Monday, 6 February 2017

धर्मवीर छत्रपती श्रीशंभुराजे व त्यांची हत्या - आक्षेप नि खंडण



"इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे. इतिहासाचे घोर अज्ञान हा एक अपराध आहे आणि इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे."
प्राचार्य शिवाजीराव भोसले

सध्या महाराष्ट्रात जातीय अस्मिता जन्मांस घालून त्यांस खतपाणी घालण्याचे काम हेतुपुरस्सर केलं जातंय. त्यासाठी इतिहासाचं विकृतीकरण करून हे काम सोप्या पद्धतीने करण्याचा एक बालिश प्रयत्न सुरु आहे. आपल्या समाजाची जी श्रद्धास्थाने असतात त्यांविषयी मनांत संभ्रम निर्माण करणे हा देखील त्यातलाच एक प्रकार ! असंच एक उदाहरण म्हणजे धर्मवीर छत्रपती श्रीशंभुराजे व त्यांची फाल्गुन वद्य अमावस्येला औरंगजेबाने केलेली निर्घृण हत्या, जिचा संबंध अकारण गुढीपाडव्यासारख्या मंगलमय सणाशी जोडला जाऊन समाजात बुद्धिभेद करण्याचा व जातीवाद पसरविण्याचा प्रयत्न केला जातोय ! त्यास आम्ही दिलेले हे प्रत्युत्तर !!!

मुख्य आक्षेप व आरोप

म्हणे शंभुराजेंची हत्या ही मनुस्मृतीनुसार ब्राह्मणांनी फाल्गुन वद्य अमावस्येला केली किॅवा ती औरंग्यास करायला सांगितली व त्याचदिवशी त्यांचं शीर हे ब्राह्नणांनी नाचविलं व त्याच्या दुसर्या दिवसापासून ब्राह्मणांनी तो चैत्र पाडव्याचा दिवस विजयोत्सव म्हणून साजरा केला व आनंदाप्रीत्यर्थ शंभुराजेंच्या शीराचे प्रतीक म्हणून गुढ्या उभारल्या व तेंव्हापासून महाराष्ट्रात गुढी पाडवा सुरु झाला. थोडक्यात आजची गुढी उभारायची पद्धत व प्रथा हा शंभुराजेंच्या हत्येशी संबंधित आहे असं ह्या आक्षेपकांचं म्हणणं आहे.

किती नालायकपणाचा कळस आहे पहा ! खरंतर ह्या आरोपांत तथ्य काहीच नसून केवळ निराधार असे हेतुपुरस्सर व तर्कदुष्टपणाने केलेली बालिश विधाने आहेत ! असो !!!

आता गुढी पाडव्याचा इतिहास पाहुयात

गुढी उभारल्याचा उल्लेख आपणांस रामायणात मिळतो हे सर्वश्रुत आहेच. त्यामुळे त्याची प्राचीनता आपल्या लक्षात येते.

गुढी शब्दाचा अर्थ

काठी पूजा

काठी पूजा आणि देवक-स्तंभ परंपरा मानवी इतिहासातील प्राचीनतम परंपरांपैकी आहेत. तेलगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ 'लाकूड अथवा काठी' असा आहे तसाच तो 'तोरण' असाही आहे. दाते, कर्वे लिखित 'महाराष्ट्र शब्दकोशा'चा तृतीय खंडाचा पृष्ठ क्रमांक ९९८ चा आधार घेतला तर "गुढ्या घालुनया वनीं राहूं , म्हणा त्यातें - प्रला १९" असे उदाहरण येते. यातील गुढ्या या शब्दाचा अभिप्रेत अर्थ त्या शब्दकोशाने खोपटी ; झोंपडी ; अथवा पाल (रहाण्याची जागा) असा दिला आहे. हिंदीत कुडी या शब्दाचा एक अर्थ लाकूड उभे करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो. इथे चा (अथवा चा ) होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेता येते. तरीही राहण्याची जागा या अर्थाने 'गुडी' हा शब्द येऊन दक्षिणेतली (आंध्र, कर्नाटक, तामीळनाडू) खासकरून आंध्रातील स्थलनामांची (गावांच्या नावांची) संख्या अभ्यासली असता (संदर्भ सेंसस ऑफ इंडिया - गाव नावांची यादी), लाकूड या अर्थाने तेलगूतील गुढी या शब्दाचा अधिक वापर आणि जुन्या मराठीतील लाकूड बांबू/काठी ने बनवलेले घर, हे पाहता हा शब्द महाराष्ट्र आणि आंध्र या प्रदेशात गुढी शब्दाचा प्रचार अधिक असावा. शालिवाहनपूर्व काळात कदाचित गुढीचा लाकूड बांबू/काठी हा अर्थ महाराष्ट्रीयांच्या शब्द संग्रहातून मागे पडला असावा पण आंध्रशी घनिष्ट संबंध असलेल्या शालिवाहन राजघराण्याच्या लाकूड बांबू/काठी या अर्थाने तो वापरात राहिला असण्याची शक्यता असू शकते.

शिशुपाल वधामध्ये गुढीचा उल्लेख सापडतो तो असा

तैवे आत्मा उभितावे गुढी ! रोमांचमिषे !

गुढी का शब्द कौल देणे ह्या अर्थाने पण आहे. जसे देवाला काही प्रश्न विचारायचे झाल्यांस कौल मागणे त्यावेळी गुढी उजवी दिली की डावी दिली असाही संदर्भ आहे.

महाराष्ट्रीय गुढीचे लिखित साहित्यिक संदर्भ

. . १२७८च्या आसपास पंडित म्हाइंभट सराळेकर रचित लीळाचरित्रात, लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये ".... तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली : उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले :... " असा उल्लेख येतो. संत ज्ञानेश्वरांच्या (..१२७५१२९६) ज्ञानेश्वरीत अध्याय , आणि १४ मध्ये "अधर्माचि अवधी तोडीं दोषांचीं लिहिलीं फाडीं सज्जनांकरवी गुढी सुखाची उभवीं ५० " ; "ऐकें संन्यासी आणि योगी ऐसी एक्यवाक्यतेची जगीं गुढी उभविली अनेगीं शास्त्रांतरी ५२ "; "माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगें गुढी येरु जीवीं म्हणे सांडीं गोठी यिया ४१० " असे उल्लेख येतात. संत नामदेव (.. १२७० - जुलै , .. १३५०) संत जनाबाई (निर्वाण .. १३५०) आणि त्यांचेच समकालीन संत चोखामेळा (चोखोबा) (जन्म अज्ञात वर्ष - .. १३३८) यां सर्वांच्या लेखनांत, गुढीचे उल्लेख येतात. संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात "टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट हे चालावी पंढरीची ॥१॥" १६व्या शतकातील संत एकनाथांच्या (१५३३१५९९) धार्मीक काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ हर्षाची उभवी गुडी, ज्ञातेपणाची ,भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रुपके वापरताना आढळतात. संत एकनाथांना या गुढ्यांची अनुभूती त्यांच्या रोमांचात होते, कीर्तनीं होते, ते गुढी तिन्ही लोकीं, वैकुंठीं, उभारण्याचेही उल्लेख करतात पण मुख्य म्हणजे रणांगणी उभारली जाण्याचाही उल्लेख करतात. आणि संत एकनाथांच्या लेखनातील गुढी रणांगणी वापरली जात असल्याचा उल्लेख महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रीय शब्दकोश अभ्यासल्यास गुढी उजवी देणें [ गुढी=कौल] म्हणजे विनंती मान्य करणें, संमती देणें, मान्यता देणें आणि गुढी डावी देणें म्हणजे विनंती अमान्य करणें, नापसंत करणें, नाही म्हणणें. असे संकेत शालिवाहन आणि त्यानंतरच्या रणांगणात महाराष्ट्रीयन सैन्याने वापरले असल्यासते तत्कालीन युद्धाच्या व्यूहातील महत्त्वाचे, कदाचित निर्णायक संदेश साधन (कम्यूनिकेशन टूल) असावे. या उपलब्ध संदर्भांचा अभ्यास केल्यानंतर, या गुढीचे अजून एक वैशिष्ट्य दिसून येते. वारी असो अथवा रणांगण असो जाणार्या समूहांतील एखादा चपळ माणूस पाहून त्याकडे ही गुढीची काठी दिली जात असे.

जगद्गुरु तुकोबारायही त्यांच्या अभंगांच्या गाथेत गुढीचे उल्लेख करतात.

तुकारामांची गाथा
अभंग क्र. ३५८३
पाठवाल तेथें गर्जेन पवाडे कायाअ देहाकडे नावलोकीं॥1
ह्मणउनि मागें कंठींचा सौरस पावतील नास विघ्नें पुढें ॥ध्रु.
कृपेच्या कटाक्षें निभें किळकाळा येतां येत बळाशीपुढें ॥२॥ तुका ह्मणे गुढी आणीन पायांपें जगा होइल सोपें नाम तुझें 3
अभंग क्र. ४५२९
आस निरसली गोविंदाचे भेटी संवसारा तुटी पुढिलिया ॥१॥
पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥
हाका आरोिळया देउनि नाचती एक सादाविती हरि आले ॥३॥
आरंधीं पडिलीं होतीं तयां घरीं संकीर्ण त्या नारी नरलोक ॥४॥
लोका भूक तान नाहीं निद्रा डोळा रूप वेळोवेळां आठविती ॥५॥
आहाकटा मग करिती गेलिया आधीं ठावा तयां नाहीं कोणा ॥६॥
आधीं चुकी मग घडे आठवण तुका ह्मणे जन परिचयें ॥७॥

संत नामदेवरायांचे गुढीचे अभंग

श्रीराममाहात्म्य - रामजन्म :
फोडा फोडारे भांडारें आणवा गाईचीं खिल्लारें ॥५॥
उभवा उभवारे गुढी सोडा वस्रांचीं गाठोडीं ॥६॥
झाडोनियां टाका खडे घाला केशराचे सडे ॥७॥
नामा ह्मणे भूमंडळा स्वामि माझा पहा डोळा ॥८॥

संत जनाबाईंचे गुढीचे अभंग
संत जनाबाई (निर्वाण:.. १३५०)

ऋषि अभिषेकिती रायाला थोर मनीं आनंदाला ॥७॥
राया प्राप्ती जाला पट गुडी उभवी वसिष् ॥८॥ येथुनी हरिश्चंद्र आख्यान नामयाची जनी म्हण ॥९॥

आणखीही अनेक संतांचे अनेक उल्लेख देता येतील पण विस्तारभयास्तव देत नाही. थोडक्यात संतवांग्मयात हे गुढी उभारल्याचे उल्लेख शंभुराजेंच्या मृत्युच्या शेकडो वर्षे आधीचे आहेत हे स्पष्ट असल्याने गुढी ब्राह्णणांनी शंभुराजेंना मारल्यानंतर उभारली हा आरोप किती तथ्यहीन आहे हे कळते.



दुसर्या आक्षेपाचं खंडण

शंभुराजेंची हत्या मनुस्मृतीनुसार ब्राह्मणांनी केली आहे काय ???

उत्तर - धादांत खोटं!

 तुमच्या पढतमूर्खतेची कीव वाटते.
खरंतर मनुस्मृतीचं अध्ययन हा वेगळा विषय असल्याने प्रस्तुत लेखाविषयासंदर्भात एकच सांगु इच्छितो की, शंभुराजेंनी स्वत: त्यांच्या बुधभूषणम् ग्रंथांमध्ये मनस्मृतीतले बावीस श्लोक आहे तसे घेतलेले आहेत, म्हणजे आजच्या भाषेत काॅपी केले आहेत. आहे तसे !!!

ह्याच मनुस्मृतीतले बावीस श्लोक नक्की कोणते हे अभ्यासण्यासाठी जिज्ञासुंसाठी खालील माहिती उपयुक्त ठरेल.

बुधभूषणमच्या दुसर्या अध्यायात शंभुराजेंनी मनुस्मृतीतले खालील श्लोक आहे तसे घेतलेले आहेत. ह्यात प्रथम बुधभूषणममधले श्लोक व नंतर त्याची मनुस्मृतीतली अध्याय व श्लोक संख्या असा माहितीपूर्ण संदर्भ दिला आहे.

श्लोक क्रमांक         मनुस्मृती अध्याय व श्लोक क्रमांक

४१-४२                        ७(६१-६२)
५६९                           ७(८९)
६२८                           ७(१११)
६३०                           ७(११५)
४६५                           ८(३१०)
४६६-४६७                    ८(१२४-१२५)
४६८                            ८(३७९)
४७९                            ८(३३५)
४८३-४८५                      ७(३-५)
२२२                              ७(११६)
२४४-२४७                      ७(१५१-१५४)
२४३                              ७(१४७)
१११                              ७(७४)
११४                              ७(७०)
११७                              ७(७६)


थोडक्यात हे वरील बावीस श्लोक स्वत: शंभुराजेनी स्वत: मनुस्मृतीतून आपल्या बुधभूषणम ग्रंथात आहे तसे घेतले आहेत, हे दोन्ही ग्रंथांची तुलना केल्यावर आपल्या सहज लक्षात येते.
जिज्ञासूंनी अधिक अभ्यासासाठी ह्या दोन्ही ग्रंथांच्या मुळ संस्कृत संहितेचं तुलनात्मक अध्ययन करावे किॅवा डाॅ. गोविॅदराव कदम लिखित बुधभूषणम् भाष्य अभ्यासावे किॅवा डाॅ. वेलणकरांनी संपादित केलेली बुधभूषणम् ची पहिली आवृत्ती अभ्यासावी म्हणजे आमच्या पुराव्यांचा संदर्भ लक्षात येईल. वस्तुत: आम्ही स्वत: दोन्ही ग्रंथ मुळातून अभ्यासले आहेतच हेही सूज्ञांस सांगणे न लगे !


आता मनुस्मृतीनुसार हत्या केलीय काय????

असा आरोप करणारे एकही जण त्यातल्या एकाही श्लोकाचा साधा पुसटसा संदर्भही देत नाहीत. जो काही तथ्यहीन आरोप लावला जातो तो असा की ब्राह्मणेतरांना संस्कृतचा अधिकार नसल्यामुळे व शंभुराजेंनी संस्कृतमधूनच ग्रंथरचना केल्यामुळे ब्राह्नणांनी त्यांची मनुस्मृतीनुसार हत्या केली.
वस्तुत हे धादांत खोटं आहे खालील पुराव्यावरून कळेल.

गागाभट्टांनी आपला संस्कृत ग्रंथ शंभुराजेंनाच अर्पण केलाय

गागाभट्टांनी शके १६०२ म्हणजे इ. स. १६८० साली त्यांचा "समयनय" हा ज्योतिषशास्त्रपर व धर्मशास्त्रपर ग्रंथ साक्षात् श्रीशंभुराजेंनाच अर्पण केलाय. त्यात ते लिहितात

दिनकरतनयेन तेन गागाभिधविबूधेन् निरीक्ष्य सन्निबन्धान् !
रघुवरकृपयाsमुना निबद्ध: समयनय: सुखमेतु शंभुराज: !२६७!

"दिनकराचा पुत्र असणार्या बुद्धिमान अशा गागाभट्टांनी इतर ग्रंथांचं अवलोकन करून श्रीरामचंद्राच्या कृपेने समयनय हा ग्रंथ रचला.
त्याने श्रीशंभुराजे आनंदी होवोत !"


पण त्याआधी एक साधा प्रश्न

औरंगजेब कुराणाचे ऐकेल की मनुस्मृतीचे???
तो काय हिॅदु होता का की त्याने ब्राह्मणांचे ऐकुन शंभुराजेंची हत्या करावी???
जो औरंग्या कट्टर सून्नी मुसलमान होता, ज्याने आपल्या सख्ख्या भावांना व बापालाही मारलं, तो ब्राह्मणांचे कशावरून ऐकेल???
उलट ब्राह्मण हे तर त्याचे एक नंबरचे शत्रु कारण ते हिॅदु! मग तो त्यांचं कसं काय ऐकेल???

पण आक्षेपकांना केवळ विषच पसरवायचं आहे, त्यामुळे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं हे तंत्र आहे !!! असो !!!

शंभुराजेंची हत्या ही कुराणानुसारच झाली आहे. हे घ्या पुरावे !

ज्यांनी आयुष्यात एकदा तरी कुराणाचा अभ्यास केला असेल, त्यांना कुराणात काफीरांसाठी अर्थात हिॅदुंसाठी काय शिक्षा आहेत हे लक्षात येईल तरीही जिज्ञासुंसाठी आम्ही खालील संदर्भ देतो !


औरंगजेबाने भीमा कोरेगावच्या छावणीमध्ये त्यांना हाल हाल करून ठार मारले. संभाजीराजांचा प्राण गेल्यावरही मुसलमान सरदारांनी त्यांचा देह छिन्नविच्छिन्न करून विटंबना केली व आपली इस्लामी क्रूरता दाखवली आणि ही क्रूरता दाखविण्याचे मूळ मनुस्मृतीमध्ये नव्हे तर कुराणामध्ये दडलेले आहे. कारगिलच्या युद्धानंतर आपल्या भारतीय सैन्याची विटंबना पाकड्यांनी कशी करून पाठविली होती, हे सर्वांस माहिती आहे.

शेवटी औरंगजेब हा सतत कुराणाचे पठण करणारा कट्टर मुसलमान होता. संभाजीराजांची हत्या ही कुराणाच्या खालील आज्ञांप्रमाणे झाली.

१)
ﻭَﻗَﺎﺗِﻠُﻮﻫُﻢْ ﺣَﺘَّﻰٰ ﻟَﺎ ﺗَﻜُﻮﻥَ ﻓِﺘْﻨَﺔٌ ﻭَﻳَﻜُﻮﻥَ
ﺍﻟﺪِّﻳﻦُ ﻟِﻠَّﻪِ ۖ ﻓَﺈِﻥِ ﺍﻧْﺘَﻬَﻮْﺍ ﻓَﻠَﺎ ﻋُﺪْﻭَﺍﻥَ ﺇِﻟَّﺎ ﻋَﻠَﻰ
ﺍﻟﻈَّﺎﻟِﻤِﻴﻦ
َ
Fight against them until there is no
more disorder and Allah's supremacy is established. If they
desist, let there be no hostility except against the oppressors.

उनके खिलाफ (गैर मुस्लीम, मूर्तिपूजक, हिंदू) तब तक लडते रहो जब तक मूर्तीपूजा खत्म न हो जाये और अल्लाह का मजहब सबपर हावी न हो जाये|
(सुरा २, अल -बकरा, आयात १९३)

२)
ﻓَﺈِﺫَﺍ ﺍﻧْﺴَﻠَﺦَ ﺍﻟْﺄَﺷْﻬُﺮُ ﺍﻟْﺤُﺮُﻡُ ﻓَﺎﻗْﺘُﻠُﻮﺍ ﺍﻟْﻤُﺸْﺮِﻛِﻴﻦَ ﺣَﻴْﺚُ ﻭَﺟَﺪْﺗُﻤُﻮﻫُﻢْ ﻭَﺧُﺬُﻭﻫُﻢْ
ﻭَﺍﺣْﺼُﺮُﻭﻫُﻢْ ﻭَﺍﻗْﻌُﺪُﻭﺍ ﻟَﻬُﻢْ ﻛُﻞَّ ﻣَﺮْﺻَﺪٍ ۚ ﻓَﺈِﻥْ ﺗَﺎﺑُﻮﺍ ﻭَﺃَﻗَﺎﻣُﻮﺍ ﺍﻟﺼَّﻠَﺎﺓَ ﻭَﺁﺗَﻮُﺍ ﺍﻟﺰَّﻛَﺎﺓَ ﻓَﺨَﻠُّﻮﺍ ﺳَﺒِﻴﻠَﻬُﻢْ ۚ ﺇِﻥَّ ﺍﻟﻠَّﻪَ ﻏَﻔُﻮﺭٌ ﺭَﺣِﻴﻢ
ٌ
Then, when the sacred months have
passed, slay the idolaters wherever
ye find them, and take them (captive), and besiege them, and
prepare for them each ambush. But if they repent and establish
worship and pay the poor due, then
leave their way free. Lo! Allah is Forgiving, Merciful.

पवित्र महिनो के खत्म होने के बाद मुर्तीपुजको को जहां कही वे मिले कत्ल करो, उन्हे
गिरफ्तार करो, उनकी घेराबंदी करो|
(सुरा ९, अल-तौबा, आयात ५)

३)
ﻭَﺇِﻥْ ﻧَﻜَﺜُﻮﺍ ﺃَﻳْﻤَﺎﻧَﻬُﻢْ ﻣِﻦْ ﺑَﻌْﺪِ ﻋَﻬْﺪِﻫِﻢْ
ﻭَﻃَﻌَﻨُﻮﺍ ﻓِﻲ ﺩِﻳﻨِﻜُﻢْ ﻓَﻘَﺎﺗِﻠُﻮﺍ ﺃَﺋِﻤَّﺔَ ﺍﻟْﻜُﻔْﺮِ ۙ
ﺇِﻧَّﻬُﻢْ ﻟَﺎ ﺃَﻳْﻤَﺎﻥَ ﻟَﻬُﻢْ ﻟَﻌَﻠَّﻬُﻢْ ﻳَﻨْﺘَﻬُﻮﻥ
َ
And if they break their pledges after their treaty (hath been made
with you) and assail your religion, then fight the heads of disbelief Lo!
they have no binding oaths in order
that they may desist.

उनका (मुर्तीपुजको) अंग काटो, सर धड से अलग कर दो! याह हत्याकांड तब तक चलना चाहिये, जब तक अंतिम काफिर खत्म न हो जाये|
(सुरा ९, अल-तौबा, आयात १२)

Surah 8: ayat 12
I shall cast terror into the hearts of the infidels.  Strike off their heads, maim them in every limb

मी श्रद्धाहीनांमध्ये (काफीरांमध्ये) दहशत पैदा करेन व त्यांचे शीर कलम करेन व त्यांचे सर्व अवयव पंगु करेन !
1.
2. 
Surah 69: ayats 30-33
We shall say, Lay hold of him and bind him.  Bum him in the fire of Hell, then fasten him with a chain seventy cubits long.  For he did not believe in Allah, the Most High.

3.
4. 
आम्ही तर त्यांना (श्रद्धाहीनांना) पकडायला सांगतो व बांधायला सांगतो ! त्यांना नरकाग्नीत जळूद्या, नंतर त्यांना सत्तर घनफुट लांब अशा साखळीने बांधून टाकू ! कारण त्यांनी आल्लाह, जो सर्वोत्तम आहे, त्याच्याशी द्रोह केला !

5. 
असे अनेक पुरावे कुराणातले देता येतील.

6. 
वरील आयतींत शीर कलम करा व अवयव पंगु करा अशी स्पष्ट आज्ञा आहे. तेंव्हा हत्या ही कुराणानुसारच हे स्पष्ट आहे.

7.
8. 
आता तत्कालीन मुसलमानी संदर्भ काय म्हणताहेत ते पाहुयात !


ह्या तत्कालीन संदर्भात आम्ही औरंग्याचे म्हणजेच त्याच्या तत्कालीन मुसलमान सरदारांचेच व इतिहासकारांचेच संदर्भ देणार आहोत.
ह्यात काही हिॅदु इतिहासकारांचाही संदर्भ देणार आहोत.

१. मासिर इ आलमगिरी - लेखक साकी मुस्तैदखान!  हा मोंगलाच्या सेवेत मुश्रीफ अर्थात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होता. त्याने ह्या ग्रंथात शंभुराजेंची कैद, धिॅड, हत्या ह्या गोष्टी सविस्तर लिहिल्या आहेत, ज्या पुराव्याच्या दृष्टीने अतिशय अभ्यसनीय आहेत. मुळ फार्सी ग्रंथांचा आंग्ल अनुवाद जदुनाथ सरकार व मराठी अनुवाद ग ह खरेंनी व सेतुमाधवराव पगडींनी ह्याचा अनुवाद "औरंगजेब व मराठे" ह्या ग्रंथात मराठीत केला आहे.


२. ऐतिहासिक फारसी साहित्य खंड सहावा - औरंग्याच्या राज्यकारभाराची पत्रे जी मराठीत महाराष्ट्र राज्य साहित्य नि सांस्कृतिक महामंडळाने "मोंगल दरबारची बातमीपत्रे" म्हणुन प्रसिद्ध केली आहेत.

३. फतुआते आलमगिरी - मुळ फार्सी ईश्वरदास नागर नावाच्या लेखकाने केलेला ग्रंथ. मराठी अनुवाद सेतुमाधवराव पगडी !

३. तारीखे दिलकुशा - इ स १६८५ ते १७०९ ह्या काळातील घटनांच्या आठवणी भीमसेन सक्सेना नावाच्या मोंगल सरदाराने लिहिलेला ग्रंथ. मराठी अनुवाद सेतुमाधवराव पगडी !

४. मुन्तखबुललएबाबए महंमदशाही  - मुळ फार्सी लेखक खाफीखान मराठी अनुवाद सेतुमाधवराव पगडी मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध ह्या ग्रंथात

हे सगळे मोंगल व फार्सी ग्रंथच आहेत ह्याच्या अनुसारच आपण आता शंभुराजेंची कैद व त्यांची धिॅड व त्यांचे अनन्वित हाल व शेवटी मृत्यु हे सर्व अभ्यासणार आहोत.

शंभुराजेंची कैद

मुकर्रबखानाने संगमेश्वरी शंभुराजेंस व कवी कलशांस पकडिले दिनांक ३ फेब्रुवारी, १६८९ !

मातबरखानाचे पत्र फेब्रुवारी, १६८९
"आल्लाहच्या कृपेने त्या मुकर्रबखानाने संगमेश्वरांस पोहोचून दुष्ट संभाजीस जिवंत पकडले आहे"

इथे दुष्ट हा शब्द त्यांचा म्हणजे मातबरखानाचा आहे, माझा नाहीये!

जेधे शकावलीतीली नोंद - विभव नाम संवछरे शके १६१० माघ वद्य ७ शुक्रवारी

बादशहांस बातमी

औरंग्या त्यावेळी अकलुज येथे होता. त्याला ती बातमी कळताच त्याने आपला मुक्काम हलवण्याची व कैद्यांना बहादुरगडावर आणायची आज्ञा केली. १५ फेब्रुवारी, १६८९ ला औरंग्या अकलुजहून बहादुरगडास पोहोचला.

बादशहाच्या आज्ञेप्रमाणे शंभूराजांना बहादूरगड येथे आणण्यात आले. शंभूराजांसोबत कवी कलश आणि इतर अनेकांना अटक करुन साखळदंडाने बांधले होते. हा सर्व लवाजमा १५ फेब्रुवारी १६८९ रोजी औरंगजेबाच्या छावणीत पोहोचला .
शंभूराजांच्या अंगावरील राजवस्त्रे उतरवून त्यांना इराणात गुन्हेगारांच्या अंगावर घालतात, तसा विदुषकी अंगरखा व लाकडी उंच टोपी (तख्ताकुलाह) चढवून इतरांनाही तसाच पोशाख चढवून सर्वाँची धिँड छावणीच्या परिसरात ११ मैलपर्यँत काढण्यात आली. शंभूराजांना उंटावर उलटे बसविण्यात आले आणि पुढे ढोल, कर्णे वाजवीत, लष्करातून मिरवीत नंतर औरंग्याच्या दरबारात आणण्यात आले.

संदर्भ - मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध अर्थात मासिरे ए आलमगिरी लेखक साकी मुस्तैदखान


शंभुराजेंची अपमानास्पद धिॅड औरंग्याच्या आदेशानुसारच काढलेली होती

शंभुराजेंना आसनरहित अशा उंटावर बसविण्यात आले व दोराने घट्ट बांधले व त्यांच्या तख्ताकुलाहला घुंगरं खुळखुळे बांधण्यात आले व कर्णे, शिॅगे व ढोल वाजवत धिॅड काढण्यात आली.
 छावणीतल्या मुसलमानांना तो दिवस ईदच्या सणासारखा वाटला. शंभूराजांची अशी घोर विटंबना करण्यात आली. वाटेत कुणी उंटाला टोची, कुणी दगड मारी, तर कुणी शंभूराजांना अपशब्द ऐकवीत.

साकी मुस्तैदखान ह्या दृश्यांस मनोरंजन म्हणतो तर खाफीखान विजयसूचक व नगार्यांचा सुचक
म्हणतो.


अखेर दोन्ही कैद्यांना दरबारात आणले गेले .

 त्यांना पाहताच औरंगजेब तख्तावरुन खाली उतरला, अल्लाच्या कृपेनेच हा विजय आपल्याला लाभला या कृतज्ञभावनेने औरंग्याने बिछायतीच्या खाली येऊन जमिनीवर डोके टेकून अल्लाचे आभार मानू लागला .

 'मसिरे ए आलमगिरी'चा लेखक साकी मुस्तैदखान त्यावेळी तिथे उपस्थित होता. हा प्रसंग पाहून त्याने पुढील काव्यपंक्ती औरंग्याबद्दल लिहिल्या....

 "कुलाह गोशा बर आसमाने बरीन,
 हनूज अज तवाजो सरश बर जमीन"

 त्याचा अर्थ असा-
 ज्याच्या मुकुटाचे टोक आकाशापर्यंत पोहचले आहे. पण त्याचे मस्तक मात्र परमेश्वराच्या आराधनेत जमिनीवर टेकले आहे असा औरंग्या

 हे पाहताच शंभूराजे आणि कवी कलश यांनी एकमेकांकडे पाहिले. त्या जखडलेल्या स्थितीत शीघ्रकवी कवी कलश याने या प्रसंगी एक कवन रचून शंभूराजांच्या चरणी अर्पण केले .

 " यावन रावन की सभा संभू बंध्यो बजरंग ।
 लहू लसत सिँदूरसम खुब खेल्यो रनरंग ॥
 जो रवि छवि लछत ही खद्योत होत बजरंग ।
 त्यो तुव तेज निहारी ते तख्त तज्यो अवरंग ॥

 अर्थ-
 ( रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमंताला आणले होते, त्याप्रमाणे शंभूराजास औरंगजेबासमोर बांधून उपस्थित करण्यात आले आहे. हनुमंताच्या अंगाला शेँदूर शोभून दिसतो तसे घनघोर युध्दामध्ये रक्ताने अंग माखल्याने,  हे राजन, ते तुला शोभून दिसत आहे. ज्याप्रमाणे सुर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे तुझे तेज पाहून औरंगजेबाने आपल्या सिँहासनाचा त्याग केला आहे . )

औरंग्यापुढे उभे करण्यात आल्यानंतर इखलासखानाने मुजरा करण्यात सांगूनही शंभूराजांनी यत्किंचितही मान लवविली नाही . उलट संतप्त नजरेने औरंग्याकडे पहात होते . संतापलेल्या औरंग्याने त्यांना कैदेत टाकण्याचा हुकूम दिला .

 हालअपेष्टानंतरही शंभुराजेंचे ते अलौकिक रुप पाहून तो औरंग्या सिॅहासनावरून खाली उतरला व त्याने आमच्या धाकल्या धनींचे हे अलौकिक रुप पाहून त्यांना ताजीम दिली !

तेंव्हा त्या मृत्यु समोर असलेल्या अवस्थेतही कवी कलशांस वरील ओळी सुचल्या

त्या ऐकुन आमचे शंभुराजे सुद्धा आनंदित झाले असतील व म्हणाले असतील

"वाह, कविराज वाह ! काय तुमची प्रतिभा !

समोर मृत्य असूनही मराठे कधी झुकले नाहीत !

काय म्हणावं ह्या असीमित शौर्याला, त्यागाला नि पराक्रमाला !!!

मृत्यु समोर असूनही त्यांच्या प्रतिभेला धुमारे फुटताहेत ! ह्यालाच मराठ्यांचे तेज म्हणतात !!!

हा आहे आमचा पराक्रम व परमोज्वल इतिहास !!!

शंभुराजेंच्या स्वत:च्याच शब्दांत सांगायचं झालं तर

जीवितम् मृतकम् मन्ये देहिनां धर्मवर्जितं।
मृतो धर्मेण संयुक्तो दीर्घजीवी भविष्यति।।
~धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज..
बुधभूषणम अध्याय २ श्लोक ६११

अर्थ~धर्म सोडलेल्या माणसाचे शरीर जिवंत असून मृतवत् मानावे तर धर्मासह मृत्यु पत्करणारा मृत्यु होउनही चिरंजीव होतो !

 दोन दिवसांनी औरंग्याने रहुल्लाखानामार्फत शंभूराजांना दोन प्रश्न विचारण्यात आले . ' तुझे खजिने , जडजवाहिर कोठे आहे ? बादशाही सरदारांपैकी कोणी कोणी तुझ्याशी संपर्क ठेवला होता ?' शंभूराजांनी या प्रश्नांना उत्तर न देता औरंग्याला शिवागीळ केली .
 औरंग्याला हे कळताच तो संतापला , त्याने आज्ञा केली की , 'यांचे डोळे फोडा , जीभ कापून टाका '

 डोळे फोडा व जीभ कापा ही आज्ञा औरंग्याची आहे. ब्राह्मणांची नव्हे !

शंभूराजांच्या आणि कविकलशाच्या डोळ्यात तापलेल्या सळ्या फिरवून त्यांचे डोळे फोडण्यात आले आणि नंतर त्या दोघांच्या जीव्हा कापण्यात आल्या . त्या दिवसापासून त्या दोघांनी अन्नपाणी वर्ज्य केले .

 मुसलमानी सत्तांच्या परंपरेमध्ये यात नवीन काहीच नव्हते . त्यांच्या धर्मग्रंथात 'कुराणात' अत्यंत क्रूर व निर्दय पध्दतीने शत्रूंचा नायनाट करण्याची त्यांना धर्माज्ञाच आहे .

हत्येची आज्ञा

तीन मार्च ह्या दिवशी औरंग्याच्या मंचकारोहणाचे बत्तीसावे वर्ष होते व त्याच दिवशी शंभुराजेंचे वयही बत्तीसच होते ह्याच दिवशी औंरग्याने शंभुराजेंस व कली कलशांस हालहाल करून मारण्यांची आज्ञा दिली

शंभुराजेंचे डोळे काढले जीभ उपटली
कवी कलशाचीही जीभ उपटली

जीभ उपटण्याची व डोळे काढायची आज्ञा औरंग्याने बहादुरगड येथे पंधरा फेब्रुवारी लाच दरबारात दिली होती

शंभुराजेंचा दुर्दायक अंत दाहक भीषण नि भयंकर दृश्य (A dire scene of Horror)

विभव नाम संवत्सर शके १६१० फाल्गुन वद्य अमावस्या ११ मार्च, १६८९ ह्या दिवशी त्या दोघांचे प्राण अनंतात विलीन झाले

मुसलमानी इतिहासकार त्यांचं वर्णन खालील निंदनीय शब्दात करतात

"काफर बच्चा जहमी रफ्त"

म्हणजे संभा नरकात गेला

असं त्यांच्या मुस्लीम लेखकांचे वर्णन आहे

औरंग्याने शंभूराजेंस धर्मांतराची आज्ञा दिली की नाही ह्याबद्दल वाद करण्यांचं कारणच नाही कारण तो त्याच लायकीचा होता कारण तो धर्मांध म्हणूनच चिटणीस बखर सांगते की धर्मांतराची आज्ञा दिल्यावर शंभुराजेंनी उलट उत्तर स्वाभिमानाने व बाणेदारपणे दिले

ते म्हणाले
"बाटा म्हणता तरी ही गोष्ट घडावयाची नाही
ज्या अर्थी ह्या कैदेत आलो, तेंव्हा वाचणे ते काय ?? तुमचे विचारांस येईल ते करावे!
तुमची बेटी द्यावी म्हणजे बाटितो"

इथे बेटी द्यावी असे औरंग्यास महाराज म्हणताहेत ह्याचा अर्थ हे त्यांस निॅदास्पद रीतीने बोलण्याचे व शिवी दर्शक आहे हे सुज्ञांस कळेलच. ह्यावरून जर कुणी त्यावर स्त्रीलंपटपणाचा आरोप करेल तर तो मूर्खच असेल. कारण कुठल्याही बापाला मुलगी मागणं व ते औरंग्यासारख्या शत्रुला मागणं हे अपमान करण्याचंच लक्षण आहे हे लहान पोराला देखील कळेल.

ईश्वरदास नागर हा इतिहासकार लिहितो
की त्यांचे कुर्हाडीने ह्रदय फोडले, शरीराचे तुकडे केले व कोल्ह्या कुत्र्यांना खायला घातले

आणि हे शक्यही आहे कारण औरंग्या इतका नालायकच होता कारण तो कट्टर जिहादी मुसलमान होता

ह्या सर्वांचं मुळ आहे ते कुराणात हे वर आपण पाहिलेलंच आहे.

जाॅर्ज बर्नार्ड शाॅ एकेठिकाणी ह्या अशाच एका क्रूरतेचे वर्णन करताना म्हणतो

A dire scene of Horror which no pen can trace nor rolloging years from the memories of ages efface.

असा दाहक भीषण नि भयंकर दृश्य की कोणतीही लेखणी ती आपल्या सामर्थ्याने टिपु शकणार नाही
स्मृतीची पानेही अशी की कितीही वर्षे झाली तरी ती पुसली जाणार नाहीत

आता औरंग्याच्या अशाच शिक्षांचा इतिहास

औरंग्याने अशाच प्रकारच्या अमानवी व नृशंस हत्या व अत्याचार आधीही अनेकांवर केलेले आहेत. औरंग्याने अशाच शिक्षा आधी तिघांना केल्या होत्या व त्याही कुराणानुसार हे स्पष्ट आहे

शीखगुरुंना दिलेल्या अतिक्रूर शिक्षा

औरंग्याने शीखांचे गुरु तेगबहाद्दुर ह्यांचे दिवाण मतिदास, भाऊ सतिदास, दयालदास व गुरु दिता ह्यांना पकडले व ९ नोव्हेंबर, १६७५ रोजी सर्वांना शिक्षा देण्यात आंली

भाई मतिदासाला चांदणी चौकात आणण्यात आले व लाकडी फळ्यांची रचना मांडली व त्यावर त्यांना झोपविलं. त्यानंतर त्यांना लाकुड कापता, त्याप्रमाणे करवतीने डोक्यापासून पायापर्यंत कापण्यात आले व शरीराचे तुकडेतुकडे केले

दुसर्या दिवशी दयालदासाला तापत्या तेलाच्या कढईत टाकण्यात आले व प्राण जाईपर्यंत मारण्यात आले व त्यांचे प्रेत चांदणीचौकात फिरविण्यात आले.

ह्याच्यासंदर्भात एका शीख ग्रंथात म्हटलंय

मतिराम चिराया फाड्या
दयाला देगविच साड्या

अर्थ - मतिरामला चिरलं व फाडलं
व दयालदासला तापत्या तेलात जाळलं !

तिसर्या दिवशी सतिदासालाही एका तुळईस हात बांधून ठेवले व पाय घट्ट बांधले व पुढे एक वाघनघा घेतलेला माणूस व मागे वाघनखे घेतलेला माणुस असं करून चालत असताना त्यांची कातडी त्या वाघनख्यांनी सोलण्यात आली, मांस ओरबाडण्यात आले, रक्ताची कारंजी उडाली !

काय अनंत यातना झाल्या असतील ! किती अनन्वित अत्याचार हा ! कल्पना तरी करवते काय???

गुरुतेगबहाद्दुरांचीही अशीच हत्या

शेवटी नोव्हेंबरला गुरु तेगबहाद्दुरांनाही असंच ठार करण्यात आलं. त्यांना विचारण्यात आलं की मुसलमान होताल काय?

तेंव्हा त्यांनी बाणेदारपणे उत्तर दिले की

"मति मलीन मुरखमति जोई
इसको त्यागोही पामर तो सोई

म्हणजे हिॅदुधर्माचा त्याग करणारा मनुष्य हा सामान्य व मुर्ख आहे !

ह्याला म्हणतात स्वधर्माभिमान नि अतुलनीय स्वधर्मनिष्ठा !

स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह: !
ह्या आमच्या गीतेतले तत्वज्ञान तर हेच सांगते

आता कुठे कुठे गेले ते सर्वधर्मसमभाववाले

आता बोला की सर्वधर्मसमभाव आहे म्हणून

इतकी क्रूर नि अमानवी नि नृशंस हत्या कुणी स्वप्नात तरी करेल काय? पण मुसलमान ते करणारच कारण त्यांचे कुराण ते करायला सांगतं.

पण मुसलमान ते करतीलच व करताहेत.

ईसिसची चलतचित्रे म्हणजे व्हिडिओ आपण पाहिल्याच असतील व्हाॅट्सप फेसबुक ह्या समाजमाध्यमांवर व आंतरजालांवर
ते कशा प्रकारे हत्याकांड करताहेत हे पाहतो आहोत आपण नेहमीच.

तरीही शंभुराजेंची हत्या आता कुणी मनुस्मृतीनुसार व ब्राह्मणांनी केली असं म्हणत असेल तर त्याला काय म्हणावं???

शेवटी जाता जाता शंभुराजेंचेच ब्राह्नणाबद्दलचे बुधभूषणममधले श्लोक देतो.


शंभुराजेकृत बुधभूषणम् आणि ब्राह्मण

ब्राह्णण समाजाचा द्वेष करणार्यांना शंभुराजे स्पष्ट पणे बुधभूषणम मध्ये खालीलप्रमाणे सांगतात

अष्टौ पूर्वाणि चिन्हानि नरस्य विनशिष्यत: !
ब्राह्मणान्प्रथमं द्वेष्टि ब्राह्नणश्चैव विरुद्ध्यते !

(खालील) ८ पूर्वखुणा माणसाचा नाश करतात
१. ब्राह्मणांचा द्वेष करतो,
२. ब्राह्नणांना विरोध करतो किॅवा त्यांच्या कडून अडविला जातो,

ब्राह्मणस्वानि चादत्ते ब्राह्मणांश्च जिघांसति !
रमन्ते निन्दया चैषां प्रशंसां नभिनन्दति !

३. ब्राह्मणांस दास्यवितो, संपत्ती काढून घेतो,
४. हिॅसा करतो,
५. त्यांची निंदा करण्यात रस घेतो,
६. आणि त्यांची प्रशंसा ऐकल्यास आनंदित होत नाही.

नैतान्स्मरन्ति कृत्येषु याचितश्चाभ्यसूयति !
एतान्दोषान्नर: प्राज्ञो वध्ये बुद्ध्वा विवर्जयेत् !

७. त्यांच्या उपकाराचे स्मरण ठेवत नाही
८. याचना करणार्यांचा तो मत्सर करतो.

बुधभूषणम् - ३ रा अध्याय - १२ ते १४ श्लोक

दैवतेषु च यत्नेषु राजसु ब्राह्मणेषु च !
नियन्तव्य: सदा क्रोधो वृद्धबालातुरेषु च !

दैवदेवतांविषयी, राजांविषयी, ब्राह्मणांविषयी, वृद्धांविषयी, लहान मुलांविषयी, आणि दुर्बलांविषयी राग नेहमी प्रयत्नपूर्वक काबुत ठेवाव.


ब्राह्मणेषु क्षमी स्निग्धेष्वजिह्म: क्षोभनोरिषु: !
स्याद्राजा भृत्यवर्गेषु प्रजासु च यथा पिता !

ब्राह्मणाविषयी क्षमाशील असावे, मित्र इत्यादि स्नेह्यांशी सरळ वागावे, शत्रुंविषयी क्रोधाने वागावे.....


इति श्रीशंभुराजे

शेवटी त्या परमश्रद्धेय धर्मवीर छत्रपती श्रीशंभुराजेंस व त्यांच्या पवित्र स्मृतींस विनम्र प्रणाम करून लेखणीला विराम देतो !!!

धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराज की जय !
छत्रपती शिवाजी महाराजकी जय !!
हिॅदुधर्म कीजय !!!
भारतमाता की जय !!!

© तुकाराम चिंचणीकर
Pakhandkhandinee.blogspot.com

7 comments:

  1. ज्ञानवर्धक शास्त्रार्थ!!!👍
    आजच्या काळात अशे ज्ञानवर्धक मंडनकारी लेख फक्त social media पुरते मर्यादित राहता कामा नये
    अर्थात शास्त्र स्वरूपात अज्ञानी लोकांसमोर येईल तर अशे अपप्रचाराला तिथेच वचक बसेल!!!
    सत्यमेव जयतेः
    मंगलम् भवतुः
    जय शंभूराय

    ReplyDelete
  2. उत्तम लेख. अत्यंत अभ्यासपूर्ण !!!

    ReplyDelete
  3. खूप सुंदर लेखणी आणि मांडणी सुद्धा भरपूर आभ्यास करायला मिळाले

    ReplyDelete
  4. Aajachya peedhit ji adnyanata aahe kinva jo itihas mul swarupat nahi tyamule . Ya pakhandi adharminna uttar dene swabhavikch kathin jaat asate. Ani ashya pakhandachi khandani lekh uplabdh nasalyamule yanche pakhand adnyani lokanvar chitkun basatat..
    Aapan ha uttam kary par padat aahat yach garv samast hoilach...
    Aapla kary nirntar abadhit raho hich prabhu charni vandana..

    ReplyDelete
  5. Please mention websites or sources to get these books also at the end in reference section. Dasbodh.com is one such nice site

    ReplyDelete
  6. खूब सुन्दर लेख आहे भाऊ

    ReplyDelete
  7. आपल्याला मी अजून एक पुरावा देऊ इच्छितो शाही आलं बुखारी 5686 "पैगंबर मुहम्मद ला भेटायला काही लोक आले आणि मदिना चा तापमान ज्यास्त असल्यामुळे त्याने उंटाचे दुध आणि मूत्र प्याला सांगितले, उंटाचे दूध मूत्र पिऊन त्यांनी उंट पाळण्याऱ्या लोकांची हत्या केली आणि उंट चोरले, पैगंबर ला कळताच त्याने त्या माणसांना पकडले त्यांचे हाथ पाय कापले व डोळ्या मध्ये गरम लोखंडाच्या साल्या घुसावल्या.याच नियमानुसार छत्रपती संभाजी महाराज आणि सिख धर्माच्या बाबा बंद सिंग बहादूर यांच्या डोळ्यात गरम लोखंना घातले

    ReplyDelete