीही भोग भोगायचे म्हणून त्यांना मृत्यु येत नाही नि त्यांची वेदना तशीच राहते. चांगल्या स्थितींत मृत्यु येणं तर भाग्यवंताचंच लक्षण...!
पण या एकाच कुटुंबातल्या १६ जणांनी एकाचवेळी देहत्याग करावा. श्रीनामदेवरायांचा अधिकार जगाला माहिती आहेच पण कुटुंबांतलेही..? ते इतर १४ जण कोण ह्याची सूची जोडली आहे ती पहावी...!
ते 'संतांचे ते आप्त नव्हे ते संत' हे संतवचन इथेच खोटं ठरावं ह्यापेक्षा आश्चर्य काय? खरंतर संतवचनं कधी खोटी ठरत नाहीत पण अपवाद असे...!
इच्छामृत्युचं वरदान यापेक्षा काय भिन्न असावं?मृत्युवर विजय ह्यापेक्षा वेगळा काय असावा? संतांचा अधिकार ह्यापेक्षा वेगळा काय प्रत्ययांस यावा???
आणि त्यांनी हे सर्व साध्य केलं ते केवळ अनन्यशरण भक्तीच्या सामर्थ्यावर, नामचिंतनाच्या बलावर...!
म्हणूनंच श्रीपरिसा भागवत म्हणतात
कलियुगीं नामा संत साकार, न कळें तो पार ब्रह्मादिक|
श्रीनामदेवराय नि त्यांच्या कुटुबीयांच्या चरणी कोटी प्रणाम...! आमचं भाग्य इतकंच की आमचं घर श्रीनामदेवरायांच्या मंदिरांस चिकटून...!
पुनरपि जननं पुनरपि मरणं श्रीमन्नामदेवरायमन्दिरसमीपे निवासं| 🙏😇
श्रीनामदेव पायरीचे आजचे छायाचित्र साभार - आमचे बंधु श्री Mahesh Kale
भवदीय...
#श्रीनामदेव_संजीवनसमाधी_सोहळा_नामदेवपायरी_पंढरपूर
विनम्र नमस्कार..
ReplyDeleteभक्त शिरोमणी संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या सोबत त्याच दिवशी त्यांच्या कुटुंबातील अन्य किती जणांनी संजीवन समाधी घेतली याच्या सूचीचा आपण वर उल्लेख केला आहे. ती सूची नावसहित संविस्तर कुठे वाचावयास मिळेल..?
कृपया आपण ही सूची प्रसारित करावी ही विनंती.