Sunday, 12 January 2020

डाव्यांचे सोयीस्कर कथित विद्रोही, कथित पू-रोगामी विवेकानंद...




सर्वप्रथम सर्वांना विश्वमानव श्रीमत्स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विलंबाने शुभेच्छा! राजमाता आदरणीय जिजाऊसाहेबांच्या प्रतीही विनम्र अभिवादन !

डाव्यांना अर्थात स'माज'वाद्यांना, साम्यवाद्यांना, पू-रोगाम्यांना, कथित विवेकाचा आवाज बुलंद करणार्यांना, कथित बुद्धिवाद्यांना, कथित विद्रोह्यांना, कथित सर्वधर्मसमभाववाल्यांना, कथित शेक्युलरांना आज कित्ती कित्ती वाईट्ट दिवस आलेत पहा ना. आह्मांस खरंतर कीव येते ह्यांची....

ह्यांच्या वैचारिक जन्मदात्यांना म्हणजे मार्क्स-लेनिन-स्टैलिन-कॉम्रेड प्रभृतींना कुणीही कुत्रंही आज विचारत नाही म्हणून हे लोक त्यांच्या राष्ट्रद्रोही, संविधानद्रोही, धर्मद्रोही, ब्राह्मणद्रोही नि समग्र हिंदुसमाजद्रोही वर्ग संघर्षाच्या (Class Struggle) कथित विद्रोही विषवल्लीच्या पेरणीसाठी आता राष्ट्रनायक श्रीमत्स्वामी विवेकानंद नि सावरकर प्रभृती पुरुषश्रेष्ठांचे अपहरण करण्याचे क्षुद्र (शुद्र नव्हे)प्रयत्न करताहेत. अर्थात ह्यातंच त्यांची हतबलता दिसून येते...

प्रतिवर्षी विश्वमानव स्वामी विवेकानंदांची जयंती आली की डाव्यांना म्हणजे ह्या कथित विवेकवाद्यांना अचानकपणे विवेकानंदांचा साक्षात्कार होतो. आणि त्यासाठी स्वामीजी हे कसे बळेच सर्वधर्मसमभावी होते, कसे पू-रोगामी होते, कसे ब्राह्मणद्वेष्टे होते, कसे वेदद्वेष्टे होते, कसे बुद्धिवादी होते नि धर्मांवर कठोर प्रहार करून तो जणु नाकारणाराच होते, कसे गोहत्येचे नि गोमांसाचे नि मांसाचे समर्थक होते, इस्लामचे नि ख्रिस्ताचे गोडवे गाणारे होते वगैरे वगैरे शोध लागतात..विवेकानंदांना गोहत्येचा बळंच समर्थक ठरविणे, इस्लामचा नि त्याच्या स्थापनकर्त्याचा अन् अस्तित्वांत नसलेल्या ख्रिस्ताचा स्तुतीपाठक दर्शविणे (हे असले धंदे गेली चाळीस वर्षे भरकटलेला रामकृष्ण मठही करतंच आहे, दुर्भाग्याने), श्रीमत्शंकराचार्यांची बळंच निंदा करणे, बुद्धिवादाच्या किंवा कथित विवेकवादाच्या नावाखाली विवेकानंदांना धर्मद्रोही नि सर्वच प्रथांवर टीका करणारा दर्शवून आपला धर्मद्रोह साध्य करायचा बालिश प्रयत्न केवळ डावेच करु शकतात. विवेकानंदांच्या साहित्यातले आपल्याला सोयीस्कर नि तोडूमोडून संदर्भ गोळा करून त्यांचा स'माज'वादी शोध घेण्याचा अत्यंत हास्यास्पद प्रयत्न केवळ डावेच करु शकतात...*

कारण काय

तर ह्यांच्या मार्क्स-लेनिन-स्टैलिनला आता जगांत कुणीही कुत्रं भीक घालत नाही. मग हे करणार तरी काय बिच्चारे...

चचचचचचचचचचचच

काय वेळ आलीय रे तुमच्यावर...

तुमचं हसु येतं नि कीवही येते...

आमच्या मागील लेखांतच आम्ही डाव्यांच्या विवेकानंद द्वेषाला प्रत्युत्तर दिलंय..

आणि ह्या लोकांची असहिष्णुता पहा...

आमच्या एका पत्रकार मित्राने काही वर्षांपूर्वी विवेकानंदांच्या ह्या अपहरणांस सप्रमाण प्रत्युत्तर दिल्यावर ह्याच लोकांनी त्याला धमक्या वगैरे देण्याचा प्रयत्न केला होता...विवेकाचा आवाज बुलंद वेग्रै. विचारांची लढाई विचारांनी वेग्रै वेग्रै...

काही जण म्हणतील की विवेकानंदांवर तर सर्वांचाच समान अधिकार आहे, ते थोडीच कुणाचे प्रताधिकार आहेत...???

अरे वाह आता सर्वाधिकार आठवला का??? पण तुमच्या मार्क्स-लैनिन-स्टैलिन-माओ-डांगे-जावडेकर प्रभृतींचे काय झालं??? श्राद्ध-बिद्ध घातलंत की काय???

विवेकानंद हे वेदांना सर्वोच्च प्रमाण मानणारे नि राष्ट्रनिष्ठ हिंदुधर्माभिनानी होते.

म्हणून तर मग खरे विवेकानंद आहेत तरी कोण हे आकळून घ्यायचे असेल तर निम्नलिखित साहित्य वाचा

१. स्वामी विवेकानंद ग्रंथावली जन्मशताब्दी प्रकाशन १९६३चं प्रकाशन - एकुण दहा खंड (मूळ इंग्रजीत नऊ खंड)
२. Swami Vivekananda in the West - New discoveries - Mary Louise Burke (Sister Gargi) - Six Volumes
३. Comprehensive Biography of Swami Vivekananda - S N Dhar - Three Volumes
४. उपरोक्त तीन खंडांचा मराठी अनुवाद - विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाने प्रकाशित पुण्यांत केलाय तो अभ्यासावा.
५. विश्वमानव स्वामी विवेकानंद - वि रा करंदीकर - तीन खंड
६. महाराष्ट्रांत विवेकानंद - रामकृष्ण मठ प्रकाशन

एवढं वाचून या नि मग विवेकानंदांना हायजैक करण्याचा बालिश प्रयत्न करा.

ह्या कथित विचारजंतांना उघड आव्हान अर्थात ओपन चैलेंज...

विवेकानंद ह्या विषयांवर चर्चेंस या...पाहुयांत खरे विवेकानंद कोणते नि खोटे कोणते???

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#विवेकानंदजयंती_राष्ट्रीययुवादिन_डाव्यांचेविवेकानंद_पूरोगामित्व_वर्गसंघर्ष

1 comment:

  1. डाव्यांनी अपहरण केलेले स्वामी विवेकानंद हे एकमेव वंदनीय व्यक्तीमत्व नाही. साने गुरुजी हे दुसरे, विनोबा भावे हे तिसरे. साने गुरुजीं हे वस्तुतः प्रच्छन्न धार्मिक प्रवृत्तेचे होते. त्यांचे 'साधना' हे साप्ताहिकही समाजवाद्यांनी बळकावले आहे. अगदी अलीकडे विनोबा हे वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारे होते असा शोध त्यांनी लावला आहे, आणि विज्ञान ही तथाकथित पुरोगामी डाव्या विचारवंतांची (?) मक्तेदारी आहे असा गैरसमज त्यांच्या मनात बिंबवला गेला असल्याने विनोबा हे वैज्ञानिक मनोवृत्तीचे होते असा नवशोध त्यांना लागला आहे.

    ReplyDelete