Friday, 20 November 2015

मनुस्मृती नि मांसभक्षण - एक चिकित्सक अभ्यास !



हिॅदुधर्मग्रंथांचा अभ्यास करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने आढळून येते ती म्हणजे क्वचितच आढळून येणारी विसंगती ! मांसभक्षणासंदर्भात तर ही विसंगती बर्याच अंशी दिसून येते ! काही ठिकाणी मांसाचं समर्थन असतं तर त्यातल्याच दुसर्या एका अध्यायात त्याचा पूर्ण निषेध असतो. आता ही विसंगती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून प्रक्षेप आहे. मनुस्मृती हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण !

मनुस्मृती इतकी प्रक्षिप्त आहे की ती वाचली की खरंच पटतं ! कारण तीन चार श्लोक असे असतात की ते एका ठिकाणी मांसाचे समर्थन करतात पण पुढच्याच येणार्या श्लोकात त्याचा निषेध असतो ! आणि हे केवळ मांसाशी संबंधित नाहीये तर इतरही अनेक विकृत गोष्टींशी संबंधित आहे ! अनेक उदाहरणे देता येतील पण विस्तारभयातस्व केवळ मांसभक्षणाच्या आरोपांचा नि प्रक्षेपांचा इथे विचार करूयात !


न मांसभक्षणे दोषो न मद्ये न च मैथुने ।
प्रवृत्तिरेषा भूतानां निवृत्तिस्तु महाफला॥
मनुस्मृति ५/५६

अर्थ - मांसभक्षणात दोष नाही व मद्य व मैथूनातही(व्यभिचारातही) दोष नाही ! कारण सर्वसामान्य  मनुष्याची ही स्वाभाविक प्रवृत्ती असते. पण ह्यातून निवृत्त म्हणजे परावृत्त होणं हेच श्रेयस्कर !

इथे अनेकजण दोष नाही असं समजून मांसमदिरामैथूनादि कृत्यांचं समर्थन आहे असा समज करतात पण हे श्रेयस्कर नाही हे स्पष्टपणे सांगितल्याचं मात्र लक्षात घेत नाहीत. असे काही मांससंमर्थक श्लोक असून मांसाचा आरोप करणारे ह्याचाच नेहमी संदर्भ देतात ! वस्तुत: हा श्लोक प्रक्षिप्त आहे ! त्याची कारणे खालीलप्रमाणे !

पूर्ण मनुस्मृती वाचली तर हा श्लोक प्रक्षिप्त आहे असं कळतं ! कारण हीच मनुस्मृती इतर ठिकाणी मांसाहाराची किॅवा प्राणीहत्येची किती कठोर शब्दात निंदा करते ते पाहुयात. उदाहरण खालील वाचा

दुसरा अध्याय पाहु

वर्जयेन् मधुमांसं च प्राणिनां चैव हिंसनम् !
२.१७७

अर्थ - मद्यपान, मांसभक्षण व प्राणीमात्रांची हिंसा ह्या सर्वाचा त्याग करावा.

चौथा अध्याय म्हणतो

हिॅसारतश्च यौ नित्यं नेहासौ सुखमेधचे !
४.१७०

अर्थ - जो नेहमी हिॅस्र कर्मांमध्ये रत असतो त्याला ह्या संसारात कधीही सुख प्राप्त होत नाही.

पाचव्या अध्यायात हीच मनुस्मृती म्हणते

योsहिॅसकानि भूतानि हिनस्त्यात्मसूखेच्छया !
स जीवंश्च मृतश्चैव न क्वचित्सुखमेधते !
५.४५

अर्थ - जी व्यक्ती आत्मसुखासाठी म्हणजे स्वत:च्या सुखासाठी "अहिॅसकानि भूतानि" म्हणजे ज्या प्राण्यांची कधीच हिॅसा करणे योग्य नाही अशा प्राण्यांची हिॅसा करतो तो "जीवन च मृत:" म्हणजे जिवंतपणी व मेल्यावरही कधीही क्वचित देखील सुखास प्राप्त होत नाही.

आता पुढचा आणखी श्लोक

नाकृत्वा प्राणिनां हिॅसा, मांसमुत्पद्यते क्वचित् !
न च प्राणिवध: स्वर्ग्य: तस्मान्मांसं विवर्जयेत !
५.४८

अर्थ - प्राणीमात्रांची हिॅसा न करता कधीही मांस प्राप्त होत नाही आणि प्राणीवध कधीही स्वर्ग्य म्हणजे सुखदायक होत नाही ! म्हणून "मांसं विवर्जयेत्" म्हणजेच मांसाचा त्याग करावा !

पुढे म्हणते

समुत्पत्तिं च मांसस्य वधबन्धौ च देहिनाम् !
प्रसमीक्ष्य निवर्तेत सर्वमांसस्य भक्षणात् !
५.४६

अर्थ - मांसाची उत्पत्ती जशी होते तसे प्राणीमात्रांचा वध आणि बंधाचे कष्ट पाहून सर्व प्रकारच्या मांसभक्षणापासून दूर रहा !

इथे सर्वप्रकारच्या मांसभक्षणापासून दूर रहा असं किती ठामपणे सांगितलंय व प्राणीमात्रांना होणारी वेदना किती स्पष्ट शब्दात सांगितली आहे पहा बरे !

आता पुढचेच उदाहरण घेऊ ! ह्या श्लोकात मांसभक्षण प्रसंगात आठ प्रकारच्या पापी लोकांची गणना कशी केली आहे ते पाहु ! ते आठ पापी खालीलप्रमाणे !

अनुमन्ता विशसिता निहन्ता क्रयविक्रयी !
संस्कर्ता चोपहर्ता च खादकेश्चेति घातका: !
५.५१

अर्थ - अनुमन्ता म्हणजे मारण्याची आज्ञा देणारा, विशसिता म्हणजे मांस कापणारा, निहन्ता म्हणजे पशुहत्या करणारा, क्रयविक्रयी म्हणजे तिची खरेदी विक्री करणारा, संस्कर्ता म्हणजे ते मांस अन्न म्हणून शिजविणारा, उपहर्ता म्हणजे ते दुसर्याला वाढणारा व खादक: म्हणजे ते मांस खाणारा हे आठ जण "इति घातका:" म्हणजे हे सर्व घातकी आहेत ! ह्याचाच अर्थ पापी आहेत !

आता एवढा पुरावा देऊनही कुणी म्हणेल की मनुस्मृती मांससमर्थन करते तर काय करावे??? कारण ह्यातला कुठला श्लोक प्रमाण मानायचा??? मांससमर्थनाचा की मांसनिंदेचा??? पाचव्या अध्यायात श्राद्धाच्या वेळी मांसभक्षणाचे जे काही संदर्भ आहेत ते सर्व प्रक्षेपच नाहीतर काय म्हणायचे ???थोडक्यात समर्थनाचे श्लोक प्रक्षिप्त आहेत हे लहान पोराला देखील कळेल !

हाच नियम मनुस्मृतीतल्या इतर विकृतींना लावला तर मनुस्मृतीवरचे शिव्याशाप कमी होतील. पण हे करायला कुणी तयारच नाही. पाश्चिमात्य हे करत होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आर्य समाजानेदेखील हे केले आहे. सर्वप्रथम महर्षी दयानंदांनी हा प्रयत्न केला होता. त्यांच्या नंतर प्रा. डॉ. सुरेन्द्र कुमार ह्यांनी "विशुद्ध मनुस्मृती" ह्या संशोधनपर ग्रंथाची निर्मिती करुन एक अप्रतीम कार्य करून ठेवले आहे. www.archive.org ह्या संकेत स्थळांवर त्यांची मनुस्मृती उपलब्ध आहे. त्यांच्या मते वर्तमान मनुस्मृती मध्ये २६८५ श्लोकांपैकी १४७१ श्लोक प्रक्षिप्त आहेत व राहिलेले १२१४ श्लोक हे विशुद्ध आहेत. त्यांच्या मते खालील मांसभक्षणाचे श्लोक प्रक्षेप आहेत

अध्याय पाचवा - श्लोक क्रमांक ११ ते ४७ (श्राद्ध करताना मांस भक्षण)
तिसरा अध्याय - श्लोक क्रमांक १२२ ते २६४

आता प्रक्षेप कसे ओळखायचे हा प्रश्न उरतो - त्याचं समाधान

या वेदबाह्या: स्मृतय: याश्च काश्च कुदृष्टय: !
सर्वास्ता: निष्फला ज्ञेयास्तमोनिष्ठास्तु ता: स्मृता: ! मनु- १२-९६

अर्थ - ज्या स्मृत्या वेदबाह्य आहेत, त्या सर्व कुदृष्टय: म्हणजे वाईट दृष्टीने आलेल्या आहेत, त्या सर्व तमोगुणातून आलेल्या असल्यामुळे सर्वच्या सर्व निरर्थक आहेत !

याबाबतीत विवेकानंदांचं मतही प्रमाण आहे ! स्वामीजींनी भारतीय व्याख्याने म्हणजेच कोलंबो ते अल्मोरा व्याख्यानांच्या शेवटच्या व्याख्यानात हेच प्रतिपादन केलंय ते म्हणतात

"हे वेद म्हणजेच आपले प्रमाणभूत ग्रंथ आहेत व प्रत्येकाला त्यांतील ज्ञान मिळवण्याचा अधिकार आहे......
जोवर वेदांशी सुसंगत आहेत तोवरच स्मृति, पुराणे व तंत्रे यांना मान्यता देणें बरोबर आहे व जेथे म्हणून त्यांचा वेदांशी विरोध येईल तेथे ती अप्रमाण म्हणून त्याज्य मानली पाहिजेत ! पण आज आपण पुराणांना वेदांहून अधिक उच्च अधिकाराचे स्थान दिले आहे ! पण सेवक धन्यावर सत्ता गाजवूं शकेल काय???"

संदर्भ - पृष्ठ क्रमांक ४४३ - खंड पाचवा - स्वामी विवेकानंद शतवार्षिक जयंती स्मारक ग्रंथ

इतका जाहीर नि कठोर निषेध वेदबाह्य स्मृतींचा आहे !

आता वेदबाह्य का म्हटलं ??

कारण वेद भगवान कुठेही मांसाहाराचं समर्थन करत नाही !
संदर्भ

मा हिंसात् सर्वभूतानि ! अथर्ववेद

अर्थ - कोणत्याही प्राणीमात्राची हिंसा करु नका

अथर्ववेद तर स्पष्टपणे सांगतो की प्राणीमात्राची हिॅसा केली तर काय दंड करावा ते खालीलप्रमाणे

अथर्ववेद - १/१६/४

यदि नो गां हंसि यद्यश्वं यदि पुरुषम् !
त्वं त्वा सीसेन विध्यामो यथा नोsसो अवीरहा !

अर्थ - जर तु आमच्या गाय, घोडे व पुरषांची हत्या केलीस तर आम्ही तुला शीष्याच्या गोळीने विद्ध करु ! ज्यामुळे तु आमच्या वीरांचा वध करु शकणार नाहीस !

एवढं स्पष्ट सांगूनही काही लोक वेदांत पशुहत्येचं समर्थन आहे असं म्हणतात त्याच्या बुद्धीहीनतेला काय म्हणावं??

कारण वेद भगवान एकाठिकाणी हिॅसा करु नका असं सांगेल व दुसर्या ठिकाणी ती करा असं सांगेल असं शक्य तरी आहे का? आणि जर तसं असेलही तर ते नंतरच्या काळात निर्माण झालेल्या गृह्यसुत्र, धर्मसुत्र, श्रौतसूत्रे वगैरेत आहे. तो तेवढा भागही प्रक्षिप्तच कारण ती गृह्यसुत्र किंवा धर्मसुत्रंही इतरठिकाणी स्पष्ट शंब्दांत प्राणीहत्या व मांसभक्षणाची निंदा करतात. म्हणजेच एखादा श्लोक मांससमर्थक असतो पण इतर ठिकाणी त्याची कठोर निंदा असते आणि मी वर सांगितल्याप्रमाणे जिथे जिथे असे विकृत संदर्भ मिळतात ते सर्व मागाहून घुसडले गेलेल प्रक्षिप्त श्लोक आहेत हेच सिद्ध होतं !

आंबेडकरांचाच मनुस्मृतीबाबतचा पुरावा

मनुस्मृती ही प्रक्षेपांची सर्वात मोठी खाण आहे दुर्देवाने ! म्हणूनच तर आंबेडकर सुद्धा स्पष्ट म्हणतात.

"मनु के कालनिर्णय के प्रसंग मे मैने संदर्भ देते हुए बताया था की मनस्मृती का लेखन ईसवी सन पूर्व १८५, अर्थात पुष्यमित्र शृंग की क्रांति के बाद सुमति भार्गव के हाथों हुआ था ! "

संदर्भ - आंबेडकर समग्र वांग्मय हिंदी - खंड ७वा - पृष्ठ क्रमांक ११६

थोडक्यात वर्तमान मनुस्मृती ही इसवीसन पूर्व १८५ मध्ये रचली असून ती मुळ स्वायंभूव मनुची नाही हे आंबेडकर सांगतात. ह्याबाबतीत ते पुढे म्हणतात

"वर्तमान मनुस्मृति से पूर्व दो अन्य ग्रंथ विद्यमान थे ! इनमें एक मानव अर्थशास्त्र अथवा मानव राजशास्त्र अथवा मानव राजधर्मशास्त्र के नाम से एक पुस्तक बताई जाती थी ! एक अन्य पुस्तक मानव गृह सुत्र के नाम से जानी जाती थी ! विद्वानों ने मनुस्मृति की तुलना की है !  महत्वपूर्ण विषयों पर एक ग्रंथ के उपबंध दुसरे ग्रंथ से केवल असमानही नहीं हैं अपितु दुसरे ग्रंथ मे दिए उपबंधों से प्रत्येक दशा में भिन्न हैं !

संदर्भ - पृष्ठ क्रमांक १५२ - खंड सातवा

आता ह्यावरूनच वर्तमान मनुस्मृती ही
की ज्यामध्ये प्रचंड प्रमाणात प्रक्षेप आहेत, ती मुळ मनुस्मृतीपेक्षा भिन्न आहे हे बाबासाहेबच सांगताहेत.

आता हिची अशी विकृत प्रक्षेपासहित रचना कुणी केली ह्याबाबतीत बाबासाहेबांचं मत अभ्यासणं आवश्यक आहे. ते म्हणतात

"लगभग चौथी शताब्दी में नारदस्मृति के लेखक को मनुस्मृति के लेखक का नाम ज्ञात था ! नारद के अनुसार सुमति भार्गव नाम के एक व्यक्ति थे जिन्होंने मनु संहिता की रचना की थी ! सुमति भार्गव कोई काल्पनिक नाम नहीं है ! अवश्य ही यह कोई एेतिहासिक व्यक्ति रहा होगा ! इसका कारण यह है कि मनुस्मृति के महाव टीकाकार मेधातिथी का यह मत था कि यह मनु निश्चय ही कोई व्यक्ति था ! इस प्रकार मनु नाम सुमति भार्गव का छद्म नाम था और वह ही इसके वास्तिवक रचयिता थे !"

संदर्भ पृष्ठ क्रमांक १५१ - खंड सातवा

पुढे ते तर स्पष्ट शब्दात सांगतात

"कुछे ऐसे विद्वानों के अनुसार, जिनकी विद्वत्ता पर संदेह नही किया जा सकता, सुमति भार्गव ने इस संहिता की रचना ईसा पूर्व १७० और ईसा पूर्व १५० के मध्यकाल में की और इसका नाम जानबूझकर मनुस्मृति रखा"

संदर्भ - तेच पान क्रमांक १५१

थोडक्यात इथे आंबेडकर स्पष्ट सांगतात की वर्तमान मनुस्मृती ही इसवी सन पूर्व दुसर्या शतकाच्या आसपास रचली गेली असून ती मुळ मनुस्मृतीहून भिन्नच आहे ! थोडक्यात ह्या विकृत प्रक्षेपांची रचना सुमति भार्गव नावाच्या व्यक्तीने केली असून ती मुळ स्वायंभूव मनुची रचनाच नाही !

म्हणजेच आंबेडकरांचा विरोध ह्या प्रक्षिप्त स्मृतीस आहे लहान मुलाला देखील पटेल !

आता एवढं स्वच्छ सांगूनही लोकांना जर कळत नसेल तर आम्ही काय करावे????


Thursday, 17 September 2015

वेदांतील तथाकथित मांसभक्षण - संपूर्ण खंडण !!!!




एक असत्य सहस्त्रवेळा सांगितले की ते सत्य वाटायला लागते. - इति गोबेल्स, ब्रिटीश, साम्यवादी, पुरोगामी, सेकुलर, ब्रिगेडी, मूलनिवासी, बामसेफी तंत्र !

गेली १५० वर्षे आम्हाला ब्रिटीशप्रणित नि साम्यवादी इतिहासातून असे खोटे सांगितले जाते आहे की आमच्या वेदांमध्ये नि इतर हिंधू धर्मशास्त्रांमध्ये मांसाहाराचे, गोहत्य आणि इतर प्राणीहत्येचे समर्थन आहे. मुख्यतः वेदांमध्ये हे समर्थन आहे असा प्रचार ब्रिटिशांनी आणि नंतर आमच्यातल्याच काही स्वकीयांनीही जाणून बुजून किंवा काहींनी गैरसमजाने किंवा अजाणतेपणी केला आहे. हा प्रचार पूर्णतः असत्य नि तर्कहीन आणि धादांत खोटारडे पणाचा कळस आहे. सर्वप्रथमच सांगू इच्छितो कि वेदांवरच्या सर्व घाणेरड्या आक्षेपांचे खंडण महर्षी दयानंद स्वरस्वती आणि महर्षी सातवळेकर ह्यांनी केंव्हाच केले आहे. महर्षी अरविंद ह्यांनी देखील ते केले आहे. पण ह्यांचे साहित्य वाचण्यास आम्हाला वेळही नाही हेच दुर्दैव आहे. ह्या विषयावर आम्ही स्वतः एक अभ्यासपूर्ण ग्रंथाची निर्मिती करतच आहोतच. तूर्तास तरी ह्याला प्रत्युत्तर देऊन ह्याचे खंडण करण्याचा प्रयत्न !!! असो आता मूळ लेखाकडे आणि त्याच्या खंडणा कडे वळू

आक्षेप क्रमांक -----------  ब्राह्मणों के वेद -शस्त्रों मे मांस -भक्षण के विधान ********

वैदिक साहित्य से पता चलता है की प्राचीन आर्य -ऋषि और याज्ञिक ब्राह्मण सूरा-पान और मांसाहार के बड़े शौकीन थे यज्ञों मे पशु बाली अनिवार्य था बली किए पशु मांस पर पुरोहित का अधिकार होता था ,और वही उसका बटवारा भी करता था बली पशुओ मे प्राय;घोडा ,गौ ,बैल अज अधिक होते थे.
******ऋग्वेद मे बली के समय पड़े जाने वाले मंत्रो के नमूने पड़िए;- 1- जिन घोड़ो को अग्नि मे बली दी जाती है ,जो जल पिता है जिसके ऊपर सोमरस रहता है ,जो यज्ञ का अनुष्ठाता है ,उसकी एवम उस अग्नि को मै प्रणाम करता हु।( ऋग्वेद 10,91,14)

खंडण - प्राचीन ब्राह्मण आणि ऋषी मांसाहार आणि सुरापान करण्याचा संदर्भ कुठे मिळाला कुणास ठाऊक ??? पुराव्यासाठी जी वेदांत रुचा दिली आहे ह्या ऋचा आणि तिचा खरा अर्थ खालीलप्रमाणे आहे.

यस्मि॒न्नश्वा॑स ऋष॒भास॑ उ॒क्षणो॑ व॒शा मे॒षा अ॑वसृ॒ष्टास॒ आहु॑ताः
की॒ला॒ल॒पे सोम॑पृष्ठाय वे॒धसे॑ हृ॒दा म॒तिं ज॑नये॒ चारु॑म॒ग्नये॑ (ऋग्वेद १०व मंडल ९१वं सुक्त आणि १४वी ऋचा)

ऋचेचा वास्तविक अर्थ खालीलप्रमाणे

आम्ही "अश्व, ऋषभ(बैल), उषा, वश आणि मेष बनून प्रभू कडे जाऊ, त्याच्या प्रति अर्पण होऊ. ते प्रभू आमच्या शक्तीचे संरक्षण करणारे, आम्हांस सौम्यता देणारे आणि आमच्या सार्या शक्तींचे निर्माते आहेत. त्या परमेश्वराप्रती आमच्या अंतःकरणात ज्ञानपुर्वक बुद्धी निर्माण होउदे.


आक्षेप क्रमांक  - इंद्रा कहते है ,इंद्राणी के द्वारा प्रेरित किए गए यागिक लोग 15-20 सांड काटते और पकाते है मै उन्हे खाकर मोटा होता हू -ऋग्वेद 10,83,14

खंडण  - खोटारडे पणाचा कळस आहे. ह्या ८३ व्या सुक्तामध्ये फक्त (सातच) ऋचा आहेत. ह्याने १४ वी ऋचा  कुठून आणली ??? स्वतःला काय वैदिक ऋषी समजतो कि काय ??? 

आक्षेप क्रमांक - जो गाय अपने शरीर को देवों के लिए बली दिया करती है ,जिन गायों की आहुतियाँ सोम जानते है ,हे इंद्रा! उन गायों को दूध से परिपूर्ण और बच्छेवाली करके हमारे लिए गोष्ठ मे भेज दे
- ऋग्वेद 10,16,92

खंडण - पुन्हा खोटारडेपणा ! ह्या १६व्या सुक्तात फक्त १४ ऋचा आहेत. ह्याने ९२ कुठून आणल्या???

आक्षेप क्रमांक - हे दिव्य बधिको!अपना कार्य आरंभ करो और तुम जो मानवीय बधिक हो ,वह भी पशु के चरो और आग घूमा चुकाने के बाद पशु पुरोहित को सौप दो। (एतरेय ब्राह्मण )

खंडण - पुरावा काय???? कोणत्या संस्कृत श्लोकाचा संदर्भ आणि अर्थ आहे हा ??? संख्या क्रमांक द्या !

आक्षेप क्रमांक -   महर्षि याज्यावल्क्या ने षत्पथ ब्राह्मण (3/1/2/21) में कहा हैं कि: -"मैं गोमांस ख़ाता हू, क्योंकि यह बहुत नरम और स्वादिष्ट है."

खंडण - आम्ही शतपथ ब्राम्हणाची मुळ संस्कृत संहिता अभ्यासली आहे.आंतरजालावर “शतपथ ब्राम्हणाची” संस्कृत संहिता आणि हिंदी अनुवाद उपलब्ध आहे. Digital Library ह्या संकेत स्थळांवर सुद्धा पूर्ण उपलब्ध आहे. ज्यांना हवा असेल त्यांनी पाहावा. आक्षेपकाने मूळ श्लोक द्यावा हि विनंती स्वतःच्या मनाने अर्थ काढू नये. तो श्लोक मुळ असा आहे.


तदहु उवाच याज्ञवल्क्यः - अश्नामि एव अहं अंसलं चेद भवतीति ! ३/१/२/२१ शतपथ ब्राम्हण
इथे अनेकांनी "अंसलं" ह्या शब्दाचा अर्थच नरम आणि चविष्ट असा घेतला आहे. पण तो तसा अर्थ निघतच नाही. कारणे खालीलप्रमाणे
१. सायणाचार्यांचे शतपथ ब्राम्हणावरचे भाष्य वाचा ! त्यात त्यांनी मांस शब्दाचा कुठेहि उल्लेख केलेला नाही. (Digital Library ह्या संकेत स्थळांवर सुद्धा पूर्ण उपलब्ध)
२. पाणिनीच्या व्याकरणानुसार (सूत्र ५.२.९८) सुद्धा "अंसलं" शब्दाचा अर्थ केवळ "पौष्टिक आणि सामर्थ्य प्रदान करणारे किंवा सायणाचार्यांच्या भाषेत "बलवद" म्हणजे शक्ती वाढविणारे असा होतो.
३. अमरकोशानुसार (२.६.४४) "अंसलं" शब्दाचा अर्थसुद्धा "पोषणदायी आणि बलसंवर्धक" असा आहे. त्यात मांसचा संबंधही नाही.
ह्याच शतपथ ब्राम्हणमध्ये मांस भक्षण करण्याचा अधिकार नाकारलेला आहे :-

 “ मांसमाश्रीयात् ! यन्मासं माश्रियात् यन्मिप्रानमुपेथादिति नेत्वेवैषा दीक्षा (. :२.२.३९)
अर्थात मनुष्याने मांस भक्षण करता कामा नये. जर त्याने मांस भक्षण केले किंवा व्यभिचार केला तर त्याला दीक्षेचा अधिकार नाही ….


शतपत ब्राम्हणामध्ये जिथे मांस शब्दाचा उल्लेख आहे, तिथे तिथे त्याचा काय अर्थ घ्यायचा आहे ते खालीलप्रमाणे

शतपथ ब्राम्हणानुसार आणि अमरकोष ह्या संस्कृत शब्दाकोशानुसार मांस शब्दाचा अर्थ !

मांसानि वा आहुतय:( ,२.३.४६ )
अर्थ - यज्ञात मांसाची आहुती द्यावी.


इथे मांस ह्या शब्दाचा अर्थ काय आहे खाली स्पष्ट केले आहे

मासीयन्ति वै जुह्वतो यजमानस्याग्नय:
एतह वै परममान्नघ यन्मासं, परमस्येवान्नघ स्याता भवति (शत -११ ,)”।।
यज्ञात हवन करते वेळी यजमानाची अग्नी मांसाची अपेक्षा राखतात परमअन्न हेच मांस आहे ! परम अन्नाने आहुति द्या !"

इथे परमअन्न असा शब्द प्रयोग केला आहे आणि जीवाचे मांस असते तर अन्न हा शब्द प्रयोग केला नसता. कारण मांसाला अन्न ही उपमा कुठेही नसते.
अमरकोषानुसारपरमान्नं तु पायसम्  असा अर्थ दिलेला आहे. म्हणजे पायस ! आता पायस म्हणजे दुध आणि तांदूळ ह्यांची खीर ! म्हणजेच परम अन्न म्हणजेच पायस म्हणजेच मांस !!! म्हणजेच मांस शब्दाचा अर्थ पायस किंवा दुध तांदळाची खीर असा स्पष्टपणे होतो.

आक्षेप क्रमांक - आपास्तंब गृहसूत्रां Apastamb Grihsutram (1/3/10) मे कहा गया हैं,"गाय एक अतिथि के आगमन पर, पूर्वजों की'श्रद्धा'के अवसर पर और शादी के अवसर पर बलि किया जाना चाहिए."

खंडण  - पुरावा काय ?? पूर्ण आपस्तंब सूत्रामध्ये असा एकही श्लोक नाही ! मुळ श्लोक द्यावा हि विनंती ! स्वतःच्या मानाने अर्थ काढू नये. तुम्ही सांगितलेला  मुळ श्लोक (1/3/10)  हा खालीलप्रमाणे आहे.

तदु होवाच याज्ञवल्क्यः - यथादिष्ट पत्न्या अस्तु ! कस्तदाद्रियेत - यत्परः पुंसा वा पत्नी स्यात !

आक्षेपकांना विनंती आहे की आक्षेप घेताना तरी प्रामाणिकपणा दाखवावा. तशी  प्रामाणिकपणाची अपेक्षाचचुकीची आहे तुमच्याकडून  ही गोष्ट वेगळी !

आक्षेप क्रमांक - वशिष्ठ धर्मसुत्रा (11/34) लिखा हैं,"अगर एक ब्राह्मण'श्रद्धा'या पूजा के अवसर पर उसे प्रस्तुत किया गया मांस खाने से मना कर देता है, तो वह नरक में जाता है."पिबा सोममभि यमुग्र तर्द ऊर्वं गव्यं महि गर्णानैन्द्र | वि यो धर्ष्णो वधिषो वज्रहस्त विश्वा वर्त्रममित्रिया शवोभिः ||

वशिष्ठ धर्मसुत्रा (11/34) लिखा हैं,"अगर एक ब्राह्मण'श्रद्धा'या पूजा के अवसर पर उसे प्रस्तुत किया गया मांस खाने से मना कर देता है, तो वह नरक में जाता है."

खंडण - पुन्हा खोटारडेपणा ! मुळ श्लोक असा आहे.

नियुक्तस्तु यदा श्राद्धे दैवे वा मान्समृत्सृजेत!
यावन्ति पशुरोमाणि तावन्नरकमृछति ! (११.३४)

मांस शब्दाचा अर्थ पायस किंवा दुध-तांदळाची खीर असा स्पष्टपणे होतो. हे मी वर सांगितलेच आहे. मांस शब्दाचा आणखी अर्थ पाणिनीच्या अष्टाध्यायीनुसार मधुपर्काच्या संदर्भात ५.२.१२७ सूत्रानुसार "अर्श आदिभ्योSच" असा आहे ! मांस शब्दाचा अर्थ "स्निग्ध" आणि "पोषण वाढविणारा" असा होतो. Pandit Dinanath Sastri, in his book 'Sanatana-Dharmalok' Vol. 6, pages 337-338, has interpreted the word mamhsa in relation to Madhuparka as under :
"The above-stated ingredients of madhuparka should be (मांसल )
i.e. rich in fats, nourishing and should not be devoid of substance.
To the word miamsa  has been suffixed in accordance with am (1).s'i{ ( Atadhyayi 5.2.1 27 - "अर्श आदिभ्योSच" ) in the sense of 'with, together' and it gives the meaning of 'rich in fats'.This meaning is also relevant to the present context.

आक्षेप क्रमांक - ऋग्वेद (10/85/13) मे घोषित किया गया है,"एक लड़की की शादी के अवसर पर बैलों और गायों की बलि की जाती हैं."

खंडण - ज्या सहाव्या मंडलातल्या ऋचेचा आपण "पाहुण्यांना गायीचे मांस दिले गेले" असा अर्थ सांगत आहात तो चुकीचा आहे. "अघासु हन्यन्ते गावो" ह्यातल्या हन्यन्ते शब्दावरून आपण मारली जाते असा अर्थ घेतला आहे ! आपण जो रथ कल्पिला आहे तो रथ प्रत्यक्षात नसून मनोमय रथ आहे ! दयानंदांचे भाष्य वाचा ! आधीच्या ऋचा पहा ! 

इथे सुर्य पुरुष नसून सूर्या हि स्त्री आहे !! आपण इथे गल्लत केली आहे साहेब ! आणि ह्या सूर्याचा (स्त्रीचा) विवाह सोम ह्याबरोबर लावणे आहे असा अर्थ ८व्या ऋचेत प्रकट होतो. ९व्या ऋचेचा अर्थही तसाच आहे !. 

आणि आता १०वी ऋचा काय सांगते पहा 

"मनो॑ अस्या॒ अन॑ आसी॒द्द्यौरा॑सीदु॒त च्छ॒दिः ।
शु॒क्राव॑न॒ड्वाहा॑वास्तां॒ यदया॑त्सू॒र्या गृ॒हम् ॥

हा विवाह करताना मन हा तिचा रथ आहे ( मनो॑ अस्या॒ अन॑ - अन म्हणजे रथ)! रथ मनोमय आहे म्हणजे त्या कन्येने स्वतःच्या मनाने त्याला वरले आहे आणि "उत ध्यौ: छदिः आसीत" म्हणजे मस्तिष्क हा तिचे छत होते म्हणजे त्या मनोरथाचा संरक्षक मस्तिष्क आहे ! हृदयाच्या म्हणजे मनाच्या रथावर मस्तिष्क आहे म्हणजेच याचा अर्थ आपल्याला असा सुचित होतो कि आपण भावनेपेक्षा बुद्धीला जास्ती महत्व द्यावे !
पुढची १२वि ऋचा पहा ! 

शुची॑ ते च॒क्रे या॒त्या व्या॒नो अक्ष॒ आह॑तः ।


अनो॑ मन॒स्मयं॑ सू॒र्यारो॑हत्प्रय॒ती पति॑म् ॥

इथे "सूर्या मन॒स्मयं॑ अनो॑ आरोहति" ह्या शब्दातून स्पष्ट आहे कि तो रथ मनोमय आहे ! खरा रथ नाही ! 

आणि इतकेच नव्हे तर ज्या १३ व्या ऋचेचा अर्थ गाय मारली जात आहे असा अपन करत आहात त्यात गाय ही भेट दिली गेली आहे ! हा गोदान विधी विवाहाच्या अधी एक महिना केला जातो ! ज्यामध्ये गाय ही भेट दिली जाते अन्दन ! ती मारण्यासाठी नव्हे साहेब ! गाय भेट देण्याचे कारण गुरुकुलामध्ये पुढे जाऊन हि गाय तिथल्या लोकांचे पोषण करेन ! आणि हन्यन्ते ह्या शब्दाचा अर्थ मारणे असा जरी वरवरून दिसत असाल तरी दयानंदांनी त्याचा अर्थ "हन् गतौ: म्हणजे आंदण म्हणून ! माराय्साठी नव्हे साहेब !!!
अघासु म्हणजे मघा नक्षत्रात अस अर्थ होतो ! अर्ज्युन्यः म्हणजे फ़ल्गुन् नक्षत्र अस अर्थ आहे ! ह्या फाल्गुनी नक्षत्रात तिचा विवाह करायचा आहे ! "सू॒र्याया॑ वह॒तुः" म्हणजे सूर्याबरोबर आंदण म्हणून !!!
"हन्यन्ते" ह्या शब्दाचा अर्थही पाणिनीने दोन प्रकारे केला आहे ! धातुपाठात "हन् हिंसा गत्योः" अस केला आहे ! इथे हिंसा असाही अर्थ होतो आणि गत्योः म्हणजे जाणे असाही अर्थ होतो !! सायणाचार्यांनी देखील कुठेच "गावः हन्यन्ते" असा अर्थ केला नाही ! इथे हन् शब्दाचा अर्थ कसा घ्यायचा ते खालील प्रमाणे आहे !  





पिबा॒ सोम॑म॒भि यमु॑ग्र॒ तर्द॑ ऊ॒र्वं गव्यं॒ महि॑ गृणा॒न इ॑न्द्र
वि यो धृ॑ष्णो॒ वधि॑षो वज्रहस्त॒ विश्वा॑ वृ॒त्रम॑मि॒त्रिया॒ शवो॑भिः (.१७.)

ह्याचा वास्तविक अर्थ आहे -
हे शस्त्रधारी (वज्रहस्त॒), अत्यंत दृढ (धृ॑ष्णो॒), अत्यंत ऐश्वर्याची इच्छा करणारे ! जे बलाने मेघांना सूर्य जसे पळवून लावतो तसेच संपूर्ण शत्रूंना तुम्ही विशेष नाश करा. आणि हे तेजस्वी अशा मोठ्या गाईंच्या तुपाची स्तुती करत ज्या हिंसा करण्याजोग्या गोष्ठी आहेत त्यांची हिंसा करा. आणि त्याबाबतीत आपण औषधी अशा सोमरसाचे पान करा.”

इथे सोमरस हे मद्य किंवा दारू नसून एक औषधी वनस्पती आहे. पण अनेकांचा असा गैरसमज आहे कि सोमरस म्हणजे दारू! पण हे धादांत खोटे आहे. आता इथे मेक्स्म्युलर, ग्रिफिथ ह्या पाश्चिमात्य संशोधकाने ह्या ऋचेचा अर्थ गाईंना मारा असा केला आहे. तो खालीलप्रमाणे आहे. अनुवाद पहा
DRINK Soma, Mighty One, for which, when lauded, thou breakest through the cattle-stall, O Indra;
Thou who, O Bold One, armed with thunder smotest Vṛtra with might, and every hostile being.
किती विकृत आहे पहा ! अर्थाचा अनर्थ आहे !

आक्षेप क्रमांक - हिंदू धर्म के सबसे बड़े प्रचारक स्वामी विवेकानंद ने इस प्रकार कहा:"तुम्हें जान कर आश्चर्या होगा है कि प्राचीन हिंदू संस्कार और अनुष्ठानों के अनुसार, एक आदमी एक अच्छा हिंदू नही हो सकता जो गोमांस नहीं खाए. (The Complete Works of Swami Vivekananda, volume.3, page no. 536)



खंडण - महापुरुषांच्या विचारांचा केवळ आपल्या स्वार्थासाठी कसा वापर करायचा ते असल्या लोकांकडून शिकावे !

हे खरे आहे की हे मत स्वामीजींनी मांडले आहे. स्वामी विवेकानंदांनी  मेक्सम्युलरचा वेदांचा अनुवादच अभ्यासला असावा अशी दाट शक्यता आहे. तरीपण एक प्रश्न उरतो की विवेकानंदांचे हे मत खरे मानण्यासाठी पुरावा काय???  कोणत्या ऋचेचा संदर्भ विवेकानंदांनी दिला आहे काय??? पण हे मत प्रमाण मानायचे असले तर विवेकानंदांनी एखाद्या श्लोकाचा तसा संदर्भ का दिला नाही??? हे त्यांना विचारायचा आम्हांस अधिकार नाही असे काहीजण म्हणतील पण मग हे अंधभक्तीचे उदाहरण नाही का ???

समजा हे विवेकानंदांचे मत खरे मानायचे ठरविले तर मग ह्याच विवेकानंदांची खालील मते प्रमाण मानायला तुम्ही तयार आहात काय??? ती खालीलप्रमाणे 

1)  आदर्श यही है। मांस खाया जाए। - स्वामी विवेकानंद

I myself may not be a very strict vegetarian, but I understand the ideal. When I eat meat I know it is wrong. Even if I am bound to eat it under certain circumstances, I know it is cruel. I must not drag my ideal down to the actual and apologise for my weak conduct in this way. The ideal is not to eat flesh, not to injure any being, for all animals are my brothers. If you can think ofthem as your brothers, you have made a little headway towards the brotherhood of all souls -        
The Complete work of Swami Vivekananda - Vol – 2- Pg 298

 “में स्वयं एक कट्टर शाकाहारी भी होऊं किन्तु में उस आदर्श को समझता हूँ जब में मांस खाता हूँ तब जानता हूँ की यह ठीक नहीं है। परिस्थितिवश उसे खाने को बाध्य होने पर भी में यह जानता हूँ के यह क्रूरता है। आदर्श नीचा करके अपनी दुर्बलता का समर्थन मुझे नहीं करना चाहिए। आदर्श यही है। मांस खाया जाए। किसी भी प्राणी का अनिष्ट किया जाए क्यूंकि पशुगन भी हमारे भाई हैं।
संदर्भ विवेकानंद साहित्य भाग - , पृष्ठ -


2)   A Letter To Mrs. Ole Bull, Alambazar Math Calcutta (Darjeeling ) -   26th March 1897

Admitting about the diabetes problem he said that Eating only meat and drinking no water seems to be the only way to prolong life –
The Complete Works of Swami Vivekananda, Vol – 9- Pg 93   

 २६ मार्च, १८९७ ह्या दिवशी श्रीमती ओली बुल ह्यांना आलमबझार मठ, कलकत्ता (दार्जीलिंग) इथे लिहिलेल्या पत्रात

अपनी बीमारी से ग्रस्त होने को बयां करते हुए स्वामी विवेकानंद लिखते हैं की केवल मांस खाना ही लम्बी आयु का राज है.”

3) आता हेच विवेकानंद पुढे काय म्हणताहेत ते पहा.

Sister Christine  को  12th December 1901 को Belur Math Hawrah से लिखे पत्र में अपनी गिरते स्वास्थ्य के बारे मेंलिखते हुए कहते हैं की चिकित्सक ने मुझे आरामकी सलाहदी है और मुझे मांस खानेसे मनाकर दिया है अब मुझे मॉस  चखने तककी मनाही है

The doctors have put me to bed; and I am forbidden to eat meat, to walk or even stand up, to read and write. I am prevented from the taste of meat.

The Complete Works of Swami Vivekananda, Vol – 9- Pg 172 

4) आता ह्याच विवेकानंदांनी दुसर्या एका ठिकाणी किती विरोधाभासी वक्तव्य केले आहे पहा.
[Daily Iowa Capitol, November 28, 1893]

After the lecture, the speaker (Swami Vivekananda) consented to answer questions to a portion of the audience that remained for that purpose. In the course of the answers he (Swami Vivekananda) said that the Hindus were altogether opposed to the destruction of the life of any animal. He (Swami Vivekananda) admitted the worship of the sacred cow.
                                                                                                                   
The complete works of Swami Vivekananda, Vol – 9- Pg 638

२८ नोव्हेंबर, १८९३ चे लोवा कॅपितोल नावाचे वृत्तपत्र म्हणते की

व्याख्यानानंतर वक्त्याने(स्वामी विवेकानंदांनी) प्रश्नोत्तरासाठी थांबलेल्या श्रोत्यांची उत्तरे देण्यास संमती दर्शविली. ह्या प्रश्नोत्तरात त्यांनी (स्वामी विवेकानंदांनी) कि हिंदू लोक हे कोणत्याही प्राणीहत्येच्या संपूर्ण विरोधात होते. त्यांनी (स्वामी विवेकानंदांनी) प्रवित्र गाईच्या पूजनास दुजोरा दिला.”

आता पहा बरे ! हेच विवेकानंद एका व्याख्यानात म्हणतात की वेदकाली लोक गोहत्या करायचे आणि हेच विवेकानंद दुसर्या ठिकाणी विदेशात जाऊन म्हणतात कि Worship of Sacred Cow.


आता हेच विवेकानंद पुढे म्हणतात.

5) The eating of meat produces pleasure to a man, but pain to the animal which is eaten. There has never been anything which gives pleasure to all alike.

The Complete Works of Swamei Vivekananda - Vol – 2- Pg 177

मांसाहारी को मांस खाने से अवश्य सुख मिलता है, पर जिसका मांस खाया जाता है उसके लिए तो भयानक कष्ट ही है

विवेकानंद साहित्य , भाग -2, पृष्ठ -135

आता ह्याच विवेकानंदांनी किती विरोधाभासी मते प्रकट केली आहेत पहा.


6) At present there are three parties in India included under the term 'Hindu' — the orthodox, the reforming sects of the Mohammedan period, and the reforming sects of the present time. Hindus from North to South are only agreed on one point, viz. on not eating beef.
Page NO. 275 - Volume 5 - The Complete Works of Swami Vivekananda

आजच्या घटकेला हिंदुस्थानात "हिंदु" ह्या संज्ञेखाली तीन पक्षांचा समावेश होतो. - पुराणमतवादी, मुसलमानी काळांतील सुधारक पक्ष आणि वर्तमानकाळातील सुधारक पक्ष. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, गोमांस खाणे हाच मुद्दा सर्व हिंदूंना मान्य आहे.

पृष्ठ क्रमांक ५५ - स्वामी विवेकानंद शतवार्षिक जयंती स्मारक ग्रंथखंड पाचवा



7) England has the sword, the material world, as our Mohammedan conquerors had before her. Yet Akbar the Great became practically a Hindu; educated Mohammedans, the Sufis, are hardly to be distinguished from the Hindus; they do not eat beef, and in other ways conform to our usages. Their thought has become permeated by ours.

Pg. No. 247 – Volume 5 - The Complete Works of Swami Vivekananda

इंग्लंडजवळ तलवार आहे. भौतिक जगतावर त्यांचे प्रभुत्व आहे. इंग्रजांच्या आधीच्या, आमच्या मुसलमान विजेत्यांची हीच स्थिती होती. तरीसुद्धा महान सम्राट अकबर जवळजवळ हिंदुच बनला होता.सुशिक्षित मुसलमान जे सुफी, त्यांच्यामध्ये आणि हिंदूंमध्ये प्रायः अंतर नसतेच. सुफी लोक गोमांस खात नाहीत, त्यांच्या इतरही रीतिभाती आमच्यासारख्याच असतात. त्यांचे सगळे विचारजगत आमच्या विचारांनी प्रभावित झालेले आहे.

पृष्ठ क्रमांक १९ - स्वामी विवेकानंद शतवार्षिक जयंती स्मारक ग्रंथखंड पाचवा

8)  The ordinary idea of duty everywhere is that every good man follows the dictates of his conscience. But what is it that makes an act a duty? If a Christian finds a piece of beef before him and does not eat it to save his own life, or will not give it to save the life of another man, he is sure to feel that he has not done his duty. But if a Hindu dares to eat that piece of beef or to give it to another Hindu, he is equally sure to feel that he too has not done his duty; the Hindu's training and education make him feel that way.

Pg. No. 55 – Volume 1 - The Complete Works of Swami Vivekananda

कर्तव्यासंबंधी साधारणपणे सर्वत्र अशी धारणा असल्याचे आढळून येते की, सर्व भले लोक स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीच्या आदेशानुसार कर्म करीत असतात. परंतु एखादे विशिष्ट कर्म कशाने "कर्तव्य" ठरत असते? अगदी प्राण जाण्याची पाळी येउन ठेपली आहे अशा अवस्थेतही जर कुणी ख्रिश्चन समोर गोमांस असूनसुद्धा प्राणरक्षणार्थ आपण स्वतः ते खाणार नाही किंवा दुसर्या एखाद्याचे प्राण वाचविण्यासाठी ते त्याला देणार नाही तर, आपण कर्तव्यच्युत झालो असेच त्याला खात्रीने वाटेल. पण तेच, कुणी एखादा हिंदू तसाच प्राणसंदेह उपस्थित होऊनही जर ते गोमांस खाण्यास धजेल अथवा आणखी एखाद्या हिंदूला खाण्यासाठी म्हणून तो तुकडा देईल तर त्यालाही खचित असेच वाटेल की आपण कर्तव्यभ्रष्ट झालो आहोत.

पृष्ठ क्रमांक ५५ - स्वामी विवेकानंद शतवार्षिक जयंती स्मारक ग्रंथखंड पहिला (कर्मयोग - व्याख्यान ४थे )



9)   In the midst of all these differences we note one point of unity among all Hindus, and it is this, that no Hindu eats beef.

Page no. 372 – Volume 5 – The Complete Works of Swami Vivekananda

पण हे सर्व भेद असूनही सर्व हिंदूंत एकत्वाचा एक मुद्दा आढळतो, तो हा की कोणीही हिंदू गोमांस भक्षण करत नाही.

पृष्ठ क्रमांक ४४१ - स्वामी विवेकानंद शतवार्षिक जयंती स्मारक ग्रंथखंड पाचवा



 खरेतर आता लिहायसारखे काहीही राहिले नाही तरीही इतके पुरावे देऊनही जर कुणाला अजूनही आक्षेप असतील तर मग आम्ही एक विनंती करतोआम्ही स्वतः लवकरच "स्वामी विवेकानंद आणि वेदांतील गोहत्या किंवा मांसभक्षण - एक चिकित्सक अभ्यास" ह्या विषयांवर एक सविस्तर लेख लिहीनच. विवेकानंदांच्या संदर्भ देणाऱ्या सर्व पुरोगामी, सेक्युलर, मांसाहारप्रिय व्यक्तींना आम्ही विचारतो की तुम्ही विवेकानंदांचे वरीलपैकी कोणते मत प्रमाण मानाल??? नक्की कोणते ते आधी स्पष्ट करा !!! महापुरुषांचा पराभव त्यांचे अनुयायीच करतात. तुम्ही देखील तेच करताहात, नाही का ?????????????