Sunday, 22 January 2017

साम्यवादी / स"माज"वादी तरुणांचा वैचारिक लोचा....




अनेक साम्यवादी/समाजवादी तरुणांचा वैचारिक लोचा झाला असल्याचे दिसून येते. त्याची कांही उदाहरणे म्हणजे:
*१. ज्या मार्क्सला हे लोक आदर्श मानतात व स्वत:ला नास्तिक म्हणत फिरतात, तोच त्यांचा मार्क्स हा किती कट्टर आस्तिक व ख्रिस्ती धर्मप्रसारक(मिशनरी) होता हे त्याचे पत्रव्यवहार व १८५७ वरचा ग्रंथ वाचून कळते. तरीही हे लोक त्याचेच "धर्म ही अफुची गोळी" हे जणु वेद वाक्य म्हणून पसरवितात व त्याच्या ख्रिस्ती मिशनरी प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करतात.
*२. आश्चर्याची व विलक्षण शंकेची गोष्ट अशी की साम्यवादी ज्या मार्क्सला प्रमाण मानतात तो मार्क्स स्वत: कधीही नास्तिक नव्हता ! ज्येष्ठ न्यायमूर्ती आर व्ही एस अय्यर ह्यांनी मार्क्सबद्दल एकाठिकाणी स्पष्ट म्हटलंय की
"It is quite ironic to say that Marx never ever denied the existence of God but he only denied the exploitation of the masses under the name of God."
Preface to Marx & Vivekananda - a comparative study - P. Parmeshwaran
*३. भगत सिंह नास्तिक व साम्यवादी होते असं एक खोटेच भाषण आज फिरवले जाते की जे पूर्ण वाचले की ते किती खोटंय हे लक्षात येत. भगत सिंह म्हणतात की त्यांचे काका आर्यसमाजी होते व कोणताही आर्यसमाजी हा नास्तिक कधीच होऊ शकत नाही. (An Arya Samajist can be anything but can never an Athiest). ते स्वत: गायत्री मंत्राची सहस्त्रो आवर्तने केल्याचा पुरावा देतात. म्हणजेच ते भाषण त्यांचे नाहीये हे सिद्धय.
*४. धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्म नष्ट करणे नव्हे हे महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य हे तरुण सहजगत्या विसरतात पण एरवी त्यांच्याबद्दल स्तुतीसुमने गातात. थोडक्यात सोयीनुसार.
*५. हे तरुण एकीकडे गांधीजींचा आदर करतात पण दुसरीकडे त्यांच्याच अहिॅसेच्या सर्वश्रेष्ठ तत्वाला फाटा देऊन केरळ वगैरे राज्यात संघ स्वयंसेवकांची सरसकट हत्या करतात. किंवा हेच लोक साम्यवादी राष्ट्रात झालेल्या तिथल्याच जनतेच्या अमानुष छळाची व निर्घृण अशा हत्याकांडाची मात्र सोयीस्कर रीत्या विसरणूक करतात.
*६. साम्यवादी सरकारांनी त्यांच्याच देशात त्यांच्याच एकुण ९.८ कोटी लोकसंख्येची किॅवा जनतेची सरसकट कत्तल केलीय ह्याचा पुरावा "The Black Book of Communism- Crime, Terror and Repression" ह्या हार्वर्डने प्रकाशित केलेल्या १९९९ च्या ग्रंथातला पुरावा मात्र विसरतात. इतका अमानवी न नृशंस इतिहास असलेला हा साम्यवाद नि समाजवाद.
*७. टिळक हे धर्मनिष्ठ होते व वेदांवर भाष्य करणारे होते. पण हे साम्यवादी व स"माज" वादी तरुण मात्र टिळकांना भटमान्य म्हणणार्या ब्रिगेड व बामसेफ्यांच्या विरोधात एक अवाक्षरही बोलत नाहीत. हेच साम्यवादी नि समाजवादी एकीकडे धर्म नाकारतात व दुसरीकडे वेदोक्त प्रकरणांवरून टिळकांची निॅदा करतात किॅवा होत असेल तरीही मुग गिळून बसतात. आहे की नाही गंमत???
*८. ज्या गांधीजींचे हे नाव घेतात त्याच गांधीजींनी आता "काँग्रेस" पक्ष बंद करा स्वातंत्र्यानंतर असे टाहो फोडून सांगितले होते पण हे साम्यवादी नि स"माज" वादी तरुण त्यांच्या नेत्यांकडून चुकीच्या पद्धतीने भडकविले गेल्याने सत्याचा अपलाप करतात. बिच्चारे.
*९. धर्म ही भारताची जीवनशक्ती आहे असे म्हणणारे विवेकानंद ह्यांना नको असतात पण केवळ त्यांच्या काही मोजक्या टिकांचा उपयोग स्वार्थासाठी करणारे हे साम्यवादी नि स"माज" वादी तरुण असतात.

*१०. मनुस्मृती दरवर्षी जाळून तिला पुन्हा पुन्हा जिवंत करणारे हे साम्यवादी व स"माज" वादी तरुण असतात कारण त्यांची माथी त्यांच्या नेत्यांनी भडकविलेली असतात. आंबेडकरांनी एकदाच ती जाळली पण हे मात्र ती दरवर्षी जाळून तिला जिवंत ठेवतात. आहे की नाही गंमत??? 😁😁😜
*११) एरवी गांधीजी व त्यांची अहिॅसेची टिमकी वाजविणारे हे साम्यवादी व स"माज"वादी नेते व त्यांचे तरुण गांधीहत्येनंतर झालेल्या ब्राह्मणांच्या सरसकट हत्येबद्दल मात्र सोयीस्कर मौन धरतात. आणि वरून विचारांची लढाई विचाराने लढतो अशी शेखी मिरवितात.
*१२) साम्यवाद व स"माज"वाद देशभक्ती, धर्म संस्कार शिकवूच शकत नाही हे स्पष्ट आहे. देशद्रोहीच विचारधारा आहे साम्यवाद व स"माज"वाद. दुसरे काय??? पाकिस्तानच्या फाळणीला १९४२ लाच ह्यांनी कशाला पाठिॅबा दिला असता नाहीतर???
*असो असे खुप सारे मुद्दे मांडता येतील..!*
*इतिहास,हिंदू धर्म,संस्कृती याबद्दल निव्वळ लोचा, नुसता लोचा झालेला असतो डोक्यात ह्या साम्यवादी व समाजवादी बिचार्या तरुणांचा...पण तुमची तरी काय चुक रे???
तुमचे नेते तुम्हाला जो मार्क्स व लेनिन स्टॅलिन शिकविणार तेच तुम्ही वाचणार. वयाची ऐंशी जवळ आली तरी ज्यांना सत्ता सुटत नाही व युवकांना संधी द्यायची सोडून आपणच बसतात तेच तुमचे नेते. ज्योती बसू, अच्युत्तानंद , डेंग झियोपिंग , .... असे कैक.
तरुणांनो तुमचा असा वैचारिक लोच्या होण्याचे कारण म्हणजे तुमच्या स"माज"वादी व साम्यवादी नेत्यांनी तुमच्यात कुजबुज करुन पसरवलेले विचार आहेत..!
तरुणांनो शहाणे व्हा । योग्यवेळीच निर्णय घ्या ।।।
भवदीय,
© तुकाराम चिंचणीकर
पाखण्ड खण्डिणी

No comments:

Post a Comment