असहिष्णुता, पुरस्कार वापसी हे शब्द आपल्या भारतीयांना काही नवीन नाहीत. किॅबहुना मागच्या काही महिन्यात हेच शब्द वर्तमानपत्रात, मासिकात किंवा दूरदर्शन संचावर किॅवा तत्सम वृत्तवाहिन्यांवर किॅवा अगदी समाजमाध्यमांवर (सोशल मिडिया) सतत ऐकायला, पहायला, वाचायला मिळाले असतील सर्वांना ! देशात सत्तांतर होताच वर्षे होतं न होतं तोच भारतात असहिष्णुता वाढली असं ऐकायला मिळालं व त्याचाच परिणाम म्हणून एतद्देशीय साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत केले ! त्यातले शेकडा ८० तर असे होते की ज्यांची नावेही सर्वसामान्यांना खरंतर माहिती नसावीत ! असो !
आता त्या पुरस्कार वापसी मागचं अर्थ नि अन्वयार्थ नक्की काय हे पाहण्याचा प्रयत्न करु !
अर्थ 👇
असहिष्णुता म्हणजे नक्की काय? तर देशातल्या लोकांना दैनंदिन जीवनात अस्वस्थता किॅवा धोका वाटायला लागणे ! भारतीय संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकारांवर गदा येतीय की काय असं वाटणं किॅवा संविधानाने दिलेल्या मुक्त वातावरणाच्या व राहणीमानाच्या संकल्पनेस बाधा येतीय का काय असं वाटणं ! देशाच्या राज्यघडनेत अंतर्भूत असणार्या पंथनिरपेक्षता(सेक्युलरिझम) ह्या तत्वांना बाधा येतेय की काय असं वाटणं? किंवा तत्सदृश परिस्थिती निर्माण होतीय असं वाटणं??? देशांतल्या अल्पसंख्यांकावर जणु काही अन्याय होतोय की काय? राज्यघटेनेने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य किॅवा उपासना पद्धतीचं किॅवा पंथ स्वातंत्र्यावरच गदा येतीय की काय असं वाटणं??साधारण हाच अन्वयार्थ लावता येईल ह्या सर्व घटनांचा किॅवा त्या मागच्या घटनांचा !
आता वस्तुस्थिती अशी आहे की देशात अशी परिस्थिती खरीच आहे का?? किॅवा होती काय किॅवा तशी भविष्यात निर्माण होण्याचा संभव तरी आहे काय??
खरंतर देशात जेंव्हा आणीबाणी होती तेंव्हा सुद्धा कुणी हे शब्द उच्चारले नव्हते ! जी आणीबाणी देशाच्या इतिहासातली एक अतिशय निंदास्पद व लाजिरवाणी घटना म्हणली जाते, जिला अनुशासनपर्व असे म्हटले जाते, त्या काळातही कुणी असहिष्णुता असा शब्द उच्चारल्याचं उदाहरण नाही ! तरीही खरं सांगायचं तर ज्या व्यक्तीला हा शब्द सुचला असेल त्याच्या बुद्धीचे खरंच कौतुक करायला हवं ! असो !
तर देशातल्या काही लोकांना असं वाटायला लागलं की देशात भाजपाचे सरकार आल्याने असहिष्णुता वाढली आहे व सर्वसमान्यांचं जगणं असह्य होतंय ! असा प्रचार प्रसारमाध्यमांनी हेतुपुरस्सर सुरु केला व उचलून धरला ! मग केवळ इलेक्ट्राॅनिक प्रसारमाध्यमेच नव्हे तर अगदी वृत्तपत्रे व मासिकंही भरभरून लिहु लागली ! एक साहित्यिक पुढे आला व त्याने पुरस्कार परत केला ! खरंतर ह्या साहित्यिकाला ही असहिष्णुता वाढल्याचा साक्षात्कार कसा काय झाला हे त्याचे त्यालाच ठाऊक ! पण त्याच्यानंतर देशातल्या अनेक साहित्यिकांनी जणु काही आपल्याला पण तोच अनुभव आला आहे अशा आविर्भावात ह्या संग्रामात उड्या टाकल्या ! एका मेंढरामागं बाकीची मेंढरं कशी धावतात तसं हे उदाहरण झालं !
वस्तुत: ह्यातल्या एकालाही असं वाटलं नाही की असहिष्णुता म्हणजे नक्की काय आहे, ती वाढते आहे असं वाटतंय तर तिची कारणं काय, तिचं स्वरुप काय, तिच्याशी नव्या सरकारच्या अस्तित्वाचा संबंधच काय वगैरे ! आश्चर्य म्हणजे एकाही साहित्यिकाने सरकारशी बोलुन किंवा सरकारला खुले आवाहन देऊन चर्चेने हा प्रश्न सोडवता येईल का असे वाटलं नाहीच ! उलट सरकारच ह्यासाठी दोषी आहे असा पक्का ग्रह ह्या सर्वांनी केला असल्यामुळे किॅवा त्यांच्या तसा करून दिला गेल्यामुळे त्यांनी ही गोष्ट करण्याचं साधं भावपी दाखविलं नाही. एकालाही असं वाटलं की नाही की त्यांची नेमकी भूमिका मांडावी !
काहीजणांनी तर केवळ प्रसिद्धीसाठीच हे केलं असावं अशी दाट शक्यता आहे ! जर तसं नसतं तर जे साहित्यिक कुणाला माहितीही नव्हते ते अचानक कसे काय प्रकाशात आले असते???
आणि क्षणभर गृहीत धरू की देशात खरंच असहिष्णुता होती तर मग आज तर हे प्रकरण पूर्ण निवळलं आहे ! आज एकही जण पुढे येऊन असहिष्णुतेच्या गप्पा मारत का नाही??? की आज भाजपा सरकार किॅवा देश अचानक सहिष्णु झाला??? काहीच महिन्यात ही परिस्थिती अचानक कशी काय बदलली??? अशी काय जादुची कांडी ह्या साहित्यिकांनी किंवा अन्य कुणी किॅवा अगदी भाजपा सरकारनेच फिरविली की ज्यामुळे हे साहित्यिक आज अचानक शांत झाले???
आज एकही जण पुरस्कार परत करत नाहीये की तत्संबंधी काही चर्चा करताना दिसत नाहीये??? का कुठे गेली ही असहिष्णुता??? कुठे गेले ते पुरस्कार वापसी करणारे???
आमच्या महाराष्ट्रात तर आम्ही आतुरतेने वाट पहात होतो की आमचे आदरणीय ज्ञानपीठकार भालचंद्र नेमाडे पुरस्कार कधी परत करताहेत? पण त्यांनी ह्या घटनेवर साधे भाष्यही केलं नाही की एक साधा चकार शब्दही काढला नाही??? खरंतर ते ज्येष्ठ साहित्यिक ! त्यांचा मान तर अगदी पहिला ! प्रत्येक गोष्टी वर अगदी रोख ठोक भूमिका मांडणारे आमचे लाडके नेमाडे साहेब अगदीच गप्प कसे??? आम्हांसही ही त्यांची अस्वस्थता अगदीच असह्य वाटत होती व वाटत आहे ! कारण जर देशात खरीच असहिष्णुता होती किॅवा आहे व त्यामुळे सगळे साहित्यिक जर साहित्यिक पुरस्कार परत करत होते, तर आमच्या नेमाडे साहेबांनी तो पुरस्कार का परत केला नाही बुवा??? की त्यांच्या एकट्यासाठी असहिष्णुता नाहीये??? काय कळतच नाही राव !!!
तेंव्हा हा प्रकार एकुणच किती वास्तवतेला धरून आहे ह्याचा वाचकांनी व श्रोत्यांनी विचार करावा व आपले आपणच ठरवावे की नेमकं सत्य आहे काय व असत्य काय आहे!
अन्वयार्थ ह्या सर्व घटनांचा 👇
ह्या सर्व घटनांचा अन्वयार्थ काय लावायचा??? हे सर्व असहिष्णुतेचे किॅवा पुरस्कार वापसीचे नक्की काय अर्थ लावायचे???
अचानक ही असहिष्णुता कशी काय निर्माण झाली?? व अचानकच आज सगळे शांत का झाले??? खरंच देशात असहिष्णुता होती का??? की हे केवळ एक हेतुपुरस्सर रचलेलं षडयंत्र होतं??? नेमकं भाजपाची सत्ता येताच देशात असहिष्णुता कशी काय वाढली??? आधी ती नव्हती व आताच कशी काय वाढली???
जर भाजपामुळेच ती निर्माण झाली असं क्षणभर मानलं तर मग आज कुणी का पुरस्कार वापसी करत नाहीये??? ह्याचाच अर्थ हे सर्व कुभांड रचलंय असं वाटत नाही का???
कारण सरळ आहे ! तो कालावधी आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावत असताना किॅवा तदनुषंगिक प्रयत्न होत असताना अचानकच भारतातच असहिष्णुता आहे असं दाखविण्याचा प्रयत्न का केला जातो??? त्याच्यामागे हेतुपुरस्सर राजकारण केलं तर गेलं नसेल ना साहित्यिकांकडून व प्रसारमाध्यमं इत्यादि विरोधी शक्तींकडून??? आणि महत्वाचे म्हणजे त्यावेळी नेमकी बिहारची निवडणूक आल्याने तसं राजकारण करण्याचा प्रयत्नही केला गेला असेल ह्या सर्वांकडून ! ह्या शक्यता नाकारता येतच नाहीत !!!
काहीजणांना कदाचित असं वाटेल की हा लेख केवळ एकाच भूमिकेतून लिहिला गेला आहे किॅवा एकाच कोनातून (अंगलमधून) लिहिला आहे ! पण तसं नाहीये ! वाचकांनी विचार करावा व मत मांडांवं अगदी सडेतोडपणे !!!